Thursday 20 December 2012

Blog 34- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')

[Read Previous page of this article]

3. सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही, अशी अवघड गोची करणा-या अनेक गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात. हे बोचकं तुम्ही कधी उघडून पाहिलं आहे का? त्यात काय-काय असतं?

=> होय! "सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही अशा ब-याच गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात." हे खरंच आहे.

माझ्या बाबतीत सांगायचं झाल्यास असल्या प्रकरणांचं बोचकं घरच्यांसमोर उघडण्याचा मी ब-याचदा विचार केला पण कधी हिँमतच झाली नाही... भिती वाटते... काय प्रत्युत्तर येईल? रागावणार तर नाही... कि सगळं चांगलं होऊन आपलं बोलणं समजून घेतील; चुक झाल्यास प्रेमाने जवळ घेऊन समजावतील...

मित्रांना सल्ले देताना "घरच्यांना सांगून दे सर्व... काही नाही होणार... सगळं चांगलं होईल..." असं म्हणणं ( दिलासा देणं ) फार सोप्पं असतं! परंतु नाही होत हिँमत सांगण्याची.

अशा ब-याच गोष्टी असू शकतात... शारीरीक वयानुसार होणारे शारीरिक बदल, तारुण्यानुसार बदलत जाणारे भावनिक विचार... अथवा कधी कुणासोबत असलेला प्रेमाचा अफेयर ( मी मात्र अपवाद ) वा एखाद्या वर्गमैत्रिणीशी जोडलेलं 'भाऊ-बहिणी'सारखं पवित्र नातं देखील..! होय हे अगदी खरंय...!

असं एक सर्वश्रूत वाक्य आहे कि, "मनातलं मित्रांशी बोलून वाटल्यानं मन मोकळं होतं." पण खरंच असं होतं का? काय मित्र-मैत्रिणी आपल्या भावनांची कदर करतात? कि निव्वळ थट्टामस्करीच होते आपल्या मनातील भावनांची व नात्याची! ज्या आपण कुणाला सांगु शकत नसल्याने खुप विश्वासाने त्यांना सांगतो...

पण हो... माझ्याजवळ एक उत्तम 'फंडा / मार्ग' आहे असं मनाचं बोचकं उघडून मन मोकळं करण्यासाठी... दैनंदिनी लिहा... त्यात अशी मनातील प्रत्येक गोष्ट लिहा जी तुम्ही कुणाशी 'शेअर' करु शकत नाही... एखादे दिवशी ती तुम्ही स्वत:च वाचा ज्याला ती गोष्ट तुम्ही सांगू ईच्छिता ती व्यक्ती स्वत: असल्याची कल्पना करून... तुमच्या मनाला दिलासा अवश्य मिळेल. मी असंच करतो म्हणून हा माझा विश्वास आहे. अथवा सांगा तुमच्या मनातील भावना तुमच्या अंगी असलेल्या सुप्त कलेचा वापर करुन अवघ्या जगाला... उदाहरणार्थ चित्राच्या, लेखनीच्या, पुस्तकाच्या वा कवितेच्या माध्यमातून...

-राजेश डी. हजारे-

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com