Pages

Friday 17 January 2014

मी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक घडामोडी

हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्यासाठी CLICK करा
  • प्र.: आजपर्यँतच्या शिक्षणात कित्येक पैसा खर्च झाला परंतू कधीही पश्चात्ताप नाही केला की याचा योग्य फायदा झाला नाही वा जर वाचवला असता तर किती रुपये जमा असते?
  • उ.: शिक्षणात पैसा खर्च होणारच व मी चूक केली आहे हे खरे आहे पण पश्चात्ताप करुन काय फायदा?
  • प्र.: आजच्या Competition च्या जमान्यात D.Ed. करुन शिक्षक होण्यासाठी आवश्यक गुण घेऊन पात्र होण्याची ताकद आहे काय?
  • उ.: मी प्रयत्न करतोय व 10वी 12वीतील चुक सुधरवून खरंच मन लावून नि:स्वार्थी पणे 90% अभ्यास करुन कमीतकमी 80% घेण्याचा निर्धार केला आहे व "रेतीचे कण रगळीता तेल ही गळे" तर नशिबाद असली व देव तसेच मोठ्यांचा आशिर्वाद असला तर निश्चित एक दिवस पात्र होऊन शिक्षक होऊन दाखविन ही शाश्वती देतो कारण Competitionच्या जमान्यात पात्र होण्याची ताकद पूर्वीही होती व आताही आहे परंतु तीचा तेव्हा लाभ घेतला नाही मात्र आता जरुर घेईन.
  • प्र.: 12वीत ही 70% घेईन म्हणत होता परंतु 55.50%च मिळाले.
  • उ.: 12वीत मी अभ्यासच न करुन चूक केली होती व मनसमजवनी करत होतो. व खरे तर मला 60च्या वर अपेक्षा नव्हती. तिचा पश्चात्ताप झाल्याने मी नव्या जोमाने D.Ed. ला सुरुवात केली असून अभ्यास करुन 80% घेण्याचे बोलत आहे.
  • प्र.: तू सध्या Top 10 मध्ये हवा होता पण Bottom Ten मध्येही नाही.
  • उ.: मी D.Ed. मध्ये 100 पैकी Top 15 मध्ये आहे. व याचा Result Result नंतरच कळेल.
  • प्र.: रात्री उशीरापर्यँत जागून झोप पूर्ण होऊ न देता आरोग्यावर विपरित परिणाम होईल असा अभ्यास करुन काय फायदा?
  • उ.: अभ्यास कसा व किती तसेच केव्हा करायचा हा माझा Matter झाला परंतु आरोग्याची काळजी मात्र मी घेईनच.

वरील प्रकारे फत्त प्रश्न माझ्या बाबुजीँनी घरच्यांसमोर उच्चारले व त्यांच्या प्रश्नांना कंटाळून मी उपाशीच झोपून गेलो नंतर थोडासा जेवण (2 कोचईच्या वळ्या) घेऊन लिहित आहे.

असो! माझ्या वडिलांचेही बरोबरच आहे. त्यांच्या बोलण्याचा मला राग कधीच येत नाही परंतू खंत वाटते की ते आपल्या मनातील प्रश्न व शंका-कुशंका प्रेमाने माझ्याशी बोलून त्यांचे निराकरण करत नाही वा मला प्रेमाने समजावत नाही आणि माझ्यात तर त्यांच्यासमोर अशा मुद्द्यांबद्दल काही बोलण्याची हिँमतच होत नाही. परंतू मी त्यांचे बोलणे ऐकूण घेतो व पटलेली गोष्ट फायद्याची असतेच ती करण्याचा प्रयत्न करतो. असो!

किती वेळचा लिहित आहे. लिहीता-लिहिता हात दुखून गेले. तुमचा तोँड नाही दुखला का इतके वाचताना? चला झोपा! किती रात्र झाली. सगळे झोपले. रात्रीचे 11.15PM वाजले."
Good Night

वाचक मित्रांनो माझ्या सदर पत्र लिहून झाल्यानंतर शेवटी मी काही स्पष्ट करु ईच्छितो...

वरील नोंद माझ्या दैनंदिनीत / डायरीत अर्थात 'राजूच्या रोजनिशीत' 26/10/2009 रोजी.. परत वर्ष नीट वाचा.. 2009.. मध्ये लिहिलेला असल्याने हि परिस्थिती 'तेव्हाची' होती.. आता काळासोबतच परिस्थितीही बदलली.. आणि या प्रश्नोत्तरामुळे कदाचित आपला गैरसमज होऊ शकतो कि माझे बाबुजी तेव्हा वरील प्रश्नांबाबत (माझ्याबाबत काळजीग्रस्त) असले तरी खर्च वगैरेबाबत खुप चिँताग्रस्त होते वगैरे..! हे सत्य नसून त्या 'क्रॉस कनेक्शन' फोन कॉलमुळे माझ्यावर आलेला संताप बाहेर काढण्याकरिता त्यांना वरील प्रश्न उच्चारावे लागले होते आणि तसे करणे रास्तही होते.. त्या प्रश्नांचे मी समक्ष त्याच वेळी उत्तरे देऊ शकलो नसलो (जाणून दिले नसले) तरी त्याच वेळी माझ्या मनात जी उत्तरे होती ती वर नोँदलेली आहेत.. त्यादिवसानंतर बाबूजीँच्या तोँडून त्यांनी माझ्या शिक्षणावर केलेल्या खर्चासंबंधी 'ब्र' ही विचारल्याचे माझ्या लक्षात नाही.. कारण मुळातच तो त्यांचा स्वभाव नाही.. आता 'त्या' गोष्टीला 4 वर्षाहून अधिक दिवस झालेत.. माझं डीटीएड 2011 मध्येच पुर्ण झालं.. माझा निकाल आपणास माहितच असेल.. आणि नसेल तर मी या पत्रमालिकेच्या शिर्षकाप्रमाणे 'मनातल्या मनात' दिलेल्या उत्तराचे परिहार्याने वचनाचेच काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता आपणास लागलेली असेल; पण ते थोडं गुलदस्त्यात सिक्रेट ठेवुयात.. वाचत राहा ही पत्रमालिका म्हणजे कळेलच आपणास माझा निकाल आणि डीटीएड काळातील माझं जीवनसुद्धा... आणि हो मी वरील प्रश्नांची प्रत्यक्ष उत्तरे देऊ शकलो नाही याचा अर्थ काही भलताच लावू नका बरं का! आणि आपला अजून एखादा गैरसमज होऊ नये म्हणून सांगूनच टाकतो.. आमचं एकमेकांवर तेव्हाही प्रेम होतं आणि आताही भरपूर प्रेम आहे कारण "माझे बाबूजी जगातील 'बेस्ट' बाबा आहेत..."

तुमचाच
राजेश

ता.क.- पत्रातील नोँद मुळ 2009 मध्ये लिहिले असल्याने प्रसिद्ध करताना जाणीवपुर्वक व्याकरणीय चुका दुरुस्त केलेल्या नाहीत.

मुळ लेख- 26 ऑक्टो. 2009 (आमगाव)
प्रसिद्धी- 17 जाने. 2014 (आमगाव)

अणुक्रमणिका (कादंबरी/मनातल्या मनात)

मी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक घडामोडी

दिवस- 481 वा

अनुदिनी- 95 वी

मनातल्या मनात - पत्र 3

राजूची रोजनिशी 1 (कादंबरी-3)


"मनातल्या मनात" या पत्रमालिकेतील पुढील पत्रात माझ्या बाबुजीँच्या प्रश्नांची उत्तरेच मी 'मनातल्या मनात' दिलेली असल्याने सदर पत्र माझ्या बाबुजी लाच पाठवतोय..
तिर्थरुप बाबुजीस,

कदाचित तुम्हाला आठवत नसेल पण 26 ऑक्टोबर 2009 रोजी तुम्ही रागाच्या भरात मला काही प्रश्न विचारले होते... त्या प्रश्नांची उत्तरे मी तेव्हा तुम्हाला देवू शकलो नव्हतो परंतु त्याच दिवशी मी ते सर्व प्रश्न माझ्या डायरीत नोँदून त्यावेळचे माझ्या मनातील उत्तरे तिथे लिहिले होती ती अशी-

मी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक घडामोडी

"आज दि. 26 ऑक्टोबर 2009. आज मी दैनंदिनी लिहिणार नव्हतो परंतु लिहित आहे व लिहिण्यामागे कारण एकच ते खालीलप्रमाणे-
मी खाली आज माझ्या घरी केलेल्या चुकांमुळे किती ऐकलो व काय चुकले तसेच घरी आता का गप्प राहतो व खरंच माझ्या मनात काय आहे ते खाली स्पष्ट करत आहे-
आज नेहमीसारखाच योग्य व सहज दिवस जाईल असे वाटत होते, परंतु बाबुजी '[वसन] स्टेशनरीत' बाकी असलेले पैसे देण्यास गेले व मला फोन केला. मी फोन उचलला बाबुजींचा पण Line वर होते [मुकेश निवारे] व बाबुजीँनी मला फोन करुनही Line वर बोलले कुणीतरी अजय ज्याला [मुकेश] शी बोलायचे होते. माझ्या मते बरोबर नंबरवर फोन लावून चुकीच्या जागी फोन लागल्यास दिमाग खराब होईलच. मी बाबूजीला त्याच नं. वर फोन केला तर कळले की बाबूजीचा फोन चुकीच्या जागी बरोबर नं. असूनही लागला होता.

असो त्यांनी दुकानदाराकडे 80/- बाकी असल्याचे माझ्याकडून पुष्टि करुन घेतले व घरी आल्यावर माझ्या शिक्षणावर त्यांनी केलेल्या खर्चावर तसेच मी दिलेल्या गुणांच्या मोबदल्याबद्दल संताप व्यक्त करीत होते.

मी तेव्हा त्यांच्या एकाही प्रश्नावर बोलू शकलो नाही. परंतु त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर जे त्यांचा समाधान करु शकतील; असे प्रश्न व उत्तर खाली लिहित आहे -↓

  • प्र.: राजेशने दहावीत जी चूक केली तीच चुक बारावीत केली तर याची शाश्वती काय की तो D.Ed. मध्ये ती चूक करणार नाही?<
  • उ.: मी दहावीत चुक केली ती माझी नादाणी होती परंतु मी 12वीत चुक केली हे जाणतो व त्याचे फळ मी भोगलेले आहेत ते कसे बघा- मला 12वीत PCM ग्रुप मध्ये 7 गुण कमी पडले व D.Ed. मध्ये रामटेक येथे D.Ed. करावे लागत आहे. व राहीली गोष्ट शाश्वतीची तर मी जेव्हा 10वी व 12वीत होतो तेव्हा आमगावच्या घरीच तेव्हा घरात मनोरंजनाचे साधन वगैरे होती त्यामुळे तितका वेळ जात होता तसेच इतके वाजतापर्यँत अभ्यास कर ताण घेऊ नको हे बोलणे त्यामुळे लवकर झोपण्याचा धाक जो तेथे Single व Separate खोलीत राहणार नाही व तेथे मनोरंजनाचे साधन नसल्याने मी अभ्यास करीनच. शिवाय माझ्या मते "जर विद्यार्थी पालकांना सोडून बाहेरगावी जात असेल तर तो तेथे अभ्यास करतोच कारण त्याला माहीती असते की माझ्या पालकांना माझ्याकडून किती अपेक्षा आहेत, व ते किती खर्च करत आहेत; आणि तो जिद्दीने अभ्यास करतो."
  • प्र.: राजेशने 10वी 50.46% 12वीत 55.50% घेतले तर घेऊन-घेऊन D.Ed. मध्ये किती घेऊन घेईल?
  • उ.: मी 10वीत 15% अभ्यास करुन तसेच 12वीत 35% अभ्यास करुन तितके गुण प्राप्त केलेत व D.Ed. मध्ये मी 100% नाही म्हणणार पण 95% प्रयत्न करुन 90% तर निश्चितच अभ्यास करेन. तसेच D.Ed. मध्ये 50% Passing असल्याने 10वी 12वीतील 35% ची व 12वीत मिळणाऱ्या Practicals मुळे Theory ची काळजी नव्हती परंतू D.Ed.मध्ये दोघांमध्ये वेगवेगळे 50% घ्यावे लागत असल्याने अधिक अभ्यास करीनच व त्याचा फळ मला मिळणार नाही का? मी D.Ed. मध्ये 90% घेण्याचा निश्चय केले आहे व 80% तर घेईनच. याची शाश्वती देतो.
  • प्र.: P.E.T.चे ते 3 शिक्षक आले व त्यांच्या बोलण्याने करायचे नसूनही P.E.T. जॉईन केली.
  • उ.: ती माझी सर्वात मोठी चुक होती. व तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात नव्हती.
  • प्र.: P.E.T. 200पैकी फक्त 74 गुण आले.
  • उ.: P.E.T.ही Competition Exam आहे. त्यामुळे कितीही अभ्यास करणारा विद्यार्थी कमी वा बुद्धू विद्यार्थी 100 च्या वर गुण घेऊ शकतो व मी खरं सांगु तर तेथे 75% अभ्यास केला होता व मला कमीतकमी 90 गुण अपेक्षित होते.
  • प्र.: P.E.T. मध्ये डूबलेल्या 20,000/- रुपयांविषयी राजेशला एकदाही पश्चात्ताप वाटला नाही की जर तो 1.5 (दीड) महिना हवा नसलेला Course केला नसता तर 20,000 रु /- घरी असून एखादी कोणतीही वस्तू झाली असती असा त्याने कधी घरी विषयही काढला नाही.
  • उ.: मला पश्चात्ताप झाला पण पश्चात्ताप करुन किँवा ती गोष्ट घरी काढून त्या गोष्टीची पून्हा आठवण केल्याने काय उपयोग म्हणून मी ती विसरण्याचा निर्णय घेतला आहे तसेच तशी चुक पुन्हा माझ्याशी कधी होणार नाही याची काळजी घेत आहे परंतू कितीही प्रयत्न केल्याने मी ते विसरु शकत नाही व कधी कधी डोळ्यातून टपटप अश्रू सुद्धा पडतात पण कोणाला सांगणार शेवटी चुक माझीच होती.

[ ]- नावे बदललेली आहेत.
याच पत्राचा पुढील पान वाचण्यासाठी CLICK करा

Friday 10 January 2014

दिवाळीच्या सुट्ट्यातील मजा

दिवस- 474

अनुदिनी- 94

मनातल्या मनात- पत्र 3

राजूची रोजनिशी (कादंबरी)- पत्र 3


माझ्या "मनातल्या मनात" ह्या पत्र मालिकेतील पुढील पत्र...

दिवाळीच्या सुट्ट्यातील मजा

राजेश,
4 नोव्हेँबर 2013 च्या रात्री आमची सर्वात लहान बहिण जन्माला आली त्यात तु तसं 1 नोव्हेँबर 2013 पासूनच नोँद केलीय म्हणा.. आणि हो तु माझं जे नामकरण केलंस ते मला खुप आवडलं- 'कादंबरी'.. काय नाव निवडलंस तू माझ्यासाठी.. अरेहो आठवलं मी संग्रहित केलेल्या निवडक पत्रांवरुनच तर तू तूझी पहिली कादंबरी "माझी ताई : एक आठवण" लिहिलास ना.. म्हणूनच माझं नाव तू 'कादंबरी' ठेवलस आणि ते समर्पकही वाटतं.. तर असो तु मला पाठवलेल्या पत्रानंतरची घडामोड मला पत्रानं पाठवण्यास सांगितलं होतं खरं.. पण ऑक्टोबर 2009 च्या 5 ते 9 तारखेत तू काही विशेष नोंदवलं नसल्याने मी थेट त्यापुढील पत्र पाठवते.. आमच्या 5व्या धाकट्या बहिणीच्या जन्माच्या पुढल्याच दिवशी 5 नोव्हेँबर 2013 रोजी भाऊबीज होती.. म्हणजे दिवाळीच... तर 2009 मधील दिवाळीच्या सुट्ट्यातील मजेविषयी 25 ऑक्टोबर ला तु मला सांगितलं होतस.. तेच आज मी तुला सांगते-

आज मी 16 दिवसांच्या नंतर दैनंदिनी लिहीत आहे आणि तोही आमगावात. असो मी 10 तारखेला दैनंदिनी लिहीणार होतो परंतू काही कारणास्तव विसरलो. त्या दिवशी आम्हाला कळले की जरी 12 पासून DIET कडून सुट्या जाहीर झाल्या असल्या तरी 14 तारखेला कॉलेजचा 'वर्धापन दिन' असल्याने 14 तारखेपर्यँत कॉलेज होती हे कळताच वर्गातील सर्वच छात्राध्यापकांना धक्काच बसला कारण जवळपास बाहेरगावच्या सर्वच विद्यार्थ्याँनी गावी जाण्यासाठी Packing करुन घेतली होती व मी ही त्यातलाच एक होतो. परंतु परवानगी मिळताच आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.

नंतर मनात 3 तारखेपर्यँत आणि त्याही बाकीच्यांपेक्षा अधिक सुट्ट्या असल्याने व 6 दिवसांनी आमगावी आल्याने मनात उत्कंठा निर्माण झाली होती. मी इंदोरा (ता. तिरोडा जि. गोँदिया) येथे जाऊन माझा मामेभाऊ विजय हरीशंकर रेवतकर याचे आमगावला परत येऊन माझा भाऊ विवेक दशरथ हजारे याचे मानसशास्त्रातील अनुक्रमे '6 ते 10 व 11 ते 14 वयोगटातील दोन बालकांचे अवलोकन' करण्याचे प्रयोग लिहीले व त्यानंतर भारतीय समाज आणि प्राथमिक शिक्षण या विषयातील महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहितीपुस्तिका तयार करण्याचे प्रयोग पूर्ण करुन मंगळवार दि. 20/10/09 ला सायंकाळच्या ट्रेनने तिरोडा रेल्वेस्थानकावरुन दामू मामाजी सोबत इंदोऱ्याला गेलो व लगेच बुधवारी माझे मोठे वडिलांचे गाव मु. पांजरा (रेँगेपार) पो. मोहगाव (खदान) ता.तुमसर जि. भंडारा येथे गेलो त्यादिवशीही तिरोडा बसस्थानकावर 4.45PM च्या गाडीसाठी 5.45PM पर्यँत वाट पहावे लागले व रात्री 7.00 वाजता नावेने पाण्यातून पांजरा गाठावे लागले. माझ्या नशिबात असेल म्हणूनच कदाचित मी 'देवपूजी'च्या ही कार्यक्रमात उपस्थित राहू शकलो. दुसऱ्या दिवशी गुरुवारला पांजरा येथे घराजवळच मंडई व ड्रामा असल्याने मी तेथेही उपस्थित झालो.

आश्चर्याची बाब म्हणजे गावात हजारे परिवार सोडून कोणाचीही ओळख नसतांना रात्री 9 ते 9.30 दरम्यान मी माझी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची कला लपवू शकलो नाही व शेवटी 9.40 मिनिटांनी रात्री मला 'यंदा माझा लगन करून दे बाबा' हे जवळपास 20ते30 मिनिटांचे एकपात्री नाटक अवघ्या 10 मिनिटात सादर करण्याची संधी मिळाली व म्हणतात ना "मिळालेली संधी कधीही सोडू नये" तर मी ती नाटक 10 मिनिटात संपवण्यासाठी सज्ज होऊन अवघ्या 4 मिनिटात जवळपास अर्धी नाटक संपवली होती व माझ्याकडे कमीतकमी 5 मिनिटांचा व नाटक पूर्ण करण्यास पुरेसा वेळ शिल्लक असूनही त्यांचे ड्रामा कलाकार घाई करत असल्याने मला तेथेच माझी नक्कल थांबवावी लागली तरी माझ्यासाठी गर्वाची बाब म्हणजे तेथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला माझी नक्कल आवडली व काही ड्रामा बघणाऱ्यांच्या मते त्यांच्या ड्राम्यापेक्षा माझी नक्कल छान होती. व अशाप्रकारे अनोळख्या गावातही मी माझे नाव फक्त अर्धी नाटक सादर करुनसुद्धा लोकांच्या मनात उमटवले की तो "दसरथ भाऊचा पोरगा होता."

असो मी शुक्रवारी इंदोरा शनिवारी तिरोडा येथे येऊन आज शेवटी दिवाळीचा गावतर आटपून थेट तिरोड्याहून बसने आमगावला आलो.

तत्पूर्वी मुख्य बाब म्हणजे नेहमीप्रमाणे याही वर्षाची दिवाळी आमच्यासाठी आनंदाची राहीली व एक गोष्ट तर विसरलोच.

!HAPPY DIWALI! & !Good Night!

अरे Good Night काय म्हणतोस.. वास्तवात आज 10 जानेवारी 2014 ची संध्याकाळ आहे.. GOOD EVENING म्हण.. मागच्या पत्रात तू दिवाळीला फटाके फोडत नसल्याचे लिहिलास हे खरय.. पण आपली हौस भागवण्यासाठी दारासमोर मच्छर मारण्याची बॅट धरुन फटाक्यांचे आवाज काढत होतास त्याचे काय? अरे मी विनोद करतेय.. त्यानही तु मच्छर मारुन पर्यावरणाचे रक्षणच करत होतास म्हणा.. तर 5 नोव्हेँबर 2013 लाच भाऊबीज पार पडली.. मी जाणते या नात्यातील तुझं दुर्दैव.. पण तू तूझ्या बहिणीला जे काय सांगायचंय ते मला सांगत आलायस.. तर आज तुझी बहिण म्हणून मी तूला ओवाळणी घालतेय या पत्राद्वारे.. आणि माझं गिफ्ट..?? खरंच किती कंजूष आहेस रे राज्या तू...!! मी जाणते आता तू गावी जात असशील मामाच्या.. मी तुझ्या पिशवीतच तर आहे ना.. हे अर्धे पत्र मी रेल्वेत बसून लिहिले.. तर पुरे झाले आता लिहिणं थांबवते.. मामाच्या गावी मजा घे..

भाऊबीजेच्या हार्दीक शुभेच्छा..!

तुझीच
कादंबरी (डायरी नं. 1)
To
राजेश डी. हजारे

ता. क. - पत्रातील लाल अक्षराने लिखित मजकुर 6 नोव्हेँबर 2013 रोजी लिहिलेला आहे.

यंदा माझा लगन करुन दे बाबा (Youtube वर Video पहा)

Wednesday 8 January 2014

Gandhi Jayanti va Fatakemukta Diwali Vishesh

टिप- हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आजही सगळीकडे दिवे, पणत्या लागल्यात.. अंधारावर प्रकाशाचा अर्थात दुष्टावर सत्य व देवाचा विजय म्हणून दिवे लावतात वाटते.. सर्वीकडे रोषणाईच रोषणाई असते.. दिवाळीला लहाणांपासून तर मोठ्यांपर्यंत फटाके फोडतात.. मस्त आतिषबाजी होते.. Rohit-Sharma-209-runs-in-ODI.jpg
रोहित शर्मानं तर परवाच फटाके फोडले बघ बॅटने विश्वविक्रमी 16 षटकार मारुन 209 धावा बनवत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बंगळुरु मध्ये.. आणि भेट पण दिली आम्हा भारतीयांना सामना व मालिका विजयाची..
आम्ही पण फटाके फोडायचो लहानपणी.. पण आतासारखे विचित्र प्रकरण नव्हते.. आता नवनवे वेगवेगळे फटाके आहेत.. दिवाळीला फटाके फोडायला माझा विरोध नाही.. या सणाला नाही तर केव्हा फोडणार फटाके..? पण मर्यादा पाहीजेच ना कुठेतरी.. माझे बाबुजी नेहमी म्हणतात.. "प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. एखादी गोष्ट मर्यादेबाहेर गेली कि त्याला उपाय नसतो.. आणि परिणाम घातकच असतात नेहमी." आणि हल्ली फटाक्यांमुळे किती प्रकारचे प्रदूषण होते नाही.. ध्वनी प्रदूषण, वायु प्रदुषण.. काही संस्था व समाजसेवक पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी इकोफ्रेँडली सण साजरे करण्याचा सल्ला देतात.. पण आम्हा सनातनी हिँदूंना वाटतं असं आमच्याच सणाच्या वेळी का? मी विरोध होतानाचे बरीच उदाहरणे जवळून बघितलीत.. तर मला वाटतं कि आपण असा विचार करण्यापेक्षा आपल्यापासूनच का सुरुवात करु नये इकोफ्रेँडली सण साजरा करण्यास.. ते चुकीचं तर नाही ना.. पर्यावरण सुरक्षा तर चांगलीच बाब आहे.. मग का 'पहल' करु नये आपल्यापासूनच.. म्हणून मी स्वत:बद्दल सांगू ईच्छितो कि मी तीन वर्षाँपासून रंगपंचमीला रंग उधळत नाही व हे तिसरे वर्ष आहे दिवाळीला फटाके फोडत नाही.. मी जाणतो कि माझ्या एकट्यामुळे काहि पर्यावरणाचे खुप मोठे रक्षण होणार नाही.. पण माझ्यामुळे जे प्रदुषण होणार होते ते मात्र मी नक्कीच टाळू शकतो.. यामुळे खुप काही साध्य होणार नसले तरी त्यातून मिळणारा आत्मिक समाधान आहे तो मी वर्णन करु शकत नाही.. आणि माझ्यामुळे प्रेरीत होऊन वर्षाला एक जरी व्यक्ती माझे अनुकरण करु लागला तरी माझ्यासाठी खुप आहे.. तर काय कराल साजरी फक्त एक वर्ष फटाकेमुक्त दिवाळी.."

1017228_170811723117899_388612023_n.jpg1394448_487508704698370_243684193_n.jpg

"शेवटी दिपावली व नुतन वर्षाच्या आपण सर्वाँना हार्दीक शुभेच्छा..!!"

आणि हो साक्षात आज 8 जानेवारी 2014.. 2013 वर्षाच्या शेवटचा आठवड्यात 27 डिसेँबर जरा निराशाजनक गेला पण 29 डिसेँबर थोडा विशेष होता.. त्यादिवशी 'अनाथांची माई' म्हणून परिचित ज्येष्ठ समाजसेविका सौ. सिँधुताई सपकाळ यांच्याशी भेट जी झाली.. 1517683_516255598490347_1182537977_n.jpg1512444_516255601823680_1744579024_n.jpg1525668_453472721419558_966376816_n.jpg544596_517471025035471_2041389027_n.jpg
2013 ची अखेर जरा बरी झाली.. नविन वर्ष 2013ची सुरुवातही छान झाली... कालच सासवड जि. पुणे येथे 3,4 व 5 जानेवारीला भरलेल्या '87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-2014' च्या निमित्ताने पुणे येथून परतलो.. त्यासंदर्भात सविस्तर लिहिनच म्हणा.. 1522148_519591581490082_1990800156_n.jpg तर पाठव पत्र परवा मग मला तु पण.. चल भेटु पुन्हा.. बाय..

डायरी लेखक- राजेश डी. हजारे (RDH)

मुळ लेख- 03/10/2009, रामटेक
प्रथम प्रसिद्धी- 04/11/2013, फेसबुक
अद्ययावत लेखन- 03/01/2014 (शुक्रवार), MHADA/म्हाडा, सासवड जि. पुणे
पुनर्प्रसिद्धी- 08/01/2014 (मंगळवार), आमगाव

अणुक्रमणिका

Gandhi Jayanti va Fatakemukta Diwali Vishesh

अनुदिनी 92वी

दिवस 472वा

पत्रमालिका- मनातल्या मनात (पत्र 2)

राजूची रोजनिशी-1.कादंबरी (पत्र 2)

माझ्या "मनातल्या मनात" ह्या पत्र मालिकेतील हे पत्र काही कारणास्तव उशीरा म्हणजे आता पोस्ट करतोय...

गांधी जयंती (2/01) व फटाकेमुक्त दिवाळी विशेष

प्रिय डायरी नं 1..
काल तु मला पत्राद्वारे माझा 1 ऑक्टोबर 2009 रोजीचा पहिला संदेश पोचवलीस.. खरंच मी तुमचं बारसं करायचं विसरलोच होतो बघ.. पण झालं ते एकदाचं...
तु मला गांधी जयंतीबद्दल तुला सांगितलेलं पत्राद्वारे पाठवणार होतीस.. पण म्हटलं ते तर मला माहिती आहे तर मग आपणच ते सर्व तुला परत सांगून देउनच टाकूयात ना सरप्राईज..
आज 3 ऑक्टोबर 2009. काल 2 ऑक्टोबर 09.. 2 ऑक्टोबर म्हणजे म. गांधी तसेच लाल-बहाद्दूर शास्त्री यांची जयंती. काल म. गांधी जयंतीची सुटी होती व आज शनिवार 'हाफ डे' असल्याने आमचा कॉलेज सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेवर लागला.

आमच्या कॉलेजात 2 ऑक्टो. ला सरकारी सुटी असल्याने गांधी जयंतीचा कार्यक्रम आज दि. 3/10/09 ला घेण्यात आला. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे या महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन डी.एड. चे विद्यार्थीच करतात त्याप्रमाणे डी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याँनी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहूणे, प्रमूख वक्ता तसेच सुत्रसंचालन व स्वागत ही द्वितीय वर्ष डी.एड. चे विद्यार्थीच होते. या कार्यक्रमात मी माझा स्वलिखित गीत 'म. गांधी आणि आपण' सादर केला व मला छान टाळ्यांची दाद मिळाली. या कार्यक्रमातील स्वप्नील नागदेवे चा स्वलिखित गीत मला सुद्धा आवडला व त्या गीताबद्दल सरांनी (प्राचार्य मनिष कोल्हे) त्याला पेन गिफ्ट केली. व कार्यक्रमात गीत, भाषण, भजन सादर झाले तसेच बी.एड.च्या विद्यार्थीनीने संस्कृत मध्ये आभार प्रदर्शन केले.

नंतर आम्हाला मॅडमनी कार्यक्रमात झालेल्या चूका विचारुन पुढील कार्यक्रम आयोजित आम्हाला करायचा असल्याची सुचना दिली व पहिल्याच कार्यक्रमात आम्ही प्रथम वर्षाचे नविन विद्यार्थी असून सहभागी झाल्याने डोँगरे मॅडमनी माझी व स्वप्निलची भरभरुन स्तुती केली. तत्पूर्वी रामटेके सरांनी शारीरिक शिक्षणाबद्दल माहिती सांगितली.

व मी आज मेसच्या पैशांसाठी आमगाव ला जात आहे.

तर प्रिय रोजनिशी.. त्यादिवशी तुला मी वरील गोष्ट सांगितली होती.. अर्थात आता परत तुला ते पत्र पाठवण्याची गरज नसल्याने बुधवारी मला थेट यापुढील पत्र पाठव..

अगं मी हा पत्र आज पाठवत असलो तरी हे 4 नोव्हेँबर 2013 लाच लिहिलं होतं.. काय ते वाच..
"नेरवा धनत्रयोदशी.. आता विचारशील काय खरेदी केलं? पण खरं सांगू.. काय सोनं..? तुला माहित आहेत का काय भाव आहेत सोन्याचे.. 30 हजाराच्या जवळ गेलाय प्रतीतोळा.. हो ना "सोन्याचेही भाव वाढलेत आजकाल...!" मग काय.. सर्वांनी पुर्वीच कपडे खरेदी केले होते.. म्हणून मग मी धनतेरसला दोन जोडी कपडे खरेदी केले.. परवा होती नरक चतुर्दशी.. त्याचा मला इतिहास माहित नाही.. माझी आई जाणते बघ हिँदू धर्मातील सगळा पोथीपुरान.. तिला विचारुन सांगितलं तर पुस्तक तयार होईल या एकाच दिवसावर.. काल लक्ष्मीपुजन.. आज बलिप्रतिपदा व उद्या भाऊबीज.. लक्ष्मीपुजेपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते बघ..

टिप- हेच पत्र पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.