Wednesday 8 January 2014

Gandhi Jayanti va Fatakemukta Diwali Vishesh

अनुदिनी 92वी

दिवस 472वा

पत्रमालिका- मनातल्या मनात (पत्र 2)

राजूची रोजनिशी-1.कादंबरी (पत्र 2)

माझ्या "मनातल्या मनात" ह्या पत्र मालिकेतील हे पत्र काही कारणास्तव उशीरा म्हणजे आता पोस्ट करतोय...

गांधी जयंती (2/01) व फटाकेमुक्त दिवाळी विशेष

प्रिय डायरी नं 1..
काल तु मला पत्राद्वारे माझा 1 ऑक्टोबर 2009 रोजीचा पहिला संदेश पोचवलीस.. खरंच मी तुमचं बारसं करायचं विसरलोच होतो बघ.. पण झालं ते एकदाचं...
तु मला गांधी जयंतीबद्दल तुला सांगितलेलं पत्राद्वारे पाठवणार होतीस.. पण म्हटलं ते तर मला माहिती आहे तर मग आपणच ते सर्व तुला परत सांगून देउनच टाकूयात ना सरप्राईज..
आज 3 ऑक्टोबर 2009. काल 2 ऑक्टोबर 09.. 2 ऑक्टोबर म्हणजे म. गांधी तसेच लाल-बहाद्दूर शास्त्री यांची जयंती. काल म. गांधी जयंतीची सुटी होती व आज शनिवार 'हाफ डे' असल्याने आमचा कॉलेज सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेवर लागला.

आमच्या कॉलेजात 2 ऑक्टो. ला सरकारी सुटी असल्याने गांधी जयंतीचा कार्यक्रम आज दि. 3/10/09 ला घेण्यात आला. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे या महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन डी.एड. चे विद्यार्थीच करतात त्याप्रमाणे डी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याँनी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहूणे, प्रमूख वक्ता तसेच सुत्रसंचालन व स्वागत ही द्वितीय वर्ष डी.एड. चे विद्यार्थीच होते. या कार्यक्रमात मी माझा स्वलिखित गीत 'म. गांधी आणि आपण' सादर केला व मला छान टाळ्यांची दाद मिळाली. या कार्यक्रमातील स्वप्नील नागदेवे चा स्वलिखित गीत मला सुद्धा आवडला व त्या गीताबद्दल सरांनी (प्राचार्य मनिष कोल्हे) त्याला पेन गिफ्ट केली. व कार्यक्रमात गीत, भाषण, भजन सादर झाले तसेच बी.एड.च्या विद्यार्थीनीने संस्कृत मध्ये आभार प्रदर्शन केले.

नंतर आम्हाला मॅडमनी कार्यक्रमात झालेल्या चूका विचारुन पुढील कार्यक्रम आयोजित आम्हाला करायचा असल्याची सुचना दिली व पहिल्याच कार्यक्रमात आम्ही प्रथम वर्षाचे नविन विद्यार्थी असून सहभागी झाल्याने डोँगरे मॅडमनी माझी व स्वप्निलची भरभरुन स्तुती केली. तत्पूर्वी रामटेके सरांनी शारीरिक शिक्षणाबद्दल माहिती सांगितली.

व मी आज मेसच्या पैशांसाठी आमगाव ला जात आहे.

तर प्रिय रोजनिशी.. त्यादिवशी तुला मी वरील गोष्ट सांगितली होती.. अर्थात आता परत तुला ते पत्र पाठवण्याची गरज नसल्याने बुधवारी मला थेट यापुढील पत्र पाठव..

अगं मी हा पत्र आज पाठवत असलो तरी हे 4 नोव्हेँबर 2013 लाच लिहिलं होतं.. काय ते वाच..
"नेरवा धनत्रयोदशी.. आता विचारशील काय खरेदी केलं? पण खरं सांगू.. काय सोनं..? तुला माहित आहेत का काय भाव आहेत सोन्याचे.. 30 हजाराच्या जवळ गेलाय प्रतीतोळा.. हो ना "सोन्याचेही भाव वाढलेत आजकाल...!" मग काय.. सर्वांनी पुर्वीच कपडे खरेदी केले होते.. म्हणून मग मी धनतेरसला दोन जोडी कपडे खरेदी केले.. परवा होती नरक चतुर्दशी.. त्याचा मला इतिहास माहित नाही.. माझी आई जाणते बघ हिँदू धर्मातील सगळा पोथीपुरान.. तिला विचारुन सांगितलं तर पुस्तक तयार होईल या एकाच दिवसावर.. काल लक्ष्मीपुजन.. आज बलिप्रतिपदा व उद्या भाऊबीज.. लक्ष्मीपुजेपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते बघ..

टिप- हेच पत्र पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com