Thursday 31 October 2013

मृतात्म्यास पत्र

दिवस ==> 403 वा

अनुदिनी ==> 77 वी

सदर पत्र 'झाडीबोली'त पाठवत आहे...

मृतात्म्यास पत्र

Image Source: India Today
प्रतिमा स्त्रोत: India Today

स्वर्गीय मेल्या माणसाच्या आत्म्यास,
तो 29 सप्टेँबर चा दिवस होता.. मी बाजंवर झोपला होतू.. सकारी सकारी माज्या आईना उटवलन.. जवरपास आठक वाजले असतील.. हव तुमी बराबर वाचून रायल्या.. मी एवढ्यावरच उटता कदी कदी.. झोपता बी जरा लेटच.. मोटी दाळ आदत आहे माले पर का करता? तं जाऊ द्या.. मले सांगतलन का आमगावमंदी कोणाचा तरी खून झाला.. माझे बाबूजी त्या जागेवर जाऊन वापस आल्ते.. भल्तीच गर्दी होती तं त्यायले पावाले नायी भेटला खरा..! मंग मी निँग्लू चड्ड्यावरच.. तुले पावाले.. कोण असल? कसा असल? कायले मारला असतील? कोणा मारला असतील? मनात लगीस्से परस्न येत होते.. आखीरकार पोचलूच त्या जागेवर... आमच्या घरापासना ज्यादा दूर नवता.. तू त्या नवीन बनत्या घरातच अंदर निपचित पडला अससील.. असे तं तू जिता अससील तई कोनी नसल विचारलंन तूले पर तूह्या मेल्यावर खासकरून तूजा मडर झाल्ता मून स्यानी सप्पायसाठी तूजी डेटबॉडी मनजे मोट्या हिरोसारकीच झाली होती.. गर्दीच गर्दी लोकायची.. पोरायपासून तं बूळग्यायवरी ना रिकामडेँ**यपासून(शिवी) तं आफीसरायवरी सप्पायसाटी तुजा मेला थोबडा मंजे जसा का हिरोच होता.. अंदर पोलिस पंचनामा करत होते तं तूले पावासाठी लोकायले घरात एंट्री नवती.. पर सप्पा बिजी मानसा त्यादिवसी कामधंदा सोडून (तसाई इतवारच होता) निस्ता तूले पावासाटी नव दा वाजेवरी भर तपनीत तेतीच उभे होते ना गा.. मले तं असे ढुंढून जे भेटत नवते ते भेटले त्या दिवसी.. भरमार दूरदूरुन आले होते निस्ता तूले पावासाटी...

मंग आखिरकार तूले बाहेर आणला.. आमी तं तसा तूले पायलून नवतून पर जे लोकं सकारी सकारी पायटलेच जातत ना (अगा डब्बे धरुन नायी गा...!) फिरावले का मनतत त्याले मार्निँग वाक का फार्निँग वाक तं त्यायच्यातल्या एकाले तूजे पाय दिसले होते खरा..! मंग पोलिसायले बोलवला असतील.. मनजे माले तं लागते सनवारच्या रातीच झाला असल तूजा काम तमाम है ना गा? तं पोलिसायना पोते हातरला जमिनीवर अना लोकायले मेन पोलिसाना सांगतलंन (माफ करा भाषेमुळे मान देऊ शकत नाही) "तर बघा तूम्हाला आतापर्यँत इथे थांबवून ठेवण्याचा इंटेन्शन एवढाच आहे कि जर तुमच्यातील कोणी याला ओळखत असेल कि हा कोण आहे, कूठला आहे तर सांगावं व याची ओळख पटावी... तर तुम्ही एक-एक करुन पुढे या, पहा व समोर निघत चला..." त्याच्यापयलेच आमाले फोटोग्राफर ना क्यामेऱ्यात तूही फोटू दाखवलन होतन.. तेबी अलग-अलग पोज मंदली.. तूना बी खिचला नससील तस्या पोज जिता अससील तई..! तरी आमी तूले ससारचा (खरोखर) पावासाटी थांबलेच होतून.. मंग आमी पायलून तूले.. नड्ड्यावर (गळा), पाटीवर ना पोटावर चाकूचे घाव होते, तोँड उघडा होता.. मोठा भयानक दिसत होतास पर आमाले भेव नायी लागला.. मंग कोणातरी ओरखलन ना तूजा असली सरनेम सांगतलन तो मी नाई लिवा या पतरात अना गाव सांगतलन.. अखीन एका मानसाना पुस्टी केलन (पेपर वाचता मून मी बी नक्कल मारुन रायलू पेपरावानी.. ) तं पुस्टी बी नायी समजे; पुस्टी मनजे तो तुच व्हस मून कनफरम गा.. मंग आमी घरी आलून.. त्याच्या बादमंदी पोलिसायना तूजा पोस्टमार्टम केला असतील नायी का..? अना मंग तूले तूया घरी नेऊन सोडला असतील..

तू तं मेलास.. आगीत भस्सम बी झाला अससील.. आमीना तूले पायलून तरी चूपच.. पर आजूबाजूच्या बाया.. ज्या आल्या नायी, गेल्या नायी, पायला नायी तरी त्यायचा चालू-- "कोणा कूत्र्यायना मारला असतील बाई... मानसं नसतील ते... जनावर असतील (हा तं खरी मनला).." पर तू जेती भेटलास तो घर बनतच होता.. वास्तूपूजन बी होवालेच होता ना रावाले बी जावाचेच होते तं या का मनत सांगू-- "कसे रायतील बाई ते.. भेव नायी लागल का? घर बनावच्या पयलेच मुर्द्यायना अपसकून केला.. आता तो (म्हणजे तू) भूत बनून तेती फिरसील.." मी खरी सांगता तूज्या मेल्यापासून कोणी तेती बिनकामानं नायी जाय रातच्याले.. अना असा सिरीफ तूज्याच नायी.. तं कोणी बी मेला मनजे होते.. आता तू बी येतीच रायत होतास तं तूले बी मालूमच असल मना.. नायी असा नायी.. पर मी मनता- "का झाला?" तू का जाणून बूजून थोडी गेलतास तेती मरावले.. खूदहून तूले मारला त्या घरी दूसऱ्यायना.. तसा तं भूत बीत राये नायी.. काऊनका माजा विस्वासच नसे भूतादैतावर.. पर आता तू वरतं गेलास तं तूले मालूम तूले देवाघरी रावाचे आये का भूत बनावचा आये?
पर हो.. जर भूत झालास गिलास तं एकदम माझ्याजवरच नोको येजो नायतं माले पतरं कायले लिवलास मून.. अना तू झोँबजो तं त्यायले ज्यायनं तूले मारला.. आता मालूम चालला का तू मोटा सिदा सादा होतास खरा.. 

तं मी हा पतरं तूले सांगावसाठी लिवून रायलू का माणूस मेल्यावर त्याचा का होते हा अलग मॅटर आहे पर त्याच्याबाऱ्यात त्याच्या संगचेच आमच्यासारके लोकं का सोचतत.. अना हा मालूम असून का एक दिवस सप्पायले जावाचाच आहे तरी!! तं जाऊ दे तो सब सोड आता.. मी सांगता त्या घराले आता दरवाजा लावला.. तूले एकच इनती हाय का जो झाला तो झाला.. बळा गलत झाला तूज्यासंगा पर जाऊ दे आता त्यायची सजा देव त्याले देयल पर तू आता देवाघरी गेलास तं देव बनून राय.. भूत बीत तं रायेच नायी.. हाच सांगावासाठी डॉ. नरेँद्र दाभोळकर सारखा देवमाणूस थकून केला पर हिँमत नायी हारला तं जनावरायना त्यायच्यासारक्या देवमाणसाले बी तूज्याचसारखा मारला.. तूले मालूमच असल पेपरात वाचला अससील तं.. ते आता तेतीच असतील.. तू त्यायले विचार डॉक्टर तूले माज्यावून चांगला समजवून सांगतील भूत-चुडैल च्या बाऱ्यात का हे निर्री अंदश्रद्दा व्हय मून.. अना हो चूकभूल माफ कर.. जेतीबी अससील सुखी राय..

देव तूज्या आत्म्याले शांती लाभू देवो...!


तुआ मेला चेहरा पायनेवाला एक अनोळखी पोरगा

-राजेश डी. हजारे

(लेखक 'अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे' चे 'गोँदिया जिल्हाध्यक्ष' आहेत.)

आमगाव जि. गोँदिया

लेखन: 20 ऑक्टो. 2013 (रविवार)
शेवटचे अद्ययावत: 19 मे 2019 (रविवार)

  • स्त्रोत:

  1. न लिहिलेली पत्रे-14
  2. न लिहिलेली पत्रे-15
  3. #RDH Sir FB
  4. WhatsApp

Thursday 17 October 2013

फ.मु.शिँदे यांना अभिनंदनपर पत्र

दिवस→ 389

अनुदिनी/ब्लॉग→76

1382876_426999214066909_28692608_n.jpg1378742_525340920886123_1163613089_n.jpg
सन्माननीय श्री फ.मुं.शिँदे सर,

काल वृत्त वाचण्यात आले कि आपली '87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या' अध्यक्षपदी निवड झाली.. तात्काळ मी हे वृत्त फेसबुक व ट्विटर वर शेअर केलं... सोबतीला आपला छायाचित्र हवा होता म्हणून गुगल वर शोधून पाहिला आपला नाव तेव्हा चित्रांसोबतच विकीपिडीया वर आपल्याबद्दल सविस्तर माहिती दिसली.. तेव्हाच आपणास या निमित्ताने पत्र पाठवण्याचा माणस झाला... सोबतच आपल्या फेसबुक पेजविषयी पण कळलं.. आता तो तुमचाच आहे कि तुमच्या नावाने कोण्या दुसऱ्याच व्यक्तीने बनवून ठेवलाय ते माहित नाही पण कळवा जरुर...

तसं बघितलं तर आपली ओळख मी शाळेत शिकायचो तेव्हापासूनची... म्हणजे हो मला कळतय आपण मला ओळखत नाही.. पण मी आपणास ओळखायला लागलो ते शाळेत असतानापासून.. मला इयत्ता आठवत नाही पण इतकं अवश्य आठवतंय कि आठवी अथवा आठवीपुर्वीच्या मराठी बालभारती च्या पाठ्यक्रमात आम्हाला आपण लिहिलेली प्रसिद्ध 'आई' ही कविता होती... वर्ग आठवत नसल्याने आतापर्यँतच्या (1ली पासून ते अगदी डीटीएड पर्यँत) सर्व मराठी शिक्षकांची नावे आठवत असूनदेखील नेमक्या शिक्षकाचे नाव सांगू शकत नाही.. पण ती कविता शिकवण्यापुर्वी शिक्षकाने सांगितलेला लेखक परिचय व त्यातलेच त्या कवितेचे कवी 'फ.मु.शिँदे' अगदी 'फकीर मुंजाजी शिँदे' या आपल्या पूर्ण नावासह लक्षात आहेत ते आजपर्यँत.. मी शिकलेल्या बऱ्याच कविता विसरल्यात मात्र 'आई' ही कविता आणि तीचे कवी आजही स्मरणात आहेत.. कारण 'आई' हा प्रत्येकासाठी अगदी जवळचा (किँबहुना पहिलाच) शब्द.. आणि आपण काय सोपं व तितकच भावस्पर्शी वर्णन केलं आईचं त्या कवितेत तो ही अगदी साध्या व सोप्या भाषेत..

मी ती कविता शिकत असताना कधी स्वप्नातही विचार वा कल्पना केली नव्हती की मी कधी आपणास पत्र पाठवीन.. या साहित्यिक क्षेत्रात येण्याचं तर कधी स्वप्नातही आलं नव्हतं.. पण योगायोगाने मी या क्षेत्राकडे वळलो तो हि फक्त छंद म्हणून नव्हे तर अगदी 'प्रोफेशन' म्हणून तेसुद्धा तरुण वयात.. मी जाणतो कदाचित या क्षेत्रात पैसा नसेल पण आपल्या लेखनीत ताकत असेल तर एक दिवस तो ही एक दिवस निर्माण होईल याच क्षेत्रातून... आज मी 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' च्या 'गोंदिया जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष' पदावर कार्यरत आहे.. ही हि एक समाजसेवाच आहे... आणि पैसा मिळत नसला तरी या सर्वाँतून मिळणारा मानसिक समाधान खुप मोठा आहे.. मी जाणतो "पैसा खुप काही असला तरी सर्वकाही नाही.." आणि या मानसिक समाधानाची तुलना पैशाची होऊच शकत नाही.. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपणास भेटण्याचा (किँवा प्रत्यक्ष पाहण्याचा) कधी योग येईल.. होय कारण मी पुणे पासून भरपूर लांब (अगदी विरुद्ध टोकावरीलच) गोँदिया जिल्ह्यातील आमगाव या तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असून देखील पुणे जिल्ह्यातील 'सासवड' येथे 3, 4 व 5 जानेवारी 2014 रोजी आयोजित '87 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी' येत आहे.. तसे मी या फक्त 20 वर्षाच्या आयुष्यात बरीच छोटी मोठी साहित्यसंमेलने पार पाडली आहेत, पण इतक्या मोठ्या व विशेषत: इतक्या प्रतिष्ठित व मानाच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्याची ही माझ्यासाठी पहिलीच संधी असेल... मला निमंत्रण पण मिळालेय.. आणि माझ्यासारख्या नवोदित साहित्यिकासाठी स्वाभाविकच ही खुप आनंद व अभिमानास्पद बाब आहे...

असो... आपणाशी बोलण्या व सांगण्यासारखं बरंच काही आहे कारण आपण स्वत:च्या कर्तृत्वाने लेखनीद्वारे व वयानेही खुपच मोठे आहात आणि त्यामुळे आपली किमयाही फारच न्यारी व महतीही खुपच मोठी आहे.. पण पत्राला काही मर्यादा आहेत त्या पाळाव्या लागतील.. आणि आपण आता खुप व्यस्त असाल त्यामुळे पत्र वाचाल कि नाही काय माहिती पण हातात पडल्यास वाचालच ही आशा करतो.. जर पत्र वाचून झाला असेल तर प्रतिक्रीया नक्की द्या पत्राद्वारे... माझा पत्ता व संपर्क क्रमांक माझ्या फेसबुकच्या भिँतीवरुन आपणास मिळूनच जाईल आणि तरीही मी शेवटी नोँदवलाय.. शेवटी साहित्यसंमेलनात आपली प्रत्यक्ष भेट (पाहणे होईलच) 5-10 सेकंदांची का होईना पण त्या व्यस्त कार्यक्रमात भेटही होईल जर अल्लाहची (मी हिँदु आहे) ईच्छा असली तर... काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करावे... आपला आशीर्वाद नेहमी पाठीशी असेल हा विश्वास आहे.. आपली लेखनी तडपत राहो हि सदिच्छा व्यक्त करतो...

आणि या पत्राचा समारोप करण्यापुर्वी तुमचीच आई ही कविता (ज्यामुळे मी आपणास ओळखू लागलो) विषय निघालाच आहे तर ती इथे नमूद करतोय..

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं
गाव असतं !
...
आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा...
...
घर उजळतं तेव्हा
तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की
सैरावैरा धावायला
कमी पडतं रान !
...
अरे ! आणि आपणास शुभेच्छा द्यायच्या राहूनच गेल्या कि... 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन ..!
आपलाच चाहता
एक नवोदित साहित्यिक
rdhautographmar.jpg
राजेश डी. हजारे (RDH)
भ्रमणध्वनी क्र.- 07588887401
पत्ता-कामठा रोड आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया- 441902
~(गोँदिया जिल्हाध्यक्ष- अ.भा. मराठी साहित्य परिषद, पुणे)

Saturday 12 October 2013

आसुमल हरपलानी ते 'संत' (न)आसाराम

BlogPost==> 73rd

Day==> 384

अप्रिय आसाराम...
मी माफीही मागत नाही कि मी तुम्हाला प्रिय प.पु. संत श्री बापू असं म्हटलं नाही.. कारण मी मानतच नाही.. तसं मी यापूर्वीही तुमचा कोणी मोठा भक्त वा समर्थक नव्हतो व आता तर प्रश्नच नाही... कारण जे बहूसंख्य होते ते आता तर थोडेफार राहिले असतील.. व त्यातलेही काही पश्चात्तापच करत असतील..!

पण मी एक खरं सांगू.. ज्यादिवशी तुमच्यावर पहिल्यांदा 'बलात्काराचा' आरोप लावला गेला व जेव्हा प्रसारमाध्यमे (मिडीया) तुम्हाला विनापुरावा पोलिसांच्या चौकशीपुर्वीच धारेवर धरत होती.. त्यांनी तुम्हाला तेव्हाच गुन्हेगार संबोधलं होतं त्यावेळी मीच तुमची बाजू घेत "आसाराम यांची पोलिसांद्वारे चौकशी होऊ द्यावी त्यात गुन्हा सिद्ध झाला तर नंतर मग मिडियाने तुम्हाला गुन्हेगार संबोधावं" असं ट्वीट केलं होतं.. पण ते चूकीचे नव्हते.. जेव्हा तुम्ही पोलिसांसमोर समर्पण करण्याऐवजी इकडे-तिकडे लपत नव-नवे बहाणे बनवत होते ना.. तेव्हाच मलाही पटलं "सच मे जरुर दाल मेँ जरूर कूछ काला हैँ..." आणि नंतर माझंही मत बदललं.. मी स्वत: परत मिडीयाची माफी मागत तेच बरोबर असल्याचं पण नवीन ट्वीटद्वारे कबूल केलं होतं...

आसाराम, तुम्ही स्वत: आश्वासन दिलं होतं कि "सध्या माझे सत्संग सुरु असल्याने 30 तारखेनंतर मी स्वत: समर्पण करून पोलिस चौकशीत मदत करीन.".. पण तुम्ही तर मूदत संपून 2 दिवसांनंतरही इंदौरच्या आश्रमात विश्रांती घेत होतात... मला अचंबा वाटतो की तिथले पोलिस कसे मिडीयाने जोर धरेपर्यँत तूम्हाला अटक करण्यास धजावले नाहीत... शेवटी मानलं तुम्हाला! पण माघार घेणार ते भारतीय पोलिस कसले? डोंबले ना तुरुंगात शेवटी! तुमचा कितीही दबदबा असला तरी...! तुम्ही गुन्हेगार असल्याचं मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा विमानामध्ये तुमचे (विशेषत: महिला) समर्थक 'आजतक' या नॅशनल खाजगी वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी शिव्यागाळ व मारपीठ सारखे असभ्य वर्तन करत होते आणि तुम्ही दुपट्ट्याने तोँड झाकत होतात... म्हणे 'प्रायव्हसी' चा विचार केला.. मी म्हणतो तुम्ही उत्तर द्यायचं होतं ना... प्रायव्हसी च्या कारणाने कारवाई झाली असती ती केली असती विमान कंपनीने संबंधित वाहिनीवर.. त्याची तुम्हाला काय पडली होती एवढी ?

मी तूम्हाला सन्मानाने 'जी' संबोधतोय याचं कारण एवढंच कि तुम्ही वयाने मोठे आहात.. पण तुम्ही तर दिडशे वर्षे जगण्याची ईच्छा ठेवता म्हणे... हे वाईट नाही हो... पण तुम्हाला कोणत्या पुस्तकात कळलं तर कोण जाणे दिर्घायुष्यासाठीच तुम्ही (अर्शकल्प, आणि अजून कोणकोणते मला 'नॉलेज' नाही) शक्तीवर्धक (अंमली पदार्थ सुद्धा!) औषधी सेवन करुन अल्पवयीन मुलीँचे लैँगिक शोषण करत होतात खरं..! कोणी म्हणतं तुम्हाला लहान मुलीँशी वासनाच्छेचा आजार जडलाय काय नाव त्याचं... मी विसरलोच बघा... मग तर मोठमोठाले ऋषीमुनी कित्येक वर्षे जगले त्या सर्वाँनी तीच पुस्तक वाचली होती काय? वा रे मेरे संत!

माझ्या माहितीनूसार तुमचं खरं नाव आसुमल थाउमल हरपलानी उर्फ आसुमल सिरुमलानी.. जन्म 17 एप्रिल 1941 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या तत्कालीनी ब्रिटीश भारतातील नवाबशाह जिल्ह्यातील विरानी गावात मेहनगीबा (आई) व थाऊमल सिरुमलानी (वडील) च्या घरी.. 'थँक्स गॉड' तुमचा जन्म एक दिवस उशीरा झाला नाही अन्यथा माझ्याही मनात एक सल आयुष्यभर राहिली असती की माझा वाढदिवस कुकर्मी आसारामच्या वाढदिवसी येतो.. ईश्वरानं मला सुदैवानं 18 एप्रिल 1992 रोजी 'भारतरत्न' महर्षी धोँडो केशव कर्वे सारख्या समाजसुधारकाच्या वाढदिवसी या पृथ्वीवर पाठवलं.. तुम्ही पंक्चर दुरुस्तीचे काम करत होतात.. तुमचा मालक जवळच एका संताचे प्रवचन ऐकण्यास जायचा.. कधी मधी तुम्ही पण सोबत जायचे.. मग तुमच्या मनात आलं कि-- हा तर मस्त काम आहे.. काही वेळ प्रवचन करायचं.. मान, सन्मान, प्रसिद्धी मिळते.. अन्  दक्षिणेच्या नावाखाली वारेमाप पैसासुद्धा... सोबतच स्त्री-पुरुष, मुले-मुली, भक्त जमतात.. पाया पडतात.. आशीर्वादाच्या बहाण्याने प्रत्येक वयाच्या स्त्री-पुरुषास स्पर्श करता येतो... तुम्हाला काय पाहिजे होतं अजून... मग काय?? सुरु केला तुम्ही आसुमल चे आसाराम असे नामकरण करत स्वत:च स्वत:ला प.पु.संत आसाराम बापु अशा एक ना अनेक पदव्या घोषित करुण प्रवचनगिरीचा व्यवसाय... खरंतर इथंच चुकलं तुमचं... तुम्ही आपला नाव आशाराम वा 'आसाराम' ऐवजी 'नासाराम' ठेवावयास हवं होतं... पण काहीही म्हणा तुम्हाला तरुण मुलींना आशीर्वाद देण्यात जरा जास्तच रस होता नाही का? खरे संत फक्त डोक्यावर हात ठेवून मनापासून आशीर्वाद देतात; पण तुम्हाला समर्पणाच्या नावाखाली स्वतंत्र खोलीत बोलावून तरुणीँच्या बाह्य व आंतरीक अंगाअंगाला स्पर्श करत आशीर्वाद देण्याचे जरा जास्तच कौशल्य होते.. आणि पिडीत तरुणी बिचारी विरोधात 'ब्र' ही उच्चारु शकत नव्हती..


Source: i.ndtvimg.com

कारण बहुसंख्य समर्थक जे होते तुमची बाजु घेण्यासाठी.. सोबतच अशा कार्यातून तुम्हाला वाचवणारे सहकारी देखील... शिवाय तुम्हाला वाटत असावं कदाचित भोळ्या भाबड्या भक्तांच्या आस्थेचे बाजारीकरण करुन कमावलेल्या वारेमाप संपत्तीच्या बळावर व प्राप्त समर्थकांच्या विरोधाच्या बळावर करत राहू तरुण वयातील कोवळ्या मुलीँवर लैँगिक अत्याचार आणि वाचून जाऊ भारताच्या कायद्यापासून... पण ते कदापि शक्य नाही... आणि आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर येताहेत भुतपूर्व पिडीत मुली एकेक करुण पुढे तुमच्या विरोधात खटले दाखल करण्यासाठी...

आता तर तुमच्या विषयी फक्त प्राथमिक माहिती पुढे आलीय.. ये तो अभी ट्रेलर है मेरे आसा.. अब तो पुरी पिक्चर बाकी है... आता जेव्हा मी तुमच्या विरोधात इतर विविध पोलिस ठाण्यात पिडीतांद्वारे एफआयआर नोँद होताना पाहतो व तुमच्या आश्रमातीलच तुमच्याच भुतपूर्व सहयोग्यांचे तुमच्याचविरोधात मते व आश्रमासंबंधी वादग्रस्त प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रतिक्रीया ऐकतो तेव्हा मला वाटतं कि किती भोळे आहेत आमच्या भारतातील भक्त! आणि कसे फसवत होतात तुम्ही भाबड्या भक्तांना... अन् आम्हीही कसं विश्वास ठेवतो तुमच्यासारख्या स्वघोषित संतांवर स्वत:च्या बंद डोळ्यांनी... तुमच्यासारख्या ढोँगी बाबांची सत्यता कळल्यावर मी देवाला प्रार्थनाच करु शकतो की एक दिवस असा न येवो की जे खरंच स्वत:ला संत म्हणून फक्त म्हणवूनच घेत नाही तर वास्तविक वैयक्तिक जीवनात आचरणही करतात संतांसारखाच अशांवरचा विश्वास व श्रद्धेला कलंक लागू न देवो रे बाबा !! अन्यथा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत मीराबाई, संत कबीर, संत गोराकुंभार, संत सैय्यद मोहम्मद ताजुद्दीन बाबा, संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती बाबा, ईश्वरतूल्य संत साईबाबा, संत गजानन महाराज, विसाव्या शतकातील प्रबोधनकार राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज या व अशा कितीतरी तसेच ज्यांनी अखिल मानवजातीस ईश्वर दगडांच्या मंदिरात नसून माणसात आहे ही ग्राम स्वच्छतेच्या मूलमंत्रासोबतच बहुमूल्य शिकवण दिली त्या संत गाडगेबाबा महाराजांच्या महाराष्ट्र व भारत देशातील हिँदूंच्या धार्मिक अस्मितेला कदापि काळीमा फासला जाऊ नये; आणि कलंकाचा डाग तर सोडा पण छोटासा छिट्टा सुद्धा उडवला जाऊ नये...

अप्रिय आसाराम.. तुम्ही तर कलंकित झालातच पण आपल्या या दुष्कृत्यात मुलगा नारायण प्रेम साई सिरुमलानी ला सुद्धा सामाऊन घेतलंत... असा कोणता बाप असेल जो कुकर्मात स्वत:च्या मुलाला सामाऊन घेईल.. आणि असंच करायचं होतं तर का दिलं त्या बलात्कारी पोराला ईश्वरतूल्य साई बाबा चं पवित्र नाव... सुरत ठाण्यात दोन सख्ख्या बहिणीँनी त्याच्याविरुद्धही लैँगिक अत्याचाराचा खटला नोँदवलाय.. हे तर काहिच नाही.. या सर्व खेळात संपूर्ण कुटूंबच सहभागी आहे खरं तुमचा... अर्थात तुमची पत्नी लक्ष्मीदेवी व मुलगी भारतीदेवी सुद्धा... फक्त नावासमोर देवी लावल्यानं कोणी साक्षात देवी बनून जात नाही.. आता तर तुमचा अवघा परिवारच अदृश्य आहे खरं... ते सर्व गायब आहेत... तुम्हीच जाणोत कुठं असतील ते... कारण आपण तर 'साक्षात परमेश्वराचेच अवतार' आहात ना !!! माहित असेल तर सांगून द्या कुठे लपून बसलेत ते... सुरत पोलिस मागावर आहेत त्यांच्याही.. मला तर नारायण साईवर पुर्वीपासुनच संशय होता... जेव्हापासून एका पहाडी जंगलातील त्याच्या गुप्त गुफेबद्दल 'इंडिया टीव्ही' या अजून एका प्रसिद्ध राष्ट्रीय खाजगी वृत्तवाहिनीवर पाहिलं व ऐकलं तेव्हापासूनच... नुकतच ऐकायला मिळालं कि तुमचा मुलगा हि उठून सुटून निरर्थक बहाणेबाजी करतोय याचिकाकर्त्याँविरुद्ध.. आणि करु लागलाय खरं जाहिरात स्वत: निर्दोष असल्याची स्थानिक वृत्तपत्रांमधून.. पण आम्ही यावर विश्वास कसा ठेवावा.. एक म्हण आहे बघा आमच्यात "मंदीराची इमारत मजबूत असण्यासाठी सर्वप्रथम त्याचा पाया मजबूत असावा लागतो.." आणि इथे तर मंदिराचा पाया अर्थात परिवाराचा मुखिया म्हणजे तुम्हीच कलंकित असल्यावर मंदिर म्हणजे तुमच्या परिवारातील इतर सदस्यांवर या कलंकाचा एक छिट्टा उडाला नसेल हे शक्यच कसे आहे? आणि जर तुमचा परिवार आहे निर्दोष खरोखरच तर येत का नाही समोर सुरत पोलिसांच्या..? का करावं लागतंय पोलिसांना त्याचा शोध ठिकठिकाणी 6 टिम बनवून...?

असो... मी बरंच बोललो या पत्राच्या माध्यमातून.. मी ना तुमचा समर्थक ना विरोधक! मला काय आवश्यकता होती एवढं लिहिण्याची कोण जाणे.. पण एकमात्र नक्की! माझे शब्द तुम्हाला टोचले कि नाही माहित नाही कारण तुम्ही ठरले ते शेवटी 'बेशरम'च! पण तुमच्या आताही असलेल्या समर्थकांना निश्चितच टोचले असतील माझे शब्द... मला जाणीव आहे त्याची... कारण जसे आज तुमचे विरोधक तूमचे समर्थन करणारे वक्तव्य ऐकू शकत नाही तसंच तूमचे आजही टिकून असलेले समर्थक सुद्धा आपल्या 'परमात्म्याविरुद्ध' काही ऐकू ईच्छिणार नाही मी जाणतो... पण त्यांच्यावर जरा जास्तच प्रभाव दिसतो आपला... किमान त्यांचा तरी विचार करावयास हवा होता तोँड काळा करण्यापूर्वी.. इतकं सगळं होऊनही व नवनवे कटू सत्य बाहेर येणं सूरुच असूनदेखील त्यांचा अद्यापही तूमच्यावरचा विश्वास टिकून आहे... मी तूमची माफी कदापि मागणार नाही पण माफी मागतो त्या सर्व समर्थकांची... माझा उद्देश त्यांच्या भावना दुखावण्याचा मुळीच नाही.. पण हेच कटु सत्य आहे.. मी जाणतो हे थोडं कठिण आहे पण एक दिवस त्यांनाही जाणीव होईल वस्तुस्थितीची कि तुम्ही कोणी 'संत' वगैरे नसून फक्त 'बलात्कारी बाबा' आहात... होय पैशाचा हव्यासु, किशोरवयीन मुलीँशी शरीरसुख मिळवण्यासाठी वासनेच्छा तृप्त करण्यासाठी टपूनच असलेला एक बिमार वृद्ध राक्षस! निव्वळ एक पाखंडी!! मला हे कळत नाही कि एकीकडे अवघा संत समाज तुम्हाला संत बिरादरीत नाकारत असताना अ.भा. संत महासभेचे/अखाडा परिषद चे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज का घेत आहेत तुमची बाजू?? खाजगी वृत्तवाहिन्यांवर आयोजित परिसंवादात का देताहेत ते वादग्रस्त विधाने व का जोडतात संबंध तुमच्या कूकर्मांचा साधारण परंतू संवेदनशील घटनांशी? तुमची साठगाठ तर नाही ना? अन्यथा असेल भिती त्यांना कि एका पापी संतामुळे उडून जाईल जनतेचा विश्वास संत समाजावरुन-- पण हे कदापि शक्य नाही.. संतांवरचा आमचा विश्वास व श्रद्धा अढळ आहे.. ती कमी होणार नाही.. पण एक मात्र नक्की! आता करु लागतील किमान काहितरी सुजाण भक्त चौकसबुद्धीने विचार संतांना संत मानण्यापूर्वी एकदातरी... आणि आता अपेक्षाही आहे सुजाण भक्तांकडून ती एवढ्याचीच...


तुमचा ना समर्थक ना विरोधक
एक चौकसबुद्धीचा आस्तिक

-राजेश डी. हजारे (RDH Sir)
-12/10/2013, आमगाव
(पत्र लेखक अ.भा. मराठी साहित्य परिषद, पुणे चे गोंदिया जिल्हाध्यक्ष आहेत. )

  • ता. क.: 25 एप्रिल 2018 रोजी आसाराम ला बलात्काराच्या आरोपात दोषी मानत जोधपुर न्यायालयाने आजीवन कारावास चा दंड सुनावला आहे. 


  • पुर्वप्रसिद्धी:
 

Monday 7 October 2013

प्रेमात हरले... - Poem by SWATI THUBE

Day→ 379


Blog Post→ 72


Reader's Blog→ 03


Swati's blog→ 02




प्रेमात हरले...

प्रेमात हरले
दोन शब्द माझे
विरहालाही
नि:शब्द केले
...
इतभर काव्य
तुजसाठी
भावनांना मी
चव्हाट्यावर आणले
...
भावना झाल्या
अपंग माझ्या
तुला शोधण्यास
नजरा धावल्या
...
कुठे थांबल्या
अडकल्या
पडल्या कि
वाटेतच निजल्या
...
थेंबभर काव्य
तुजसाठी
किती रक्त माझे
आटत गेले


कवयित्री: स्वाती ठुबे-खोडदे

Thursday 3 October 2013

जुमदेवबाबास पत्र

...सुरुवातीपासून वाचा

तसं मी 'परमात्मा एक' या मार्गाचा सेवक नाही पण या मार्गाच्या सेवकांशी माझा संपर्क येऊन गेला (त्या दिवशी तर विशेषत्वाने) आणि भविष्यात येणारच.. पण मी हिँदु धर्मीय असलो तरी माझ्यावर ईस्लामचा बराच प्रभाव आहे.. त्यामुळे साहजिकच मी 'परमात्मा एक' या एकमेव सत्याचा (मार्गाचा नसलो तरी) अनुयायी आहे... आपणास माहित असेलच रामटेक येथे तुमचा खुप मोठा (आश्रम/मंदिर/देऊळ/मठ/आणखी काही नेमकं काय म्हणतात माहित नाही) पण आहे..आणि जवळच 'हजरत बाबा सैय्यद गंजुशाह रहमतुल्लाह अलैह' यांचा दर्गासुद्धा.. मी दर्ग्यात जात असताना बहुतेक वेळा तुमच्याकडे येवुन नतमस्तक व्हायचो.. 'परमात्मा एक' सेवकांसाठी हे योग्य असले तरी मी मानत असलेल्या ईस्लाम मध्ये एकमेव 'अल्लाह' व्यतीरिक्त कुणापुढेही नतमस्तक होणं नियमात बसत नाही पण काय करणार..? शेवटी मी जन्मलो व वावरतो तर हिँदू म्हणूनच ना!

असो.. 3 एप्रिल व 3 ऑक्टोबर ला दरवर्षी तुमच्या जयंती व पुण्यतीथीनिमित्त वर्धमान नगर नागपूर नागपूर व मौदा येथे 'परमात्मा एक' सेवकांचा बराच मोठा कार्यक्रम असतो खरं... शक्य झालं व कधी योग आला तर तिथेही येईन भविष्यात पण प्रॉमिस नाही करत..

असो... काही चुक-भूल झाली असेल तर क्षमा मागतो.. असंही 'क्षमा' हा तुमच्या व तुमच्या सेवकांचा महत्त्वाचा गुण आहेच.. शेवटी तुमच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हास पाठवत असलेल्या या पत्राला नुकतीच प्रकाशित तुमचीच टपाल तिकीट जोडलीय..

आशीर्वाद व कृपा असावी..
मार्गाचा नसलो तरी एक सेवक
राजेश डी. हजारे
jumdev30092013.jpg
-आमगाव
(03 ऑक्टो. 2013, गुरुवार)

जुमदेवबाबास पत्र

दिवस---> 375वा

अनुदिनी/ब्लॉग---> 70वा

प.पु. महानत्यागी श्री जुमदेवजी बाबा,
आज 3 ऑक्टोबर 2013.. आपली पुण्यतिथी.. त्या स्मृतीप्रित्यर्थ माझं आपणास नमन... तसं पाहिलं तर काही आपणास पत्र पाठवण्याचा बेत नव्हताच.. परंतु नेरवाच्या दिवसी 30 सप्टेँबर 2013 रोज सोमवारला गोँदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात (MIET) तुमच्या स्मृतीप्रित्यर्थ डाक तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.. मी तसं उपस्थित राहणार नव्हतोच म्हणा पण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर VVIP राजकीय नेते राहणार होतो.. आणि असणार का नाही म्हणा..! जिल्ह्याचे खासदार ना. प्रफुल पटेल सारखे दमदार नेते केँद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री असल्यावर..

तर नियोजनाप्रमाणे मी सकाळी गोँदियाच्या एन.एम.डी. महाविद्यालयात गेलो..तसं माझं तिथे वैयक्तिक काम होतं.. पण तुम्हाला सांगू का हा तुमच्या तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम प्रारंभी याच परिसरात डी.बी. सायन्स कॉलेजमध्ये होता.. या कार्यक्रमामुळे तेथुन कोणत्या तरी परिक्षेचं केँद्र रद्द करण्यात आलं खरं.. कार्यक्रमाचा मंच उभारणार तोच जागा मर्यादित असल्याच्या कारणाने कार्यक्रमाचे स्थान MIET त स्थलांतरीत करण्यात आल्याचं कळलं.. मला तर नवलच वाटलं बुवा! बाबा जुमदेवजीच्या साध्या डाक तिकीट प्रकाशनासाठी एवढी काय गर्दी असणार? असंच मला वाटलं होतं पण---

मी गोँदियात पोचल्यापासूनच कितीतरी 'परमात्मा एक' सेवकांचे जत्थेचे जत्थे पायदळी कार्यक्रमस्थळी जाताना दिसत होते.. मी हि निघालो एनएमडी तून आणि थोड्याच अंतरावर एका प्रौढ व्यक्नीने हात दाखवला.. त्यांना मी दुचाकीवर लिफ्ट दिली.. त्यांनाही तुमच्याच कार्यक्रमास जायचं होतं व योगायोगाने मला पण.. त्या दिवशी सुरक्षेच्या कारणाने शहरातील ऑटो रिक्षा बंद असावेत बहुतेक..! MIET त पोहोचताच डोळ्यांवर विश्वास होत नव्हता.. अहो खरंच..माझा अंदाज फोल ठरला होता.. जिकडे तिकडे वाहने व माणसांव्यतीरिक्त काहीच दिसत नव्हते..

कार्यक्रम नुकताच सुरु झालेला.. मंचावर उपस्थित केँद्रात मंत्री असलेल्या बऱ्याच मंत्र्यांची भाषणे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ना. प्रफूल पटेल यांचे भाषण झालेले.. अध्यक्षस्थानावरुन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री के. शंकरनारायणन यांनी भाषण दिले ज्यात आपल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला.. व भारत सरकारद्वारा प्रसिद्ध तुमच्या डाक तिकीटाचे प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटक भारताचे उपराष्ट्रपती मा. ना. डॉ. श्री मो. हामिद अन्सारी यांच्या हस्ते झाले.. भारताच्या उपराष्ट्रपतीँनी आपल्या भाषणात वारंवार प्रफूल पटेलांचे कार्य, गोँदिया जिल्ह्याचा विकास इ. बाबीँचा आवर्जून उल्लेख केला.. आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली...

1374762_163783340487404_638683112_n.jpgjumdevstamprelease.jpgjoomdev.jpg

माझ्या नजरेत आपली ओळख 'परमात्मा एक' चे संस्थापक (जुमदेवजी ठुब्रिकर) इतकीच होती पण ती या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने कळली.. कार्यक्रमासाठी लावलेल्या हजारो खुर्च्या सेवकांनी गच्च भरल्या होत्या आणि त्याच्याही दुप्पट सेवक दोन्ही बाजुला शांतपणे उभे होते.. जितपर्यँत नजर जाईल तिथपर्यँत डोळ्यांना आपल्या सेवकांचेच दर्शन होत होते.. आणि कार्यक्रम संपल्यानंतरही हजार-दोन हजार सेवकांचे येणे सुरुच होते.. मी ज्यांना लिफ्ट दिली होती ते संजय वानखेडे सुद्धा 'परमात्मा एक' सेवक असून ते स्वत: चंद्रपूर हून आलेले होते.. हिँगना, नागपूर सारखे सबंध महाराष्ट्र व कदाचित आंतरराज्यातुनही आलेल्या आपल्या मार्गाच्या सेवकांनी MIET चे प्रांगण अगदी तुडुंब भरले होते.. काटोल हून तर अवघी बसची बसच बुक करुन आलेली होती.. मला नंतर तुमच्या सेवकांकडून कळलं कि 'परमात्मा एक' चा कार्यक्रम कुठेही असो सेवकांना कळल्यास जातातच.. ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने.. अल्पोहाराची आयोजकांकडून व्यवस्था असुनदेखील सेवक स्वत: आणलेले डबे, अल्पोहार अथवा स्वखर्चाने नाश्ता खरेदी करुन शांतपणे ग्रहण करत होते...

home-page-logo.png
home-page-logo2.png

माझ्या मनात 'परमात्मा एक' म्हणजे घराच्या दाराला लावलेली "दारु पिऊन आत येण्यास मनाई आहे." ही पाटी हि एकच ओळख होती.. पण नेरवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण जीवनभर महानत्याग करुन अंधश्रद्धा विरोधी व व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कार्याबद्दल जाणुन घेता आले.. जसे 3 शब्द, 4 तत्त्व, 5 नियम.. कच्चे सेवक, पक्के सेवक.. हातावर पर्वत घेऊन उडत्या हनुमानाचेच प्रतिक म्हणून स्विकार, जात-धर्म कसलाही भेद न करता मानवतावादाचा पुरस्कार.. वगैरे वगैरे.. आणि बरंच काही...

पुढे वाचा→ readmore.png

Wednesday 2 October 2013

नोकरी करणा-या महिलेची व्यथा (Letter by SWATI THUBE)

374वा→ दिवस

069वी→ अनुदिनी

002री→ वाचकाची अनुदिनी

नमस्कार..!
आज माझ्या या ब्लॉगिँग वेबसाईटने 50,000 वाचक भेटी पुर्ण केल्यात.. ब्लॉग च्या 374व्या दिवशी आणि ते ही 02 ऑक्टोबर 2013 म्हणजे महात्मा गांधी यांच्या 144व्या जयंतीच्या दिवशी आपण हा टप्पा पुर्ण केला त्याबद्दल या ब्लॉगच्या वाचकांचे अभिनंदन आणि धन्यवाद..!

'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेजवर युवा साहित्यिका स्वाती ठुबे - खोडदे यांनी एक पत्र पाठवले होते नोकरी करणा-या महिलेची व्यथा... या पत्राने फेसबुक विश्वात बरेच विक्रम केले व याला खुप प्रसिद्धीही मिळाली. त्यासंबंधी दैनिक 'लोकमत' मध्ये सोमवार दि. 30 सप्टेँबर 2013 रोजी अभिनंदनपर वृत्तही छापून आले.. स्वाती ठुबे यांच्या सहमतीने सदर पत्र मी खाली देत आहे...

1278056_531460616933644_1132553930_o.jpg

1.नोकरी करणा-या महिलेची व्यथा

काल सायंकाळी ऑफीसवरुन घरी येतांना चारचौघी गप्पा मारत होत्या. त्यांच्या जवळुन जातांना ऐकु आले, नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे.

1234719_155351857997219_759671131_n.jpg प्रिय सखी
“नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे” हे मी काल ऐकले होते. मला त्या वेळेस बोलावसं वाटलं होतं, तुम्ही खुपजणी होतात आणि मी एकटीच होते, आधीच खुप उशिर झाला होता, त्यात माझ्या पिल्लांचे दोन फोन येऊन गेलते. मला घराची ओढ होती म्हणून नाही थांबले मी.

सखी आम्ही नोकरी करत असलो तरी आम्ही घर सोडलेले नाही. सकाळी भल्या पहाटे आमचा दिवस चालु होतो. जे काम तुम्ही दिवसभर करता ते काम आम्हाला घडयाळाच्या काटयाकडे पाहुन सकाळी आठच्या आत करावे लागते. आम्ही नोकरी करतो म्हणुन काय आम्ही आमच्या घरच्यांना उपाशी ठेवतो काय? आम्ही आमच्या लेकरांना वा-यावर सोडतो काय? आम्ही कोणती जबाबदारी टाळतो? आमच्या दगदगीचा विचार केलात का? घरी दोन तीन तास काम करुन आम्ही एक दोन तास प्रवास करतो. आणि दिवसभर ऑफीसचे काम. ऑफीसमध्ये मजा नसते गं, पगार घेतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त काम करावे लागते, अधिका-यांचे बोलणे खावे लागतात, घरचे टेन्शन, ऑफीसचे टेन्शन, दिवसभर ते रात्री झोपेपर्यंत अनामीक टेन्शनखाली वावरत असतो आम्ही.

नोकरीवाली असले तरी मी ही एक आईच आहे. नऊ महिने पुर्ण होईपर्यंत जीव मुठीत ठेवुन बाळाचे स्वप्न पहात मी प्रवास केला. तुमच्या सारखे चोचले नाही पुरवता आले. गरोदरपणात नाही आराम करता आला. तीन महीन्याचे बाळ घरी सोडुन जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा बाळ घरी रडले की पान्हा आपोआप फुटायचा तेव्हा काळजाच पाणी पाणी व्हायचं. वाटायच पळत सुटावं आणि पिलाला कुशित घेवुन मनसोक्त भेटावं. पण ह्या नोकरीच्या बंधनांनी ममतेला दुर ठेवावं लागलं.

आम्ही तुमच्या बरोबर गप्पा करायला येत नाही म्हणुन आम्हाला गर्वीष्ट समजता पण तसे नाही आम्हाला वेळच नाही. अग, सखी घरी आल्यावर कधी काम आवरुन झोपेल असं होतं गं. जेव्हा नातेवाईक घरी येतात तेव्हाही आम्हाला ऑफीसला जावं लागतं. तेव्हा नातेवाईक आम्हाला माणुसकी नाही अशी पदवी देऊन जातात.

तुमच्यापेक्षा जास्त समस्या आमच्या आहेत. आम्ही ममतेला मुकतो. चार घास खाऊ घालण्याइतका वेळ आम्हाला आमच्या लेकरांना देता येत नाही. जेव्हा आमचं बाळ, आमच्या घरची माणसं आजारी असतात, तेव्हा तापलेल्या लेकराला सोडुन जाणं काय असतं हे तुम्हाला नाही कळणार.

आमचे सगळे सण ऑफीसमध्ये साजरे होतात. रस्त्याने प्रवासात आम्ही तुम्हाला पहातो तेव्हा तुम्ही नटुन थटुन चालले असतात. तेव्हा खुप चिडचिड होते. आमच्या कपडयांकडे तुम्ही पहात असता. आमच्या चांगल्या रहाण्याला शुध्द बोलण्याला आमच्या साध्या चपलांना तुम्ही फॅशन समजता. एका दिवसाच्या प्रवासाने तुम्ही दुसऱ्या दिवशी झोपुन घेता तर आमच्या रोजच्या प्रवासाचे काय? काय मजा करतो आम्ही?

उठल्यापासुन झोपे पर्यंत घडयाळाच्या काटयावर आम्ही नाचत असतो. आमची ममता आम्हाला अनेकदा रडवते आमची कर्तव्य आमच्या सावलीसारखी आमच्या बरोबर असतात. आमच्या जबाबदाऱ्या आमच्याकडुन आम्ही मशिनरी असल्यासारखे काम करुन घेतात तरीही आम्ही नोकरी करणाऱ्या मजाच मारतो हा गप्पांचा विषय का होतो सखी?

तुमचीच
एक नोकरी करणारी सखी
लेखिका : स्वाती ठुबे - खोडदे

Tuesday 1 October 2013

शिकून गेलो आहे (Posted by PRAVIN GHULE)

Day→373

BlogPost→68th

Reader's Blog→01

RDHSir या फेसबुक पेजवर मागील आठवड्यात वाचकांद्वारे सर्वाधिक पसंतीस पडलेली कवी प्रविण घुले यांची एक छानशी कविता पोस्ट करतोय..

1. शिकुन गेलो आहे...

सांगा त्या वादळांना
ताकदीने उभा होतो,
आता झुकणेसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
त्या निर्जीव दगडांना
मानतच नव्हतो मी,
आता डोकं टेकवणंसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
जख्मा नाही काळजात
असे काही नाही,
तरी हसणेसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
सत्याला न्याय ना इथे
दुनियाच ही लबाडांची,
तुम्हापरी कपटी वागणंसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
जरी पाहसी फिनीक्सा
सवंगड्यापरी असा तु,
आता राखेत झिजणेसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
ना हार मानली कधीही
ना मानणार आहे,
माघार घेणंसुद्धा आता
शिकुन गेलो आहे...

कवी- प्रविण घुले

स्त्रोत: RDH Sir | Facebook