Friday 17 January 2014

मी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक घडामोडी

हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्यासाठी CLICK करा
  • प्र.: आजपर्यँतच्या शिक्षणात कित्येक पैसा खर्च झाला परंतू कधीही पश्चात्ताप नाही केला की याचा योग्य फायदा झाला नाही वा जर वाचवला असता तर किती रुपये जमा असते?
  • उ.: शिक्षणात पैसा खर्च होणारच व मी चूक केली आहे हे खरे आहे पण पश्चात्ताप करुन काय फायदा?
  • प्र.: आजच्या Competition च्या जमान्यात D.Ed. करुन शिक्षक होण्यासाठी आवश्यक गुण घेऊन पात्र होण्याची ताकद आहे काय?
  • उ.: मी प्रयत्न करतोय व 10वी 12वीतील चुक सुधरवून खरंच मन लावून नि:स्वार्थी पणे 90% अभ्यास करुन कमीतकमी 80% घेण्याचा निर्धार केला आहे व "रेतीचे कण रगळीता तेल ही गळे" तर नशिबाद असली व देव तसेच मोठ्यांचा आशिर्वाद असला तर निश्चित एक दिवस पात्र होऊन शिक्षक होऊन दाखविन ही शाश्वती देतो कारण Competitionच्या जमान्यात पात्र होण्याची ताकद पूर्वीही होती व आताही आहे परंतु तीचा तेव्हा लाभ घेतला नाही मात्र आता जरुर घेईन.
  • प्र.: 12वीत ही 70% घेईन म्हणत होता परंतु 55.50%च मिळाले.
  • उ.: 12वीत मी अभ्यासच न करुन चूक केली होती व मनसमजवनी करत होतो. व खरे तर मला 60च्या वर अपेक्षा नव्हती. तिचा पश्चात्ताप झाल्याने मी नव्या जोमाने D.Ed. ला सुरुवात केली असून अभ्यास करुन 80% घेण्याचे बोलत आहे.
  • प्र.: तू सध्या Top 10 मध्ये हवा होता पण Bottom Ten मध्येही नाही.
  • उ.: मी D.Ed. मध्ये 100 पैकी Top 15 मध्ये आहे. व याचा Result Result नंतरच कळेल.
  • प्र.: रात्री उशीरापर्यँत जागून झोप पूर्ण होऊ न देता आरोग्यावर विपरित परिणाम होईल असा अभ्यास करुन काय फायदा?
  • उ.: अभ्यास कसा व किती तसेच केव्हा करायचा हा माझा Matter झाला परंतु आरोग्याची काळजी मात्र मी घेईनच.

वरील प्रकारे फत्त प्रश्न माझ्या बाबुजीँनी घरच्यांसमोर उच्चारले व त्यांच्या प्रश्नांना कंटाळून मी उपाशीच झोपून गेलो नंतर थोडासा जेवण (2 कोचईच्या वळ्या) घेऊन लिहित आहे.

असो! माझ्या वडिलांचेही बरोबरच आहे. त्यांच्या बोलण्याचा मला राग कधीच येत नाही परंतू खंत वाटते की ते आपल्या मनातील प्रश्न व शंका-कुशंका प्रेमाने माझ्याशी बोलून त्यांचे निराकरण करत नाही वा मला प्रेमाने समजावत नाही आणि माझ्यात तर त्यांच्यासमोर अशा मुद्द्यांबद्दल काही बोलण्याची हिँमतच होत नाही. परंतू मी त्यांचे बोलणे ऐकूण घेतो व पटलेली गोष्ट फायद्याची असतेच ती करण्याचा प्रयत्न करतो. असो!

किती वेळचा लिहित आहे. लिहीता-लिहिता हात दुखून गेले. तुमचा तोँड नाही दुखला का इतके वाचताना? चला झोपा! किती रात्र झाली. सगळे झोपले. रात्रीचे 11.15PM वाजले."
Good Night

वाचक मित्रांनो माझ्या सदर पत्र लिहून झाल्यानंतर शेवटी मी काही स्पष्ट करु ईच्छितो...

वरील नोंद माझ्या दैनंदिनीत / डायरीत अर्थात 'राजूच्या रोजनिशीत' 26/10/2009 रोजी.. परत वर्ष नीट वाचा.. 2009.. मध्ये लिहिलेला असल्याने हि परिस्थिती 'तेव्हाची' होती.. आता काळासोबतच परिस्थितीही बदलली.. आणि या प्रश्नोत्तरामुळे कदाचित आपला गैरसमज होऊ शकतो कि माझे बाबुजी तेव्हा वरील प्रश्नांबाबत (माझ्याबाबत काळजीग्रस्त) असले तरी खर्च वगैरेबाबत खुप चिँताग्रस्त होते वगैरे..! हे सत्य नसून त्या 'क्रॉस कनेक्शन' फोन कॉलमुळे माझ्यावर आलेला संताप बाहेर काढण्याकरिता त्यांना वरील प्रश्न उच्चारावे लागले होते आणि तसे करणे रास्तही होते.. त्या प्रश्नांचे मी समक्ष त्याच वेळी उत्तरे देऊ शकलो नसलो (जाणून दिले नसले) तरी त्याच वेळी माझ्या मनात जी उत्तरे होती ती वर नोँदलेली आहेत.. त्यादिवसानंतर बाबूजीँच्या तोँडून त्यांनी माझ्या शिक्षणावर केलेल्या खर्चासंबंधी 'ब्र' ही विचारल्याचे माझ्या लक्षात नाही.. कारण मुळातच तो त्यांचा स्वभाव नाही.. आता 'त्या' गोष्टीला 4 वर्षाहून अधिक दिवस झालेत.. माझं डीटीएड 2011 मध्येच पुर्ण झालं.. माझा निकाल आपणास माहितच असेल.. आणि नसेल तर मी या पत्रमालिकेच्या शिर्षकाप्रमाणे 'मनातल्या मनात' दिलेल्या उत्तराचे परिहार्याने वचनाचेच काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता आपणास लागलेली असेल; पण ते थोडं गुलदस्त्यात सिक्रेट ठेवुयात.. वाचत राहा ही पत्रमालिका म्हणजे कळेलच आपणास माझा निकाल आणि डीटीएड काळातील माझं जीवनसुद्धा... आणि हो मी वरील प्रश्नांची प्रत्यक्ष उत्तरे देऊ शकलो नाही याचा अर्थ काही भलताच लावू नका बरं का! आणि आपला अजून एखादा गैरसमज होऊ नये म्हणून सांगूनच टाकतो.. आमचं एकमेकांवर तेव्हाही प्रेम होतं आणि आताही भरपूर प्रेम आहे कारण "माझे बाबूजी जगातील 'बेस्ट' बाबा आहेत..."

तुमचाच
राजेश

ता.क.- पत्रातील नोँद मुळ 2009 मध्ये लिहिले असल्याने प्रसिद्ध करताना जाणीवपुर्वक व्याकरणीय चुका दुरुस्त केलेल्या नाहीत.

मुळ लेख- 26 ऑक्टो. 2009 (आमगाव)
प्रसिद्धी- 17 जाने. 2014 (आमगाव)

अणुक्रमणिका (कादंबरी/मनातल्या मनात)

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com