Pages

Thursday, 20 December 2012

Blog 33- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')

तुमचे मित्रमैत्रिणी, तुम्ही स्वत: आणि आजुबाजूच्या तरूण मुलामुलीँच्या आयुष्यात डोकावून बघता तेव्हा-

1.उमेद वाटावी, आनंद व्हावा असे कोणते बदल, मतं, जाणिवा तुम्हाला दिसतात?

=> प्रत्येकच क्षेत्रात आजचे तरूण-तरूणी व मित्रमैत्रिणी देखील यशस्वी होताहेत. आज प्रत्येकाला स्वत:च्या आयुष्याची फिकीर असते व त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने कार्य करत असतो व आजची तरुण मंडळी स्वत:च्या पायावर उभी होतेय. प्रत्येकच क्षेत्रात मित्रमैत्रिणीँना वा आजच्या तरुण-तरुणीँना लाभत असलेले यश व त्यांची प्रतिभा पाहून आनंद होतो; शिवाय आपल्या जीवनात देखील यशस्वितेचा कळस गाठण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा मिळते व नवी उमेद जागृत होते. आजच्या तरुणांना 'स्व', कुटूंब व समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव असून त्यांची सकारात्मक वृत्ती पाहून आनंद होतो.

•पूर्वीच्या पिढीपेक्षा नव्या पिढीच्या जगण्या-वागण्यातले कोणते बदल दिलासादायक असे तुम्हाला जाणवते?

=> पूर्वीच्या पिढीपेक्षा नवी पिढी प्रगतीशील (Advance) होत चाललेली आहे. नव्या पिढीतील नागरीकांच्या विचारांमध्ये सकारात्मकता झळकते. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्याने आज प्रत्येक व्यक्ती आधुनिक सुख-सोयीँचा व साधनांचा वापर करताना दिसतो. पूर्वीच्या पिढीमध्ये जगण्या-वागण्यात व बोलण्यात जी संकूचित वृत्ती जाणवत होती ती नव्या पिढीत नाही. आज प्रत्येक व्यक्ती मनातलं व्यक्त करणे शिकलाय व मनाला पटेल ते मोकळेपणे (बिँधास्त) करू लागलाय. ही बाब मनाला दिलासा देते.

2. काळजी वाटावी अशा कोणत्या अवघड गोष्टी तुम्हाला दिसतात / जाणवतात आणि खुपतात?

=> आजचे तरुण-तरुणी भावना व्यक्त करणं शिकलेत. मी देखील एक तरुण म्हणून समजू शकतो कि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मनातलं सांगण्यासाठी तरुणावस्थेच्या उंबरठ्यात असलेल्यांना वा तरुणांना 'आपलंही कुणीतरी असावं' ही भावना मनात येणं स्वाभाविकच आहे; किँबहूना या अवस्थेत ती नैसर्गिकच आहे. मग ते 'कुणीतरी' कुणीही असू शकतं! मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी वा आणखी कुणीतरी..! पण---

आज जरी खरी मैत्री संपली नसली तरी ती फार कमी आढळते. शिवाय जसं मी मागील प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं त्याप्रमाणे आजची पिढी विचारी होत असली तरी त्यात अविचारच अधिक झळकतो.

आजच्या तरुण पिढीला परलिँगी म्हटलं तर मित्र-मैत्रिण तर नकोच... प्रत्येकाला फक्त प्रियकर वा प्रेयसीच हव्या आहेत व त्यांचीही संख्या अमर्याद आहे...

माझ्या लिहिण्याचा उद्देश "प्रेम करणं चुकीचं / वाईट / अपराध आहे" असं सांगण्याचा मुळातच नाही. कारण पवित्र प्रेम करणारे प्रेमवीर देखील आहेत; पण किती..?

मला तर प्रेमाच्या नावाखाली निव्वळ प्रियकर व प्रेयसीच्या भावना व शरीराशी खेळणारे व निव्वळ वासनेच्या आहारी जाऊन फक्त शरीरसुखासाठी 'प्रेम' या पवित्र अडीच अक्षरांची विटंबना करणारेच अधिक दिसतात.

तरुणावस्थेच्या कोमल वयात जाणते-अजाणतेपणे अश्लीलतेचे घाणेरडे प्रदर्शन करणा-या महाराष्ट्रातील रेव्ह पार्ट्याँचे उदाहरण फार जुने नाही.

आजची तरुण पिढी कूणी मौज म्हणून, कुणी मित्रांच्या नादाला लागून तर कुणी आपला मोठेपणा / वर्चस्व गाजवण्यासाठी तंबाखू, खर्रा, सिगारेट, मद्य आणि 'ड्रग्स' सुद्धा सेवन करू लागलीय. हे सर्व तरुणाईला लागलेले व्यसनाचे वेड पाहून काळजात चर्र होतं. शिवाय तरुणांमध्ये वाढता व्याभीचार आहेच.

या आणि अशा असंख्य गोष्टी मनाला खुपतात.

[Read this article Continue on Next page]

No comments:

Post a Comment