Monday 27 August 2018

रक्षाबंधनानिमित्त...!!! (RakshaBandhan by RDHSir)

रक्षाबंधनानिमित्त...!!!
-लेखक: राजेश डी. हजारे 'आरडीएच'


मला बहिण नाही...
पण जिला मी मानतो;
तिच्यापुढे सारे काही फिके आहे.
मात्र ती मला भाऊ मानत नाही.
आयुष्यात सगळे काही मिळू शकते,
पण बहिण नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही.
दु:ख, वेदना, तक्रारी या सगळ्यात
बहिणच खंबीरपणे पाठिशी उभी राहते.
बहिणीच्या प्रेमापुढे सगळे झुट आहे.
म्हणूनच मी म्हणतो,
तुम्हाला बहिण असेल
तर तिच्यावर प्रेम करा... तिचा मान राखा.

-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

जसं उन्हाळ्याच्या कडक ऊन्हात पादत्राणांशिवाय रेतीवर चालणं अवघड आहे; त्याहीपेक्षा... जीवनात ताईविणा जीवन जगणं असह्य (अवघड) आहे.


-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

कोंबड्याच्या आरवल्याशिवाय सकाळ व्यर्थ आहे;
सोनेरी प्रकाशाविणा सूर्य अपूर्ण आहे; तसंच...
भावाचं जीवन ताईविना अधूरं आहे.

-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

आकाशाला अंत नाही तसेच;
बहिण-भावाच्या नात्याला अंत नाही.
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

कडू आठवणीत आठव मला
भावाची उणीव भासल्यास आठव मला
माझ्या वाट्याचे आनंद ठेव तूझ्याकडे
तुझे दु:ख असतील तर ते पाठव मला...
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

ऐक ऐक गं ताई तू
तुला काय मी सांगतो
बहिणीच्या सुखासाठी
हा भाऊ अश्रू मांडतो
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'


अंत्यंत नाजूक अशी ही वेळ आहे
बहिणभावात वैमनस्य निर्माण करण्याचा
कोणीतरी खेळतो खेळ आहे
चुकुनही होऊ द्यायचा नाही, आपापसात भेद
मग तो असो जनार्दन जसवंत जॉन किंवा जावेद
प्रत्येक हाताला बांधायची आहे राखी
कुणाचेही मनगट राहू नये बाकी
एकसूत्रात बांधा संपूर्ण भारत देश
रक्षाबंधनाचा ताई तूज हाच खरा संदेश

-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

आजारीपणाशिवाय आरोग्याचे महत्त्व कळत नाही; तसेच
बहिण नसल्याशिवाय बहिणीचे महत्त्व कळत नाही. 

-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'


दोन दिवस वाट पाहण्यात गेले
दोन रडण्यात गेले
आजही मोजतो आहे
किती राहिलेत अश्रू माझ्या नयनी
माझी ताई तर माझ्या जीवनी
येऊन परतूनही गेली
मला काही कळलेच नाही
केव्हा हृदय तिच्यासाठी कासाविस झाले
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'


"रक्षाबंधनाचा पवित्र भाऊ-बहिणीचा सण साजरा करणे कदाचित आमच्यासारख्या विना सख्ख्या बहिणीच्या भावाच्या नशिबातच नसावा..!"

-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'


बहन की किमत वो क्या जाने
जिसे कहियों बहने होते हैं।
बहन की किमत तो हम जैसो से पुछो
जो बहन पाने के लिये रात दिन रोते है॥
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
सच कहा था यह
मेरे दिल ने मुझे 'RDH'
ज़िंदगी न जी सके इंसान
अग़र उसे बहना न हो
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

दिल गुमसूम जुबान खामोश
ये आँखे आज नम क्यूँ हैं?
ये 'राजू' तूने कभी बहन पाया ही नहीं
तो उससे जूदाई का ग़म क्यूँ हैं?
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

If you have a sister
Treasure her with care
You won't miss her
Until you see her vaccant chair.
-©'Rajesh  D. Hajare 'RDH'

एकच आहे बहिण मजला
उद्याही एकच राहील
विसरुनी तीला
कसा हा 'राजेश'
दुसरी ताई पाहील?
न होईल शक्य
जरी आलं तरी
मरण या भावाला...
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

सदा गं जीवनी
तू हसती राहो
अल्लाह तुला
सदा सुखातच ठेवो
हिच प्रार्थना
ईश्वरचरणी देवाला...

पुर्‌या हो ताई
सर्व तुझ्या ईच्छा
रक्षाबंधनाच्या
तुला गं हार्दिक शुभेच्छा
भिडू दे ताई
नाव तूझं या गगनाला...
-©राजेश डी. हजारे 'आरडीएच'

Wishing you a very-very...

HAPPY~RAKSHABANDHAN..!!!



  • स्त्रोत: 


  1. RDHSir | Facebook Post
  2. Happy Rakshabandhan
  3. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 
  • #संदर्भ:- "माझी ताई : एक आठवण" या राजेश डी. हजारे 'आरडीएच' द्वारा लिखित आत्मकथनपर कादंबरी तून साभार
  • #आंतरजाल (Internet) वर पूर्वप्रकाशित (02 ऑग. 2012 व ऑग. 2013)
  • पुनःप्रसिद्ध: 27   ऑग. 2018 (संकेतस्थळ)

Sunday 26 August 2018

बंधु प्रेमाची बाग फुलली (Rakhi poem by RDH Sir)

 बंधु प्रेमाची बाग फुलली 
 कवी: राजेश डी. हजारे 'आरडीएच' 

बंधू प्रेमाची बाग फुलली
बागेत झुलताना तहान भूक भुलली ।।धृ.।।

ताई बांधी, रेशमी बंध
भावा बांधी रक्षाबंध
राखीचा घेऊ, या रे गंध
आज प्रेमाची, कळा फुलली ।।१।।

भाऊ बहिणीस, नेसी नऊवारी
बहिण भावाचे, गोड तोंड करी
आज दोघांचा, दिवस भारी
रक्षा बंधात, दोघे झुलली ।।२।।

रेशमी बंध, बांधूनी घ्या रे
मोठ्या मनाने, रक्षा करा रे
आनंदाचा, दिवस हा रे
हास्य फुले ही, उमलली ।।३।।

बंधू प्रेमाची बाग फुलली
बागेत झुलताना तहान भूक भुलली

कवी: © राजेश डी. हजारे 'आरडीएच'
आमगांव जि. गोंदियाभ्र. क्र.: ०७५८८८८७४०१
संकेतस्थळ: www.rdhsir.com
मूळ कविता: २३ ऑगष्ट २०१०, सोमवार
 आपण सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...! 

राखी (Rakhi) (RDHSir की हिंदी रचना)

आज रक्षाबंधन के पावन अवसर पर मेरे द्वारा दसवी कक्षा में पढ़ते वक्त ९ अगस्त २००६ को लिखी हुई १२ साल पुरानी रचना पेश हैं।
 राखी 
 रचनाकार: राजेश डी. हजारे 'आरडीएच'  
  
आया रे आया राखी का त्योहार आया
आया रे आया, भाई-बहन का प्यार उबर आया

लाया रे लाया, आँखों में आँसू लाया
भगवान ने सभी को बहना क्यों नहीं दिया

दिया रे दिया, राखी को दूसरा नाम दिया
राखी का दूसरा नाम रक्षाबंधन कहलाया

राखी का धागा रेशम का बनाया
रेशम का धागा बड़ा कहलाया

बहना ने भाई की कलाही पे राखी बाँध दिया
राखी पे लिखा था 'मेरे भैया'

दिया रे दिया, बहना ने राखी भेज दिया
राखी के साथ थी, ढेर सारी खुशियाँ

रचनाकार: © राजेश डी. हजारे 'आरडीएच'
आमगांव जि. गोंदिया
  • रचना की तारीख: ०९ अगस्त २००६, बुधवार (कक्षा दसवी)
  • (यह मेरी हिंदी में दुसरी ही रचना है। अतः बचपन में लिखी इस रचना में कुछ कमिया हो सकती है। कृपया स्वीकार करे।)

।।आप सभी को रक्षाबंधन के पावन अवसर पर ढेर सारी शुभकामनाएं।।

शेतीवर कविता (कवी राजेश डी. हजारे 'आरडीएच') (Shetiwar Kavita)

शेतीवर कविता

कवी: राजेश डी. हजारे 'आरडीएच'


शेतीवर कविता लिहीन म्हणतो
पण शब्द काही सुचत नाही
एक बाप राब-राब राबतो शेतात
पण काळं कुत्रं ही त्याला पुसत नाही


प्रत्येकजण आपल्याच कामात व्यस्त आहे
दोन वेळ खाऊन-पिऊन मस्त आहे
तरी का मग शेतकरी फस्त आहे?
की शेतकऱ्याची जिंदगी स्वस्त आहे?
रातदिस शेतात राबून 
त्याला एकवेळची भाकरी ही पचत नाही...
शेतीवर कविता लिहीन म्हणतो
पण शब्द काही सुचत नाही
एक बाप राब-राब राबतो शेतात
पण काळं कुत्रं ही त्याला पुसत नाही

सांगीन म्हणतो मी ही शेतकऱ्याची व्यथा
पण ऐकेल का कोणी इथे त्याची दारुण कथा?
'शेतकऱ्याचे जीणे म्हणजे 
फक्त एक कथा नाही ती एक गाथा आहे'
'दुष्काळाला कंटाळून मरणाला कवटाळून 
फासापुढे झूकणारा तो एक माथा आहे'
मॉल मध्ये टीप मोजणारे आम्ही
मंड्यांमध्ये भाव करताना 
त्याचे कष्ट कसे दिसत नाही?
शेतीवर कविता लिहीन म्हणतो
पण शब्द काही सुचत नाही
एक बाप राब-राब राबतो शेतात
पण काळं कुत्रं ही त्याला पुसत नाही

पाहतो मी स्वप्न 
की एक दिवस माझी कविता पूर्ण होईल
पाऊस पडो वा न पडो पीक होवो वा न होवो
शेतात राबणारा बाप माझा 
आनंदाची गाणी गायील
अंगावर कापड, ताटात भाकर, 
रहायला निवारा असेल
सुखी जीवन जगत असताना 
डोक्यावर कर्जाचा मारा नसेल
अपूर्ण असलेली 'आरडीएच' ची कविता 
तोवर पूर्ण काही होत नाही...
शेतीवर कविता लिहीन म्हणतो
पण शब्द काही सुचत नाही
एक बाप राब-राब राबतो शेतात
पण काळं कुत्रं ही त्याला पुसत नाही
======================

कवी : ©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
आमगाव जि. गोंदिया
भ्रमणध्वनी क्र.: ०७५८८८८७४०१
रचना दिनांक: १८-१९ फेब्रुवारी २०१७ (शनिवार-रविवार) (१२.३५ मध्यरात्री/०६.१५ सायंकाळ)

  • काव्यवाचन



  1. तीसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन , गडचिरोली (२५-२६ फेब्रुवारी २०१७ )
  2. काव्यप्रेमी मंच काव्यमहोत्सव, अक्कलकोट जि. सोलापूर (मे  २०१७ )
  3. संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत ओबीसी सेवा संघ पुरस्कृत ६ वे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलन, रविवार दि. १८ नोव्हेंबर २०१८ (तिगाव ता. आमगाव जि. गोंदिया)
  • सहभाग:
  1. शब्दविद्या राज्यस्तरीय महाकाव्यस्पर्धा  (शेतीमाती )
  2. विदर्भ शब्दविद्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धा , २६ ऑगष्ट २०१८ (परीक्षक: हनुमंत चांदगुडे )
अपडेट: २३ डिसेंबर २०१८ , रविवार (राष्ट्रीय शेतकरी दिवस)

Wednesday 15 August 2018

'SMS पाठवल्याने माणूस राष्ट्रप्रेमी होतो का?'

प्रिय भारतीय बहिणी व भावांनो ..! आज १५ ऑगस्ट २०१८. भारताचा ७२ वा  स्वातंत्र्य दिन... भारताला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झालीत. आपण ७१ वर्षाँपासून मोठ्या थाटात स्वातंत्र्य दिन साजरा करतो. अवघा भारत देश अगदी देशभक्तीच्या उल्हासात या दिवशी ऊर्मीत येतो. १५ ऑगस्ट जातो आणि मग देशाची परिस्थिती व भारतीयांची देशभक्ती पहावयास मिळते ती 'जैसे थे!' अशीच देशभक्ती आम्हा भारतीयांमध्ये वर्षात परत जागृत होते ती २६ जानेवारी रोजी. आणि यानंतरही जर कधी ती निर्माण झालीच तर कुण्या समाजसेवकाने क्रांतीची मशाल पेटविल्यास; पण आता तर ते ही कमी झालंय... काय आपण खरंच राष्ट्रीय सण (स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन) साजरे करतो.. !

राष्ट्रीय सणांचा अर्थ काय? कशासाठी साजरे केले जातात राष्ट्रीय सण?