प्रिय भारतीय बहिणी व भावांनो ..! आज १५ ऑगस्ट २०१८. भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन... भारताला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झालीत. आपण ७१ वर्षाँपासून मोठ्या थाटात स्वातंत्र्य दिन साजरा करतो. अवघा भारत देश अगदी देशभक्तीच्या उल्हासात या दिवशी ऊर्मीत येतो. १५ ऑगस्ट जातो आणि मग देशाची परिस्थिती व भारतीयांची देशभक्ती पहावयास मिळते ती 'जैसे थे!' अशीच देशभक्ती आम्हा भारतीयांमध्ये वर्षात परत जागृत होते ती २६ जानेवारी रोजी. आणि यानंतरही जर कधी ती निर्माण झालीच तर कुण्या समाजसेवकाने क्रांतीची मशाल पेटविल्यास; पण आता तर ते ही कमी झालंय... काय आपण खरंच राष्ट्रीय सण (स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन) साजरे करतो.. !
राष्ट्रीय सणांचा अर्थ काय? कशासाठी साजरे केले जातात राष्ट्रीय सण?