भारत हा सभ्य व सुसंस्कृतांचा देश म्हणून अवघ्या जगात ख्यातनाम आहे. भारताची संस्कृती संपूर्ण विश्वापुढे एक आदर्श निर्माण करते. मग अशा सभ्य व सुसंस्कृत देशात विवाहपूर्व शारिरीक व लैँगिक संबंधांना कायद्याने मान्यता (संमतीवय कमी करून) शासन काय साध्य करू ईच्छिते? केंद्र शासनाला पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार करायचाय का !!! याबतीत तर पाक, अफगाण व ईराण चा कायदा बरा! (असं समजू नये कि मी त्या देशांची बाजू घेतोय)
भारतात विवासाठी कायद्याने पुरुषांसाठी 21 व महिलांसाठी 18ची वयोमर्यादा आखुन दिलेली आहे... तरीदेखील महाराष्ट्रातील मराठवाडा सारख्या विभागात बालविवाह होतातच... मी त्या क्षेत्रात राहिलेला असून 'IBN लोकमत' सारख्या राज्यातील नामांकित मराठी वृत्तवाहिनीने हा धक्कादायक प्रकार जगासमोर आणलाय... राजस्थान, हरियाणा सारख्या राज्यात आजही बालविवाहांची संख्या कमी नाही... मी फक्त उदाहरणादाखल वरील नामोल्लेख केला असला तरी इतर राज्यातील परीस्थिती काही वेगळी नाही. जर हा 'फौजदारी कायदा सुधारणा विधेयक 2013' अंमलात आला तर 16 वर्षाँनंतरच कायद्याने अवैध बालविवाहांचेही प्रमाण वाढेल. आज अधिकतर जनता (विशेषत: मुलीँचे) मत असे आहे कि काय सरकार लग्नाचेही वय कायद्याने कमी करेल का? मी म्हणतो कि त्यात काय चुकीचे आहे? हं नकारात्मक बाबीँचा विचार केल्यास निश्चित त्यामध्येही काही त्रुटी असू शकतात... मी जाणतो की मी लग्नाचे वयोमर्यादा कमी करण्यास सहमती दर्शवत असल्याने चहुबाजूंनी माझ्यावर विरोधी प्रतिक्रियांचाच भडीमार होईल. तरी मी आपल्या भूमिकेवर ठाम असून या विचारामागील सत्यता आपल्या निदर्शनास आणून देऊ शकतो... हं या विषयावर माझा परिपूर्ण अभ्यास नसल्याने, मी यातील तज्ज्ञ नसल्याने अथवा हे माझे क्षेत्र नसल्याने मी माझी भुमिका स्विकार करण्यास आपणास बांधिल मात्र करू शकत नाही... तरीही जे मी निरिक्षण केलं, अभ्यासलं, मला जाणवलं वा माझ्या निदर्शनास आले ते मी या ब्लॉगच्या माध्यमाने समाजासमोर मांडतोय...
ज्यांच्या मते मुली 16 वर्षाँमध्ये मानसिकदृष्ट्या परिपक्व (Mentally Mature) नसतात त्यांना मागे मी मानसशास्त्रीयच आकडेवारी दिली आहे. मी बालविवाहाचे (Child marriage) मुळीच समर्थन करीत नाही. आणि शासनाने संमतीवय (Age of consent) 18 वरून 16 केल्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे ही नमूद केलय... उदाहरणार्थ-- पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार, वाढते बलात्कार, कायद्याचा दुरूपयोग, अवैध बालविवाह, अविवाहित माता, अवैध गर्भपात, भ्रुणहत्या आणि बरेच सारे---
पण जर शासनाने लैँगिक जाणिव-जागृतीचे वय लक्षात घेत संमतीवय 18 चे 16 असे कमी करून वरील समस्यांना आमंत्रण देण्यापेक्षा एकच विवाहाची वयोमर्यादा 21-18 हुन 19-16(जे इंडोनेशिया मध्ये संमतीवय आहे) अशी कमी करण्याचा एकच कठोर कायदा आणल्यास माझ्या मते तरी ब-याच समस्यांवर तोडगा निघु शकेल... अर्थात आता होणारे अवैध बालविवाह वैध ठरतील, प्रेमीयुगल विवाहित असल्यास कुमारी मातेचा प्रश्नच निर्माण होणार नाही शिवाय विवाहबद्ध असल्यामुळे अवैध गर्भपाताची निकडच उद्भवणार नाही, शारिरीक संबंध विवाहोत्तर झाल्यास विदेशातील पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार न होता भारताच्या सभ्य संस्कृतीचा आदर्श जगापुढे अबाधित राहील... शिवाय जे तरूण वय कमी असल्यामुळे वाईट मार्गक्रमण करतात त्यावर आळा बसू शकेल, परिहार्याने बलात्कारासारखे गुन्ह्यांचे प्रमाण आपोआपच कमी होऊ लागेल... शिवाय 21-18 हून कमी वयाचे प्रेमीयुगल संमतीने विवाहपुर्व संबंध ठेवण्यापेक्षा विवाह करून संबंध ठेवतील... आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संमतीवय कमी करण्यामागील हाच लैँगिक जाणीव जागृतीचा शासनाचा दृष्टिकोन विवाहवयोमर्यादा कमी करूनही साधता येईल...
आता प्रश्न उद्भवतो 17 हे वय माता बनण्यासाठी परिपक्व आहे का? बाळाची काळजी व संगोपणाची घेण्याची जवाबदारी घेण्याजोगे 17 वर्षीय माता व 20 वर्षीय पिता मानसिकदृष्ट्या परिपक्व असतात का? कदाचित नाही..! पण ज्याअर्थी अवैध बालविवाहानंतर अल्पवयीन माता आई होतातच; शिवाय संमतीने विवाहपुर्व संबंध ठेवून गर्भपात करता न आल्यास कुमारी मातांना हीच समस्या भेडसावणार की..! याउलट हाच प्रश्न विवाहानंतर निर्माण झाल्यास कौटुंबिक आधार तरी मिळू शकतो. आणि Sex साठी 19-16 हे वय योग्य आहे की नाही हे आपण पाहिलेच...!
No comments:
Post a Comment