Tuesday 1 May 2018

महाराष्ट्र गौरवगीत (Maharashtra GauravGeet) by RDHSir


आज १ मे  रोजी महाराष्ट्राच्या वर्धापनदिनानिमित्त राजेश डी. हजारे 'आरडीएच' ची रचना:


महाराष्ट्र गौरवगीत

कवी: राजेश डी.हजारे (आरडीएच)


देश अमूचा महाराष्ट्र हा
मराठी अमूची माती
लढले योद्धे शूर मराठे
या प्रिय राज्यासाठी ||धृ.||

इथेच लढले शिवबा माझे
जगभर त्यांची ख्याती
साक्षर करण्या स्त्रीयांना
झिजली क्रांतीज्योती
इथलीच प्रतिभा जाहली पहिली
महिला राष्ट्रपती ||१||

महाराष्ट्र ही संतांची भूमी
इथे अध्यात्म नांदती
पंढरपूरला शोभे वारी
भागेच्या तीरावरती
मी माथा टेकितो गीतामधुनी
पांडुरंगाच्या तीर्थी ||२||

हिंदू-मुस्लिम-शीख-ईसाई
-पंजाबी-गुजराती
आम्ही सगळे बंधू-भगिनी
पाहून घ्या हो प्रीती
ईद-दिवाळी-नाताळ-पाडवा
करतो हो संगती||३||

आम्ही सगळे शूर मराठे
तगडी अमूची छाती
क्रांती करण्या महाराष्ट्राची
मशाल घ्या हो हाती
'आरडीएच' संगे चला पेटवू
राज्यक्रांतीची ज्योती||४||

कवी: ©राजेश डी.हजारे (आरडीएच)
भ्रमणध्वनी क्र.: ७५८८८८७४०१
विरोप पत्ता: contact@rdhsir.com
संकेतस्थळ: www.rdhsir.com
गोंदिया जिल्हाध्यक्ष-अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे
मूळ रचना: ३० डिसेंबर २०१२, सोमवार (ब्लॉसम पब्लिक स्कूल, देवरी )


'महाराष्ट्र दिन' व 'कामगार दिन' च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!

©सदर कवितेचे सर्वाधिकार कवी राजेश डी. हजारे कडे सुरक्षित असून लिखित परवानगीशिवाय ही कविता निनावी अथवा नाव बदलून अग्रेषित करता येणार नाही.