Monday 18 March 2013

कायद्यात 'सुधारणा' कि समस्यांना आमंत्रण !!!

[FIRST PAGE | SECOND PAGE|PREVIOUS/THIRD PAGE|LAST PAGE]

आता आपण म्हणाल कि विवाह वयोमर्यादा कमी केल्यास मुलीँच्या शिक्षणासारख्या अमुल्य बाबी दुर्लक्षित होतील . . . पण मला विचारावसं कि आज हे प्रमाण 21-18 असे असताना किती तरूण-तरूणी नेमक्या याच वयात विवाह करतात? ही वयोमर्यादा ओलांडल्यानंतरही ज्यांना शिक्षण पूर्ण करून 25-22 या वयात तरूण-तरूणी सामान्यत: विवाह करतात... तसे विवाहाची वयोमर्यादा कमी केल्यासही उच्च शिक्षण पुर्ण करून, विवाहासाठी थांबून अथवा ज्यांना उशिराच लग्न करायचंय ते त्यांना तसं करता येईलच की....

मला जाणीव आहे कि लग्नाची वयोमर्यादा कमी करण्याचा सल्ला देत असल्यामुळे जनतेचे ताशेरे माझ्यावरच ओढवले जाणार! माझ्या काही मित्र-मैत्रिणी, परिचित, आणि वाचकमंडळींचा माझ्याप्रतीच कदाचित नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल... पण या गोष्टीने सहसा माझ्या विचारात तरी बदल होणार नाहीये... काहीं वाचकांना सदर ब्लॉग पुढील एप्रिल महिन्याच्या 18 तारखेस 22व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या राजेश डी. हजारे (RDH) च्या तरूण वयाबद्दल विश्वास निर्माण होणार नाही व वाटेल कि सदर विचार कुण्या 40-50 वर्षाच्या ज्येष्ठ विचारवंताने तर मांडले नाहित ना! त्या सर्व वाचक मंडळीँना मी एवढेच सांगु ईच्छितो कि मी (या ब्लॉग चा लेखक) कुणी ज्येष्ठ विचारवंत नसून साधा तरूण उदयोन्मुख पण या लिखाणक्षेत्रातील 9 वर्षाँचा अनुभव असलेला 20 वर्षीय नवोदित साहित्यिक आहे... होऊ शकते माझ्या विचारांमध्येदेखील कुठे वादग्रस्त मत व्यक्त केलेला असू शकतो... पण मला सदर लेखातून कोणत्या वाद निर्माण करायचा नसून माझ्या अभ्यास व निरिक्षणानंतर मला जे वाटलं वा जाणवलं तेच मी व्यक्त केलं...

म्हणूनच मला असं वाटतं कि शासनाने संमतीवय (Age of consent) 18 वरून 16 असे कमी करून ब-याच समस्या ओढवून घेण्यापेक्षा तोच हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने लग्न वयोमर्यादा 21-18 वरून 19-16 अशी कमी करण्याचा एकच कठोर निर्णय घेऊन संमतीवय कमी केल्यामूळे भविष्यात निश्चितच निर्माण होणार असलेल्या कितीतरी समस्यांवर तोडगा काढता येईल...

शिवाय बलात्कारासारख्या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी केँद्रीय व राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षणात (संक्षिप्त) व माध्यमिक शिक्षणात (विस्तृत) 'लैँगिक शिक्षण' हा विषय समाविष्ट करून योग्य वयातच व वयाच्या आवश्यक टप्प्यावर विद्यार्थ्याँना लैँगिक शिक्षणांतर्गत शारिरीक व लैँगिक बदल (विकास), Sex ही प्रदिर्घ संकल्पना स्पष्ट करून, सुरक्षित संबंधाबद्दल मार्गदर्शन, सुरक्षित/असुरक्षित दोन्ही Sex चे फायदे व तोटे तसेच परिणाम या सर्व बाबीँची माहिती करून देता येईल...
consent-logo.jpg
शिवाय आजचा समाज पुरूषप्रधान आहे... आम्ही कितीही महिला-पुरूष समानतेच्या आणाभाका मारत असलो (बहुतेक बाबतीत हे सत्यही आहे) तरी घराघरातलीच परिस्थिती अगदी याउलट आहे हे ही अवास्तव सत्य आपणास नाकारून चालणार नाही. समाजाची ही मानसिकता बदलणे अधिक गरजेचे आहे.
आज घरा-घरात दुरदर्शन संच (TV) आहेत... प्रत्येकच वयातील मानवाला TV पाहणे आवडते... शिवाय लहान बालके अनुकरणप्रिय असतात व चित्रपट, मालिकांमधील प्रत्येकच दृश्य त्यांना खराखुराच वाटतो... आज पारिवारीक कार्यक्रमांमध्येदेखील अनावश्यक ठिकाणी फक्त TRP/Box office वरील यशासाठी हिँसक/अत्याचाराच्या दृश्यांची संख्या कमी नाही... आवश्यक ठिकाणी मोजक्या वेळी पारिवारीक कार्यक्रमात असे दृश्य असल्यासही हरकत नाही; पण पारिवारीक चित्रपट, मालिकात अनावश्यक ठिकाणी फक्त Rating साठी अशी दृश्ये टाकण्यापूर्वी त्या बालकांमध्ये नकारात्मक प्रतिमा तर निर्माण होणार नाही ना! याचाही विचार व्हावयासच व्हावा असे मला कळकळीने वाटते...
आशा करूयात की खरोखरच शासन परत एकदा फेरविचार करेल व संमतीवय 18 चे 16 करण्यापेक्षा विवाहमर्योदा 21-18 वरून कमी करून 19-16 अशी करेल . . .

-राजेश डी. हजारे (RDH)

(गोँदिया जिल्हाध्यक्ष - अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे)

Sunday 17 March 2013

कायद्यात 'सुधारणा' कि समस्यांना आमंत्रण !!!

[FIRST PAGE | PREVIOUS PAGE | THIRD PAGE]

भारत हा सभ्य व सुसंस्कृतांचा देश म्हणून अवघ्या जगात ख्यातनाम आहे. भारताची संस्कृती संपूर्ण विश्वापुढे एक आदर्श निर्माण करते. मग अशा सभ्य व सुसंस्कृत देशात विवाहपूर्व शारिरीक व लैँगिक संबंधांना कायद्याने मान्यता (संमतीवय कमी करून) शासन काय साध्य करू ईच्छिते? केंद्र शासनाला पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार करायचाय का !!! याबतीत तर पाक, अफगाण व ईराण चा कायदा बरा! (असं समजू नये कि मी त्या देशांची बाजू घेतोय)

भारतात विवासाठी कायद्याने पुरुषांसाठी 21 व महिलांसाठी 18ची वयोमर्यादा आखुन दिलेली आहे... तरीदेखील महाराष्ट्रातील मराठवाडा सारख्या विभागात बालविवाह होतातच... मी त्या क्षेत्रात राहिलेला असून 'IBN लोकमत' सारख्या राज्यातील नामांकित मराठी वृत्तवाहिनीने हा धक्कादायक प्रकार जगासमोर आणलाय... राजस्थान, हरियाणा सारख्या राज्यात आजही बालविवाहांची संख्या कमी नाही... मी फक्त उदाहरणादाखल वरील नामोल्लेख केला असला तरी इतर राज्यातील परीस्थिती काही वेगळी नाही. जर हा 'फौजदारी कायदा सुधारणा विधेयक 2013' अंमलात आला तर 16 वर्षाँनंतरच कायद्याने अवैध बालविवाहांचेही प्रमाण वाढेल. आज अधिकतर जनता (विशेषत: मुलीँचे) मत असे आहे कि काय सरकार लग्नाचेही वय कायद्याने कमी करेल का? मी म्हणतो कि त्यात काय चुकीचे आहे? हं नकारात्मक बाबीँचा विचार केल्यास निश्चित त्यामध्येही काही त्रुटी असू शकतात... मी जाणतो की मी लग्नाचे वयोमर्यादा कमी करण्यास सहमती दर्शवत असल्याने चहुबाजूंनी माझ्यावर विरोधी प्रतिक्रियांचाच भडीमार होईल. तरी मी आपल्या भूमिकेवर ठाम असून या विचारामागील सत्यता आपल्या निदर्शनास आणून देऊ शकतो... हं या विषयावर माझा परिपूर्ण अभ्यास नसल्याने, मी यातील तज्ज्ञ नसल्याने अथवा हे माझे क्षेत्र नसल्याने मी माझी भुमिका स्विकार करण्यास आपणास बांधिल मात्र करू शकत नाही... तरीही जे मी निरिक्षण केलं, अभ्यासलं, मला जाणवलं वा माझ्या निदर्शनास आले ते मी या ब्लॉगच्या माध्यमाने समाजासमोर मांडतोय...

ज्यांच्या मते मुली 16 वर्षाँमध्ये मानसिकदृष्ट्या परिपक्व (Mentally Mature) नसतात त्यांना मागे मी मानसशास्त्रीयच आकडेवारी दिली आहे. मी बालविवाहाचे (Child marriage) मुळीच समर्थन करीत नाही. आणि शासनाने संमतीवय (Age of consent) 18 वरून 16 केल्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे ही नमूद केलय... उदाहरणार्थ-- पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार, वाढते बलात्कार, कायद्याचा दुरूपयोग, अवैध बालविवाह, अविवाहित माता, अवैध गर्भपात, भ्रुणहत्या आणि बरेच सारे---

पण जर शासनाने लैँगिक जाणिव-जागृतीचे वय लक्षात घेत संमतीवय 18 चे 16 असे कमी करून वरील समस्यांना आमंत्रण देण्यापेक्षा एकच विवाहाची वयोमर्यादा 21-18 हुन 19-16(जे इंडोनेशिया मध्ये संमतीवय आहे) अशी कमी करण्याचा एकच कठोर कायदा आणल्यास माझ्या मते तरी ब-याच समस्यांवर तोडगा निघु शकेल... अर्थात आता होणारे अवैध बालविवाह वैध ठरतील, प्रेमीयुगल विवाहित असल्यास कुमारी मातेचा प्रश्नच निर्माण होणार नाही शिवाय विवाहबद्ध असल्यामुळे अवैध गर्भपाताची निकडच उद्भवणार नाही, शारिरीक संबंध विवाहोत्तर झाल्यास विदेशातील पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार न होता भारताच्या सभ्य संस्कृतीचा आदर्श जगापुढे अबाधित राहील... शिवाय जे तरूण वय कमी असल्यामुळे वाईट मार्गक्रमण करतात त्यावर आळा बसू शकेल, परिहार्याने बलात्कारासारखे गुन्ह्यांचे प्रमाण आपोआपच कमी होऊ लागेल... शिवाय 21-18 हून कमी वयाचे प्रेमीयुगल संमतीने विवाहपुर्व संबंध ठेवण्यापेक्षा विवाह करून संबंध ठेवतील... आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संमतीवय कमी करण्यामागील हाच लैँगिक जाणीव जागृतीचा शासनाचा दृष्टिकोन विवाहवयोमर्यादा कमी करूनही साधता येईल...

आता प्रश्न उद्भवतो 17 हे वय माता बनण्यासाठी परिपक्व आहे का? बाळाची काळजी व संगोपणाची घेण्याची जवाबदारी घेण्याजोगे 17 वर्षीय माता व 20 वर्षीय पिता मानसिकदृष्ट्या परिपक्व असतात का? कदाचित नाही..! पण ज्याअर्थी अवैध बालविवाहानंतर अल्पवयीन माता आई होतातच; शिवाय संमतीने विवाहपुर्व संबंध ठेवून गर्भपात करता न आल्यास कुमारी मातांना हीच समस्या भेडसावणार की..! याउलट हाच प्रश्न विवाहानंतर निर्माण झाल्यास कौटुंबिक आधार तरी मिळू शकतो. आणि Sex साठी 19-16 हे वय योग्य आहे की नाही हे आपण पाहिलेच...!

[NEXT/LAST PAGE]

कायद्यात 'सुधारणा' कि समस्यांना आमंत्रण !!!

[FIRST/PREVIOUS PAGE|SECOND PAGE]

कुमारावस्थेच्या काळाला 'मानसिक वादळाचा काळ' किँवा 'भावणिक ताणतणावाचा काळ' (Period of Storm and Stress) असे म्हणतात. या वयात सुसंस्कृत सवयी लागल्या तर आयुष्य सुकर बनते अन्यथा विकृत मार्गाला गेल्यास बालक व्यसनाधीन बनतो, मग धुम्रपान, मद्यपान, लैँगिक कामवासनेची (Sex) भुक शमविण्याकरिता क्षणिक सुखासाठी हस्तमैथून व समलिँगी संभोगासारखे अनैसर्गिक प्रकारदेखील ..! आणि मग वेश्यागमन व शेवटी जेव्हा विकृत मानसिकतेचा कळस गाठला जातो तेव्हा बलात्कार! असा हा कुमारावस्थेचा वाईट प्रवासही होतो...

आता ज्यांना असे वाटते कि 16 हे वय लैँगिक संबंधांसाठी अपरिपक्व आहे त्यांना वरील मानसशास्त्रीय मुद्द्यावरून सत्यता लक्षात आली असेल कि ख-या अर्थाने लैँगिक जाणिवा याच वयात सुरू होतात. या अवस्थेतील मुलांचा विचार करता त्यांची अवस्था असते -- "I know what I do not want, but I don't know what I want." त्यांना काय नकोय ते माहित असते मात्र काय हवय यापासून ते अजाण असतात. त्यांना मोठ्यांचा (विशेषत: आई-वडील/पालकांचा) मानसिक आधार हवा असतो. Sex संबंधात बरेच समज-गैरसमज आजच्या समाजात आरूढ आहेत. योग्य वयात संभोग निसर्गनियम असला तरी या गोष्टीकडे समाजाची तुच्छ दृष्टी असते आणि त्याच समाजातील लोकांना एकांतात अश्लील चित्रफिती पाहण्यासारखे प्रकरण चालतात हे का याचे उत्तर मला तरी आजवर कळले नाही वा मी असे प्रकरण कधी केले नाही.

सदर विधेयकाल मंजूर झाल्यापासून जनतेचे बरेच प्रश्न समोर येऊ लागलेत. या फौजदारी कायदा सुधारणा विधेयक 2013 मध्ये बरेच स्वागतार्ह निर्णय आहेत. सहसा दुर्लक्षित केले जाणारे महिलांची छेड, पाठलाग, अश्लील हावभाव यासारखे गुन्हे शिक्षेस पात्र झाले आहेत, बलात्कार, अॅसिड हल्ला, मारहाण, इतर अत्याचाराची शिक्षा वाढवण्यात आलीय व बलात्काराच्या आरोपीस जन्मठेप तसेच बलात्कार पिडीत दगावल्यास वा मरणयातना सोशत असल्यास फाशीचीही तरतूद विधेयकात आहे ही बाब निर्विवाद स्विकारार्ह आहे. पण यामुळे 'असले' गुन्हे थांबतील काय? खरच वरील शिक्षेची अंमलबजावणी होईल का? व अंमलबजावणीस किती विलंब लागेल हा शासन व भारताच्या विश्वासू न्यायव्यवस्थेसाठी खरा प्रश्न आहे. आज हत्येच्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असली तरी किती आरोपींना फाशीची शिक्षा होते व कितीँना फाशी होते? म्हणून हा प्रश्न मनात येतोय . . .

एकीकडे सदर विधेयक स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटत असताना पुरूषांविरोधात महिलांमार्फत या विधेयकाचा दुरूपयोग तर होत नाही ना! हे ही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा असं होऊ नये कि महिलांची सुरक्षितता लक्षात घेता निर्दोष पुरुषांवर अत्याचार होवो!

चला आता शासनाने इतर देशांच्या धरतीवर भारतातही शारिरीक/लैंगिग संबंधासाठी संमतीवय (Age of Consent) 18 वरून 16 केलेले आहे. होय...! हे वय जापानमध्ये 13, चीन, बांग्लादेश, जर्मनी, इटली, अर्जेँटीना 14, फ्रान्समध्ये 15, इंग्लंड, श्रीलंका, अमेरीका, मलेशिया, रशिया आणि आता भारतात 16 असून इंडोनेशियामध्ये पुरूषांसाठी 19 व महिलांसाठी 16 आहे तर पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराण या भारताशेजारील देशांत लग्नाआधि (निकाहपूर्वी) Sex अवैध असल्याने कायद्याने मान्यता नाही. वरील देशांचा विचार करता आपल्या लक्षात येईल कि चीनचा अपवाद वगळता अन्य देशांचा जननदर कमी असून लोकसंख्याही कमीच आहे, त्याउलट वाढती लोकसंख्या हे भारतापुढील आणखी एक आव्हाणच आहे.

consent-europe.gif

एक गोष्ट निर्विवाद आहे कि कायद्याने शारिरीक संबंधांसाठी 16 चे वय ठेवल्याने कुप्रवृत्तीचे पुरूष अधिक धाडसी होतील; पुर्वीचेच 18 वर्षाँखालील मुलीँवरील लैँगिक अत्याचारांची संख्या काही कमी नाही व आता तर 16 वर्षीय मुलीँवरील अत्याचारात कायद्याची भिती अत्यल्प राहणार असल्याने गुन्हे नोंदवले जरी कमी जाणार असले तरी या संख्येत मात्र वाढच होईल...!

शिवाय अजून एक बाब लक्षात घ्यावी लागेल कि भारतात (अवैध) गर्भपात हा कायद्याने गुन्हा आहे. 16 वर्षाँपासूनच्या तरुणीँवर संमतीने शारिरीक संबंध ठेवल्यास निर्विवाद त्या विवाहापुर्वी गर्भवती होतील, नंतर बदनामी, समाजाचा तिरस्कार हे सर्व आलच कि... भविष्यात त्या दोघात लग्न होईलही कि नाही काय माहित? अशा परिस्थितीत भारतात सरकार काय अविवाहितांसाठी गर्भपात कायद्याने वैध ठरवणार आहे का? आणि जर हो तर भ्रुणहत्याविरोधी मोहिमेचे काय? संगनमतीने स्वत:ची आणि शारिरीक भूक शमविण्यासाठी खेळलेल्या खेळातून निर्माण झालेल्या फुलाच्या कळीहूनही कोवळ्या 'त्या' भ्रूणाची काय चूक? जर गर्भपाताच्या कायद्यात बदल झाला नाही तर 'ती' कुमारी माता स्वाभिमानाने जगू शकेल काय? जर तीनेच लोकलज्जेला घाबरून आत्महत्या करून मरण पत्करले तर त्याला दोषी कोण??? या प्रश्नांचीही उत्तरे शासनाने जनतेला द्यायला हवीत...

[NEXT PAGE|LAST PAGE]

कायद्यात 'सुधारणा' कि समस्यांना आमंत्रण !!!

45th BLOG POST ==>>

नुकतीच 13-14 मार्च 2013 रोजी फौजदारी कायदा सुधारणा विधेयक 2013 ला केँद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. या विधेयकांतर्गत ब-याच स्वागतार्ह सुधारणा करण्यात आल्या तर काही सुधारणांसंबंधात मिडीया व जनतेतही मतभिन्नता व रोष व्यक्त होऊ लागला. पुर्ववत विधेयकात सुधारणा करण्यामागील हेतु लक्षात घेता हा विरोध यथायोग्यही वाटतो. कारण विधेयकात सुधारणा करण्यामागे उद्देश बलात्कारविरोधी कायदा निर्माण करणे हा होता. बलात्कार/लैँगिक अत्याचार हे देशासमोरील खुप मोठे आव्हान आहे. बलात्कार थांबवण्यासाठी फक्त कायद्यात सुधारणा पुरेशा ठरणार नसून समाजाची विक्रृत मानसिकता बदलणे अगत्याचे ठरलेले आहे.

केँद्र शासनाने वाढते बलात्काराचे गुन्हे कमी करण्यासाठी परस्पर सहमतीने शारिरीक/लैँगिक संबंध (Sex) साठी पुर्ववत 18 हे संमतीवय (Age of consent) 16 असे कमी केले. पण अशाप्रकारे वय कमी केल्यामुळे 'तसल्या' घटना टळणार का? आणि सहमतीने संबंध ठेवण्यासाठी वयोमर्यादा 16 असो कि 18! जिथे सहमती आहे तिथे बलात्कार होईलच कसा? हा खरा प्रश्न आहे. हं यामुळे एक अवश्य होईल; लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतच राहिल्या तरी 16-18 वयोगटातील भावी पिडीत कायद्याने Sex साठी अल्पवयीन राहणार नसल्याने पोलिस स्थानकांमधील 'तितके' गुन्हे कमी नोंदविले जातील! अर्थात दाखल गुन्ह्यांची संख्या कमी होणार असली तरी वास्तविक Rape च्या घटनांची संख्या मात्र वाढतच राहिल . . .

सध्या कायद्याने 18 वर्ष वय होण्यापुर्वी विवाह (मुलांसाठी 21), धुम्रपान, मद्यपान, वयस्क चित्रपट ('A' grade/Adult movies), वाहनचालक परवाना, मतदान करण्यास आणि ब-याच बाबींसाठी मनाई आहे. बालगुन्हेगारांसाठी सुद्धा 18 ची अट आहे. ताज्याच असलेल्या 16 डिसेँबर 2012 रोजी घडलेल्या 'निर्भया'वर झालेल्या अत्याचारातील एक आरोपी 18 वर्षे पुर्ण नसल्याने अल्पवयीन/बारगुन्हेगार म्हणून वेगळ्या कोठडीत आहे. ज्या 'बालकाला' बलात्कार म्हणजे काय ते कळते व परिणाम माहित असून देखील वयस्क गुन्हेगारांहून अधिक छळ करता येतो शिवाय दिल्लीच्या चालत्या बस मध्ये एका निष्पाप तरूणीवर अमानुष अत्याचार करून तो बलात्कार करतो; तो आरोपी अल्पवयीनच कसा होऊ शकतो हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पिडित तरूणी 'ते' 13 दिवस मृत्यूशी झूंज देत 29 डिसेँबर 2012 रोजी अखेर हरली. पण त्या माऊली जाता-जाता संपूर्ण भारतभर जागृतीची चेतना निर्माण करून गेली. आणि आज तिला यमसदनी धाडणारा तिचा अत्याचारी आरोपी अल्पवयीद म्हणून स्वतंत्र (कोठडीत) आहे. त्याला वयस्क घोषित करून इतर आरोपींसम वागणूक देण्याचे शहाणपण शासनाला सुचत नाही. याऐवजी बालगुन्हेगारांचे वय कमी केले असते अथवा शक्य झाल्यास मतदानासाठीची वयोमर्यादा शिथील केली असती तर कदाचित जनतेरास इतका भ्रमनिरास झाला नसता . . . !

हो! माझा मानस इथे शासनाच्या निर्णयाचा वा विचारांचा विरोध करण्याचा मुळीच नसून शासनाच्या भुमिकेचा मी आदरच करतो. शासनाने सहमतीने संभोगासाठी शिथिल केलेल्या 16 या वयाचा मी तर पुर्वीपासून समर्थनच करतो... आता आपणास वाटेल कि मी दुटप्पी भूमिका घेतोय पण नाही. मी यापूर्वीच 10 (योगायोगाने 'Day of the Girl' लाच) व 11 ऑक्टोबर 2012 रोजी Tweet करून हे व्यक्तही केलं होतं. आता वाचकांचा रोष माझ्यावर व्यक्त होईल मी जाणतो. तरी मला आपलं मत मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे व आज मी माझी भुमिका/मत स्पष्ट करणार आहे . . .

g-stanley-hall.jpg

मी जरी या विषयातील तज्ज्ञ नसलो तरी आजवरच्या माझ्या निरीक्षण व अध्ययनानुसार 12 ते 16 (पुर्व) व 16 ते 21 (उत्तर) कुमारावस्थेचा काळ आहे. यातील पुर्व कुमारावस्थेचा 12 ते 16 हा 4 वर्षाँचा काळ फार महत्त्वाचा आहे.

कुमारावस्था (ADOLESCENCE) = वाढणे, वयात येणे.
प्रसिद्ध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ GRANVILLE STANLEY HALL च्या मते "Adolescence is rebirth." ("कुमारावस्थेत मुला-मुलीँचा नवा जन्म होतो.")किशोरावस्थेच्या 12 ते 14 वर्ष या वयातच मुला-मुला-मुलीँचा मेँदू 85% विकसित झाल्यानंतर कुमारावस्थेत मुला-मुलीँमध्ये शारिरीक, लैँगिक व अंत:स्त्राव ग्रंथीत बदल होऊ लागतात. यौवनारंभ होऊन मुलीँमध्ये वयाच्या 12व्या वर्षापासूनच प्रजननक्षमता विकसित झालेली असते. खरेतर मुले 14-16 तर मुली 12-14 या वयात 'वयात येतात'. कुमारावस्थेमध्ये मुला-मुलीँना परलिँगी आकर्षण होतं. शारिरीक, लैँगिक बदलांमुळे कामवासनेची (Sex) जाणीव होऊन मन अस्थिर (चंचल) होतं, नैराश्य येते आणि मग लैँगिक भूकेच्या शोधात मुले-मुली (विशेषत: मुले) क्षणिक सुखासाठी वाईट मार्गाला लागून विकृत कृत्य करू लागतात.

[FIRST PAGE |NEXT PAGE|THIRD PAGE|LAST PAGE]