Monday 23 September 2013

22 सप्टेँबर - ताईस पत्र

हाच ब्लॉग सुरुवातीपासून वाचा

त्या दिवशी मला बोलावून तासभर संवाद साधण्यामागे तुझा हेतू काय होता ते तर मला कळलं नाही.. पण मी तूला एक सांगू ईच्छितो ताई.. आज आपण जरी स्वगावी राहत असलो, आपल्यात बराच अंतर असला.. व त्या सुखद दिवसानंतर 2 वर्ष लोटलेत.. तुला कदाचित वाटत असेल कि तूझा न मानलेला भाऊ तूला विसरला.. पण नाही ताई.. याचा पुरावा हा पत्र आहे.. आपल्यात संपर्क नाही याचा अर्थ असा नाही ताई कि मी तुला विसरलोय वा तुझा नंबर माझ्याकडे नाही.. तो आहे पण भिती वाटते आजही तुझी आणि नाही करत फोन कितीही आठवण येत असली तरी कारण उगाचच होऊ नये त्रास तुला माझ्यामुळे म्हणून.. कारण काळजी आहे मला माझ्या ताईची.. मला नाही आवडणार तुला एका मुलाचा फोन आल्याचे घरच्यांना कळल्यास त्यांनी तुला काही प्रश्न केलेलं.. तो ही तुझा दोष नसताना.. म्हणून आजही पुर्वीप्रमाणेच तुझ्या छायाचित्रांशीच बोलतो वा बोलतो तुझी कल्पना करुन स्वत:च स्वत:शी एकांतात वा लिहित असतो तुला पत्रे माझ्या दैनंदिनीत व वाचत बसतो एकटाच वेळ मिळेल तेव्हा.. मला माहितीये ताई हा पत्र प्रसिद्ध होत असल्याने वाचकवर्ग हसेल माझ्यावर.. म्हणतील असलाही काय वेडेपणा!! कारण त्यांना बहिण असेल.. आणि नसलीही तर उणीव भासत नसेल बहिणीची.. पण मला किँमत कळतेय बहिण नसल्याची.. आणि म्हणूनच आजच्या वर्गमैत्रिणीँशी प्रेमाचे सोँग करणा-यांच्या युगात व वातावरणात मी मानलं तूझ्या रुपात माझ्या वर्गमैत्रिणीला मोठी बहिण.. तो ही जात-पात, धर्म, वय सर्व बाबींना अलिप्त ठेवून.. कारण या बाबी पवित्र नात्याच्या आड येवू शकत नाहीत.. आणि तुला सांगू ईच्छितो ताई आता मी पण (हिँदू असून) तुम्हा मुस्लिम बंधु-भगिणीँचा पवित्र धर्मग्रंथ 'कुरआन' वाचतोय.. तो ही जीवाभावापासून..! काय झालं तु मला भाऊ मानलं नाही? मी कधी तुला भाऊ मानच म्हणून बळजबरी केली नाही वा त्रास दिला नाही.. बस् घुटमळत बसतो एकटाच.. मी जाणतो ताई जरी तु मला भाऊ मानत नसली तरी कुठे ना कुठे असेलच जागा या भावासाठी तुझ्या हृदयात.. अन्यथा कशाला लिहिलं असतं तु टोपणनाव "तुमची ताई" म्हणून माझ्या स्लॅम मध्ये?

ताई, त्या दिवशी मला तु भाऊ मानलं नाही पण आश्वासन दिलं होतं कि "वाटल्यास जमलंच तर... लग्नाला बोलवूऽऽऽ..." मी आठवण करुन देतोय ताई किमान एवढं तरी करशील माझ्यासाठी.. "ताईचं प्रेम नाही तर ना सही पण तीचा 'निकाह' तरी या दुर्दैवी भावाला नसीब होऊ दे... तुला माझी शप्पथ." तु तर मला नि:संकोच बोलण्याची संधी दिली होतीस गं.. पण त्या वेळी माझ्याकडे शब्द नव्हते; होते ते फक्त अश्रू! तुझ्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर मला भरपूर काही आठवत होऊ बोलण्यासारखं पण वेळ निघून गेली होती.. आता आजही खंत आहे मनात तु संधी देऊनपण मी मनसोक्त बोलू शकलो नाही.. मला भरपूर बोलायचं होतं.. 2 वर्ष रडत असताना जे थोडेफार आनंदाश्रू साठवले होते याच सुखद दिवसासाठी ते तरळतसुद्धा होते.. ती अश्रूसरिता मला ताईच्या खांद्यावर लहान भावाच्या नात्यानं डोकं ठेवून मनसोक्त रडत मोकळी करायची होती.. तुझ्यापुढे कानशील पुढे करत बहिणीच्या हातच्या 2 चपराक खायच्या होत्या मी केलेल्या क्षुल्लक चुकांसाठी.. आई-वडील व ईश्वरानंतर ज्या व्यक्तीचे छायाचित्रात पाया पडत होतो त्या साक्षात मोठ्या ताईचे चरणस्पर्श करायचे होते पण सर्व ईच्छा अपु-याच राहिल्या..

त्या दिवशी तु मला उपवास असल्याने चम्मचभर साखर व पाणी प्यायला दिलं होतं.. आजही त्या साखरेचा गोडवा प्रसाद व पाण्याची चव अमृत म्हणून जीभेवर आहे.. दुस-या दिवशी जाण्याचे नियोजन असतानाही तु मित्राचा वाढदिवस आटपून काही कारणास्तव त्याच रात्री स्वगावी परतलीस ती कायमचीच.. मला तु परतल्याचे तुझ्या-माझ्या मैत्रिणीकडून फोनवर कळलं.. आणि मी साठवून ठेवली ती मी पाहिलेली माझ्या ताईची शेवटची झलक.. तु रुमच्या रस्त्याकडे इंटरनेट कॅफे जवळून मैत्रिणीँसह वळत होतीस... अगं ताई हो त्याच मैत्रिणीचा आज वाढदिवस.. शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता कळलं की तुला प्राथमिक शिक्षिकेची स्वगावीच कायमस्वरुपी नोकरी लागलीय.. सर्वप्रथम तर तुझं अभिनंदन ताई... तत्पूर्वी मी रामटेकच्या दर्ग्यामध्ये जाऊन तुझ्यासाठी दुवा मागुन आलो होतो.. त्या रात्री शांत झोप यावी म्हणून मित्राला बोलावलं होतं.. ज्या नात्याची माझ्या काही मित्रमैत्रिणीँनी अवहेलना केली त्यातच काहीँनी खंबीरपणे आधारही दिला.. विशेषत: माझी बेस्ट फ्रेँड-तु जाणतेसच.. तरी त्या दिवशी झोपेपर्यँत 23 तारखेच्या पहाटेचे साडेचार झाले होते.. तु मला त्या भागात आल्यास नि:संकोच घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतंस.. मी प्रयत्न करीन ताई पण हिँमत होईल माझी येण्याची??

23 तारखेला आदल्या दिवसाच्या सर्व आठवणी आठवत होत्या.. आणि तु मात्र गावी पोचलेली असशील.. मी सर्वप्रथम दार बंद करुन एकटाच हाथ-पाय आपटत ओरडत रडलो मात्र माझं ऐकायला तिथे कोणीच नव्हतं.. होत्या फक्त चार भिँती! त्या दिवशी अगदी वेड्यापिस्यासारखा रडलो मात्र तु परतणार थोडीच होतीस.. त्या रडण्याचं मी शब्दात वर्णन करुच शकत नाही.. नंतर मन हलकं झाल्यावर तुझ्या मैत्रिँणीची स्लॅम परतवण्यासाठी त्याच खोलीकडे पण यावेळी करमत नव्हतं.. मी आमगावी परतलो.. नंतर आपली भेट कधीच झाली नाही त्याला आज दोन वर्ष लोटलेत...

हाच ब्लॉग पुढे वाचा--> readmore.png

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com