Pages

Friday, 1 December 2017

HIV-AIDS (एचआयव्ही - एड्स- Poem by Rajesh D. Hajare RDH)

HIV-AIDS (एचआयव्ही - एड्स )
- राजेश डी. हजारे 'आरडीएच'


World AIDS Day (1 December) (Source: Mid Day)(Poem by RDH)

१९५९ साली डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ कांगो  मधील 
किंशाशा मध्ये सापडला एचआयव्ही  चा पहिला रुग्ण 
सारा जग एड्स  च्या चिंतेने झाला होता मग्न
१९८६ साली सर्वप्रथम एड्स  ने पाय टाकले  भारतात
राज्यातले ३२ जिल्हे घेरले एड्स  ने एकट्या महाराष्ट्रात
१ डिसेंबर १९८८ रोजी लंडनमध्ये 
आरोग्य मंत्र्यांची बैठक झाली.
जागतिक आरोग्य संघटनेने १ डिसेंबर 
'जागतिक एड्स दिन' म्हणून घोषणा केली.
एचआयव्ही  म्हणजे- 
'ह्यूमन ईम्युनोडेफीशीएन्सी व्हायरस' 
जो आहे विषाणू
एड्स  म्हणजे- 
'एक्वायर्ड ईम्युनो डेफीशीएन्सी सिंड्रोम' 
जो एचआयव्ही  चा मेनू
एड्स  च्या बाबतीत आफ्रीकेनंतर भारताचा स्थान दुसरा!
केव्हाही भारत जाऊ शकतो पहिल्यावर हे नको विसरा!
एड्स  या रोगावर आजपर्यंत एकही लस नाही सखी
आफ्रिकेत तर दिवसाकाठी एड्स  ने ९०० पडतात मृत्यूमुखी
एड्स  झाल्यावर ३ ते १५ वर्षे रोगाची लक्षणे कळत नाही
१० रुपयात (मोफत) रक्तचाचणी करून तपासून घ्या
आपल्याला तर एचआयव्ही एड्स  नाही?
एड्स  म्हणजे-
'रोगप्रतिकारक शक्तींच्या कमतरतेमुळे 
निर्माण होणाऱ्या रोग लक्षणांचा समूह आहे.'
खरं सांगतो राजेहो
एड्स  संसर्गजन्य नाही असंर्गजन्य आहे
महिनाभरात वजन कमी, खोकला, जुलाब 
एड्स ची लक्षणे
एड्स  वर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे 
नवीन सुई, ब्लेड व निरोध वापरणे
एचआयव्ही  म्हणजे सुरुवात एड्स  ज्याचा अंत
एड्स  म्हणजे असा रोग मृत्यूच त्याचा अंत
एड्स  नाही होत चुंबन, हात मिळवल्याने व आलिंगनाने
तो तर होतो असुरक्षित लैंगिक व शारीरिक संबंधाने
२००४ चे घोषवाक्य-
"वचन पाळा-एड्स टाळा !"
"एड्स जाणा-एड्स टाळा !"
शेवटी मी 'आरडीएच' सांगतो एकच काम करा रे
पाळा 'आरडीएच' राजेश हजारे चे खाली दिलेले नारे
"एड्स समस्येवर चर्चा करा घराघरात-
आणि एड्स ला पळवून लावा अगदी एका झटक्यात !"
"चला मोहीम हाती धरूया-
महाराष्ट्र, भारत व जगाला एड्स मुक्त करुया !"


कवी: © राजेश डी. हजारे 'आरडीएच'
भ्रमणध्वनी क्रमांक: ०७५८८८८७४०१
रचना दिनांक: ३० नोव्हेंबर २००९-०५ डिसेंबर २००९ (रामटेक जि. नागपूर)
(सदर कविता कवी राजेश डी. हजारे च्या शालेय स्तरावर संशोधन  करून विस्तृतरित्या लिखित एड्स विषयक दीर्घ निबंधाचा सारांश आहे.)

मुख्यशब्द  (Keywords ): HIV , AIDS 

No comments:

Post a Comment