Pages

Saturday, 12 October 2013

आसुमल हरपलानी ते 'संत' (न)आसाराम

टिप:- हाच पत्र सुरुवातीपासून वाचा... [ 1 2 3]

असो... मी बरंच बोललो या पत्राच्या माध्यमातून.. मी ना तुमचा समर्थक ना विरोधक! मला काय आवश्यकता होती एवढं लिहिण्याची कोण जाणे.. पण एकमात्र नक्की! माझे शब्द तुम्हाला टोचले कि नाही माहित नाही कारण तुम्ही ठरले ते शेवटी 'बेशरम'च! पण तुमच्या आताही असलेल्या समर्थकांना निश्चितच टोचले असतील माझे शब्द... मला जाणीव आहे त्याची... कारण जसे आज तुमचे विरोधक तूमचे समर्थन करणारे वक्तव्य ऐकू शकत नाही तसंच तूमचे आजही टिकून असलेले समर्थक सुद्धा आपल्या 'परमात्म्याविरुद्ध' काही ऐकू ईच्छिणार नाही मी जाणतो... पण त्यांच्यावर जरा जास्तच प्रभाव दिसतो आपला... किमान त्यांचा तरी विचार करावयास हवा होता तोँड काळा करण्यापूर्वी.. इतकं सगळं होऊनही व नवनवे कटू सत्य बाहेर येणं सूरुच असूनदेखील त्यांचा अद्यापही तूमच्यावरचा विश्वास टिकून आहे... मी तूमची माफी कदापि मागणार नाही पण माफी मागतो त्या सर्व समर्थकांची... माझा उद्देश त्यांच्या भावना दुखावण्याचा मुळीच नाही.. पण हेच कटु सत्य आहे.. मी जाणतो हे थोडं कठिण आहे पण एक दिवस त्यांनाही जाणीव होईल वस्तुस्थितीची कि तुम्ही कोणी संत वगैरे नसून फक्त 'बलात्कारी बाबा' आहात... होय पैशाचा हव्यासु, किशोरवयीन मुलीँशी शरीरसुख मिळवण्यासाठी वासनेच्छा तृप्त करण्यासाठी टपूनच असलेला एक बिमार वृद्ध राक्षस! निव्वळ एक पाखंडी!! मला हे कळत नाही कि एकीकडे अवघा संत समाज तुम्हाला संत बिरादरीत नाकारत असताना अ.भा. संत महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज का घेत आहेत तुमची बाजू?? खाजगी वृत्तवाहिन्यांवर आयोजित परिसंवादात का देताहेत ते वादग्रस्त विधाने व का जोडतात तुमच्या कूकर्मांचा साधारण परंतू संवेदनशील घटनांशी?? तुमची साठगाठ तर नाही ना?? अन्यथा असेल भिती त्यांना कि एका पापी संतामुळे उडून जाईल जनतेचा विश्वास संत समाजावरुन-- पण हे कदापि शक्य नाही.. संतांवरचा आमचा विश्वास व श्रद्धा अढळ आहे.. ती कमी होणार नाही.. पण एक मात्र नक्की! आता करु लागतील किमान काहितरी सुजाण भक्त चौकसबुद्धीने विचार संतांना संत मानण्यापूर्वी एकदातरी... आणि आता अपेक्षाही आहे सुजाण भक्तांकडून ती एवढ्याचीच...

तुमचा ना समर्थक ना विरोधक
एक चौकसबुद्धीचा आस्तिक

-राजेश डी. हजारे (RDH Sir)

(गोँदिया जिल्हाध्यक्ष - अ.भा. मराठी साहित्य परिषद, पुणे)
-12/10/2013, आमगाव

No comments:

Post a Comment