Pages

Saturday, 12 October 2013

आसुमल हरपलानी ते 'संत' (न)आसाराम

टिप:- हाच पत्र सुरुवातीपासून वाचा... [ 1 2 3]
कारण बहुसंख्य समर्थक जे होते तुमची बाजु घेण्यासाठी.. सोबतच अशा कार्यातून तुम्हाला वाचवणारे सहकारी देखील... शिवाय तुम्हाला वाटत असावं कदाचित भोळ्या भाबड्या भक्तांच्या आस्थेचे बाजारीकरण करुन कमावलेल्या वारेमाप संपत्तीच्या बळावर व प्राप्त समर्थकांच्या विरोधाच्या बळावर करत राहू तरुण वयातील कोवळ्या मुलीँवर लैँगिक अत्याचार आणि वाचून जाऊ भारताच्या कायद्यापासून... पण ते कदापि शक्य नाही... आणि आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर येताहेत भुतपूर्व पिडीत मुली एकेक करुण पुढे तुमच्या विरोधात खटले दाखल करण्यासाठी...
attachment.php?attach_id=904d3984046e6bd

आता तर तुमच्या विषयी फक्त प्राथमिक माहिती पुढे आलीय.. ये तो अभी ट्रेलर है मेरे आसा.. अब तो पुरी पिक्चर बाकी है... आता जेव्हा मी तुमच्या विरोधात इतर विविध पोलिस ठाण्यात पिडीतांद्वारे एफआयआर नोँद होताना पाहतो व तुमच्या आश्रामातीलच तुमच्याच भुतपूर्व सहयोग्यांचे तुमच्याचविरोधात मते व आश्रमासंबंधी वादग्रस्त प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रतिक्रीया ऐकतो तेव्हा मला वाटतं कि किती भोळे आहेत आमच्या भारतातील भक्त! आणि कसे फसवत होतात तुम्ही भाबड्या भक्तांना... अन् आम्हीही कसं विश्वास ठेवतो तुमच्यासारख्या स्वघोषित संतांवर स्वत:च्या बंद डोळ्यांनी... तुमच्यासारख्या ढोँगी बाबांची सत्यता कळल्यावर मी देवाला प्रार्थनाच करु शकतो की एक दिवस असा न येवो की जे खरंच स्वत:ला संत म्हणून फक्त म्हणवूनच घेत नाही तर वास्तविक वैयक्तिक जीवनात आचरणही करतात संतांसारखाच अशांवरचा विश्वास व श्रद्धेला कलंक लागू न देवो रे बाबा !! अन्यथा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत मीराबाई, संत कबीर, संत गोराकुंभार, संत हजरत मोहम्मद तादुद्दीन बाबा, संत चिश्ती बाबा, ईश्वरतूल्य संत साईबाबा, संत गजानन महाराज, विसाव्या शतकातील प्रबोधनकार राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज या व अशा कितीतरी तसेच ज्यांनी अखिल मानवजातीस ईश्वर दगडांच्या मंदिरात नसून माणसात आहे ही ग्राम स्वच्छतेच्या मूलमंत्रासोबतच बहूल्य शिकवण दिली त्या संत गाडगेबाबा महाराजांच्या महाराष्ट्र व भारत देशातील हिँदूंच्या धार्मिक अस्मितेला कदापि काळीमा फासला जाऊ नये; आणि कलंकाचा डाग तर सोडा पण छोटासा छिट्टा सुद्धा उडवला जाऊ नये...

अप्रिय आसाराम.. तुम्ही तर कलंकित झालातच पण आपल्या या दुष्कृत्यात मुलगा नारायण प्रेम साई सिरुमलानी ला सुद्धा सामाऊन घेतलंत... असा कोणता बाप असेल जो कुकर्मात स्वत:च्या मुलाला सामाऊन घेईल.. आणि असंच करायचं होतं तर का दिलं त्या बलात्कारी पोराला ईश्वरतूल्य साई बाबा चं पवित्र नाव... सुरत ठाण्यात दोन सख्ख्या बहिणीँनी त्याच्याविरुद्धही लैँगिक अत्याचाराचा खटला नोँदवलाय.. हे तर काहिच नाही.. या सर्व खेळात संपूर्ण कुटूंबच सहभागी आहे खरं तुमचा... अर्थात तुमची पत्नी लक्ष्मीदेवी व मुलगी भारतीदेवी सुद्धा... फक्त नावासमोर देवी लावल्यानं कोणी साक्षात देवी बनून जात नाही.. आता तर तुमचा अवघा परिवारच अदृश्य आहे खरं... ते सर्व गायब आहेत... तुम्हीच जाणोत कुठं असतील ते... कारण आपण तर 'साक्षात परमेश्वराचेच अवतार' आहात ना !!! माहित असेल तर सांगून द्या कुठे लपून बसलेत ते... सुरत पोलिस मागावर आहेत त्यांच्याही.. मला तर नारायण साईवर पुर्वीपासुनच संशय होता... जेव्हापासून एका पहाडी जंगलातील त्याच्या गुप्त गुफेबद्दल 'इंडिया टीव्ही' या अजून एका प्रसिद्ध राष्ट्रीय खाजगी वृत्तवाहिनीवर पाहिलं व ऐकलं तेव्हापासूनच... नुकतच ऐकायला मिळालं कि तुमचा मुलगा हि उठून सुटून निरर्थक बहाणेबाजी करतोय याचिकाकर्त्याँविरुद्ध.. आणि करु लागलाय खरं जाहिरात स्वत: निर्दोष असल्याची स्थानिक वृत्तपत्रांमधून.. पण आम्ही यावर विश्वास कसा ठेवावा.. एक म्हण आहे बघा आमच्यात "मंदीराची इमारत मजबूत असण्यासाठी सर्वप्रथम त्याचा पाया मजबूत असावा लागतो.." आणि इथे तर मंदिराचा पाया अर्थात परिवाराचा मुखिया म्हणजे तुम्हीच कलंकित असल्यावर मंदिर म्हणजे तुमच्या परिवारातील इतर सदस्यांवर या कलंकाचा एक छिट्टा उडाला नसेल हे शक्यच कसे आहे?? आणि जर तुमचा परिवार आहे निर्दोष खरोखरच तर येत का नाही समोर सुरत पोलिसांच्या.. का करावं लागतंय पोलिसांना त्याचा शोध ठिकठिकाणी 6 टिम बनवून...?

टिप:- हाच पत्र पुढे वाचा... [ 1 2 3]

No comments:

Post a Comment