Pages

Sunday, 30 December 2012

BlogPost 36: 'ते 13 दिवस' - 16 ते 29 डिसेँबर 2012

सन 2012... या वर्षाच्या प्रारंभी अशी एक अफवाच जणू पसरली होती कि... सन 2012 या वर्षाच्या अंतासोबतच; अहो कशाला अंतापूर्वीच 21 डिसेँबर 2012 रोजीच संपूर्ण जगाचा विनाश होईल... जाणीव तर होतीच कि हि निव्वळ अफवा आहे... नंतर जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक व खगोलशास्त्रज्ञांनीदेखील ही अफवा फेटाळली... आणि झालेही तसेच... (21 डिसेँबर) 2012 या वर्षात युगाचा तर अंत झाला नाही... मात्र या दुर्दैवी व दु:खदायी वर्षात माणुसकीचा अवश्य अंत झाला... आणि आता जाता-जाता हा वर्ष संपुर्ण देशाला शोककळेत डुबवून जातोय... आणि भारतीय जनतेला जागवूनदेखील..!

16 डिसेँबर 2012... दिल्ली या देशाची राजधानी असलेल्या शहरात धावत्या बसमध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर पाशवी रितीने सामुहिक बलात्कार करून 6 नराधमांनी मानवतेला काळीमा फासणारे अमानुष कृत्य केले... आणि ही बातमी वा-यासारखी पसरताच अवघा देश रस्त्यावर आला... तरूण-तरूणी, प्रौढ, वयस्क, स्त्री-पुरूष, सर्व... सर्व... आणि अगदी सर्वच...! संपूर्ण देशात या घटनेविरूद्ध एकच जनक्षोभ उसळला... 'We Want Justice..!' 'Hang The Rapist'... निश्चितच याचे श्रेय मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्था यांना द्यावेच लागेल म्हणा...! अन्यथा कदाचित हे शक्य झाले नसते... पण का? एका बलात्काराच्या घटनेविरूद्ध अवघा देश का म्हणून रस्त्यावर यावा? काय यापुर्वी बलात्काराच्या घटना घडल्या नव्हत्या? काय ती तरूणी त्यांची कुणी नातेवाईक होती? तर नाही... तरी आला... याचे कारण एकच... त्या 6 नराधमांनी केलेला 'तो' अत्याचार हा फक्त त्या एका तरूणीवर झालेला नव्हता... तर संपूर्ण भारताच्या स्त्रीशक्तीवर झालेला तो अमानवी बलात्कार होता...

आज बहुतेक सामान्य जनता सर्वाधिक पब्लिक ट्रांसपोर्टच्या बसेसवर प्रवास करते... कारण सुरक्षित प्रवासाची मनात खात्रीही असते व ट्रांसपोर्ट हमीही देते... आणि हाच प्रवास एका तरूणीच्या आत्मसन्मानास व 13 दिवस मृत्यूलाही परतवून लावल्यानंतर जीवास बेतावा यापेक्षा मोठे दु:ख काय असणार! त्या बसवर कुणीही असू शकत होतं; ही अमानवी घटना अगदी कुणासोबतदेखील घडू शकत होती; तिथे कूणी असू शकत होतं... माझी-तुमची-आमची अगदी कुणाचीही मुलगी, बहीण, पत्नी, आई... आणि 'ती' देखील कुणाची ना कुणाची नात, मुलगी, बहीण होतीच... आणि म्हणूनच हा दु:ख तीचा एकटीचा न राहता आपण सर्वाँचा झाला व हा जनक्षोभ स्वाभाविच होता व आहे... किँबहूना ही जाग आम्हा-तुम्हा व संपूर्ण देशाला थोडी पूर्वी आली असती तर कदाचित आज 'ती' ('दामिनी' म्हणा वा 'निर्भया' काय बिघडतय?)चा बळी गेला नसता..! उशीरा का होईना... "मला अजून जगायचंय..." अशी जिद्दच घेऊन 13 दिवस मृत्यूलाही अगदी आपल्या लक्षाच्या अवतीभवती गटांकळ्या घालून परतवून लावण्यास यशस्वी ठरल्यानंतर अखेर धैर्यवान 'भारत कि बेटी' 'दामिनी' वा 'निर्भया' (काल्पनिक नाव)ने 29 डिसेँबर 2012 रोजी काळ्या शनिवारी 'सिँगापूरच्या माऊंट एलिजाबेथ रुग्णालयात' सुर्योदयाच्याही ब-याच पूर्वी अखेरचा श्वास घेतला... 'दामिनी/निर्भया' गेली... पण 'ती' गेली नाहीच... 'ती'ने स्वत:चा बलिदान देऊन अवघ्या भारत देशाला जागवले...

देश तर जागला... हो काही प्रमाणात सरकारही जागली असणार...! पण शंकाच वाटते... काय या घटनेनंतर व 'निर्भयाचा'च्या बलिदानानंतर तरी खरंच देशाची सरकार जागली? मला असं मुळीच म्हणायचं नाही कि सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही... पण काय सरकारची बस् एवढीच जबाबदारी होती? त्या आंदोलनकर्त्यांसमक्ष येऊन किमान राजकारण्यांच्या राजकीय स्टाईल आश्वासनानेच सही... पण आंदोलकांचे विचार, मते व मागण्या जाणण्यासाठी तर सोडा पण किमान ऐकण्यासाठी तरी येण्याचे कूण्याही राजकारण्याने आवश्यक समजू नये हे विस्मयकारक वाटते... आणि देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान महामहीम राष्ट्रपतीँना भेटण्यासाठी शांततामय मार्गाने राष्ट्रपती भवनात जाण्याचा प्रयत्न करणा-या आंदोलकांनाही थांबवण्यात यावे... शिवाय शांततामय रितीने प्रदर्शन करणा-यांवर अश्रूधुर व थंडीने गारठलेल्या दिवसात थंडगार पाण्याचा वर्षाव करणे... हीच काय सरकारची जबाबदारी? जगातील सर्वात मोठा लोकशाहीसत्ताक देश म्हणून मिरवून घेणा-या भारताच्या जनतेला देशाच्या सरकारला जाब विचारण्याचा व सरकारपुढे आपल्या मागण्या मांडण्यासाठी शांततामय मार्गाने अहिँसक आंदोलन करण्याचाही अधिकार नसावा यापेक्षा दुर्दैवी बाब देशासाठी कोणती असावी?

एकीकडे आम्ही जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतो, परंतु आज महासत्ता असलेल्या अमेरीकेच्या राजकीय नेत्यांशी भारताच्या राजकीय नेत्यांची तुलना करून फरक जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या लक्षात येईल कि जागतिक महासत्ता बनण्यासाठी जागतिक महासत्ता असलेल्या देशाचे राजकारणी नेते कसावे लागतात... आणि यासाठी मला अलीकडेच अमेरिकेत घडलेल्या एका प्रकरणावर प्रकर्षाने कटाक्ष टाकावासा वाटतो... आशा वाटते की जर हा लेख किँवा ही घटनेवर कुण्या भारतीय नेत्याचे लक्ष गेल्यास अमेरिकेच्या राजकारण्यांकडून काहीतरी शिकून घेण्याचा प्रयत्न करतील...

टिप: याच लेख/ब्लॉग चा यापुढील मजकूर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

1 comment:

  1. Chandrakant Bhoslw5 September 2016 at 14:50

    .... तर या साठी व्यापक जनआंदोलनाची गरज आहे... तसेच सर्वच बलात्काराच्या गुन्ह्यांकडे सारख्याच नजरेने पाहायला हवे.. चित्रपटातील भुतांप्रमाणे मेणबत्ती घेवून गरका मारणाऱ्या आंदोलनाने मात्र काहीच शक्य होणार नाही... तर राजेश हजारे सर मस्त पत्र...

    ReplyDelete