Pages

Thursday, 15 August 2013

15 ऑगस्ट - 'नावाचा' राष्ट्रीय सण

ब्लॉग → ५८वा

दिवस → ३२६ वा

indian-flag1.gif


प्रिय भारतीय बहिणी व भावांनो ..! आज १५ ऑगस्ट २०१३. भारताचा ६७ वा स्वतंत्रता दिवस ... भारताला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे झालीत ... आपण ६६ वर्षाँपासून मोठ्या थाटात स्वातंत्र्य दिन साजरा करतो .. अवघा भारत देश अगदी देशभक्तीच्या उल्हासात या दिवशी ऊर्मीत येतो.. १५ ऑगस्ट जातो आणि मग देशाची परिस्थिती व भारतीयांची देशभक्ती पहावयास मिळते ती 'जैसे थे!' अशीच देशभक्ती आम्हा भारतीयांमध्ये वर्षात परत जागृत होते ती २६ जानेवारी रोजी.. आणि यानंतरही जर कधी ती निर्माण झालीच तर कुण्या समाजसेवकाने क्रांतीची मशाल पेटविल्यास; पण आता तर ते ही कमी झालंय ... काय आपण खरंच राष्ट्रीय सण (स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन) साजरे करतो ..!

राष्ट्रीय सणांचा अर्थ काय? कशासाठी साजरे केले जातात राष्ट्रीय सण? भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणा-या कितीतरी थोर-महापुरुषांना सलाम, त्या अविस्मरणीय व क्रांतीकारी दिवसाची आठवण व भविष्यात भूतकाळामध्ये भारतीयांनी जगलेली पारतंत्र्यकालीन परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ...

66s.jpg
66c.jpg
66z.jpg

आजच्या अभ्यासक्रमात मूले, तरुण कितीही शिकत असले १५ ऑगस्ट व २६ जानेवारी चे महत्त्व तरी त्यांना राष्ट्रीय सणांबद्दल अधिक विचारल्यास बालकांपासून तर बुढ्ढ्यापर्यँत (म्हातारे) सर्वाँकडून एकच उत्तर मिळेल - राष्ट्रीय सण म्हणजे पूर्वतयारी, रंगरंगोटी, शुभेच्छा-संदेश, SMSes, तोरण-पताका लावून सजसजावट केलेल्या वातावरणात कूण्या पाहूण्याच्या उपस्थितीत नविन/स्वच्छ ड्रेस परिधान करून डौलात मान व शानेने उंचावर फडकत असलेल्या ध्वजाला (तिरंगी झेँडा) सलामी देणे, रोजच्याच राष्ट्रगीतासह निवडक देशभक्तीगीतांमार्फत निव्वळ 'मनोरंजन' करून घेणे, मोजक्या ठिकाणी बक्षिस वितरण व मिठाई वाटपाचा केवळ एक सण! फक्त ऐकण्याच्या उद्देशाने 'टाईमपास' करवून घेण्यासाठी व्यासपीठावरील पाहूणे व निवडक विद्यार्थ्याँची भाषणे (ते ही आज कुठे घेतली/दिली जातात)... आठवडाभराच्या वर्तमानपत्रे, साप्ताहिके व नियतकालीकांमधून राष्ट्रीय सणांबद्दलची नानाविध माहिती व देशभक्तीसाठी राष्ट्रीय प्रतीकांचा (विशेषत: ध्वज) मान राखण्यासाठी जनजागरणपर संदेश व मोहिमा ... आणि तरी लहानगे तर लहानगे सोडाच पण देशाच्या मोठ-मोठ्या जाणत्या लोकांकडून व सळसळत्या रक्ताच्या तरुण युवांकडून देखील प्लॅस्टीकचे ध्वज रस्त्यावर फेकले जातात आणि जातात पायाखाली तुडवले देखील (अर्थात याला काही अपवाद आहेत म्हणा) .. !!

2012110611525455.jpg

म्हणून सर्वप्रथम राष्ट्रीय सण साजरा करण्यामागील मुख्य उद्देश, राष्ट्रीय प्रतीकांचे महत्त्व सांगतानाच त्यांचा मान कसा राखता येईल याचेही ज्ञान देणे आवश्यक आहे ... शिवाय राष्ट्रीय प्रतीकांचा (परिहार्याने देशाचा) अवमानच करता येऊ नये अशी काही व्यवस्था करता येईलच कि... मागील तीन दिवसांपासून मी जवळपास सर्वच वृत्तपत्रात वाचतोय "प्लॅस्टीकचे तिरंगी ध्वज वापरणे टाळा." अशी वर्तमानपत्रात सूचना देण्याऐवजी प्लॅस्टीकच्या ध्वजांवरच बंदी आणली तर चालणार नाही का? काही जण मला वेड्यात काढतील तर काही प्लॅस्टीकचे ध्वज विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित करतील, असे ध्वज वापरणारे तर म्हणतील कि हे राष्ट्रप्रेम आहे... पण ध्वज विक्रेत्यांना 26 जानेवारी व 15 ऑगस्ट सोडूनही पोटा-पाण्याचा प्रश्न असतोच कि..! आणि खरं राष्ट्रप्रेम हे हृदयात असावं लागतं त्यासाठी प्लॅस्टीकचे ध्वज वापरण्याची स्वतंत्र गरजच ती काय?? आणि जर वापरलेच जातात प्लॅस्टीकचे ध्वज तर त्यांची सन्मानपूर्वक योग्य विल्हेवाट देखील लावता येणे गरजेचे आहे ...

आज कॉन्व्हेँटपासून तर कॉलेजपर्यँत देशभक्तीचे धडे दिले जातात पण आजपर्यँत मी स्वत:च्या डोळ्यांनी निरीक्षण केल्यानंतर आपणास एक प्रश्न विचारू ईच्छितो-- किती शिपाई, कर्मचारी शाळा-विद्यालयात राष्ट्रगीत सुरू असताना सावधान स्थितीत उभे राहतात? व किती प्राचार्य/मुख्याध्यापक त्यांना ५२ सेकंद सावधान राहण्याची सूचना देत सावध करतात? आम्ही एकिकडे बाळ-गोपाळांना राष्ट्रभक्तीचे बाळकडू पाजत असतो व दुसरीकडे त्यांच्याच डोळ्यासमोरील कर्मचारीवर्गाला राष्ट्रगीताच्या वेळी सावधान उभे राहण्यासाठी साधा ५२ सेकंदांचा अवधी नसतो तर कुठून छोट्या विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखण्याचे संस्कार होणार ... आणि मग ते तिरंगा ध्वज चिखलात फेकत वा पायाखाली तुडवत असतील तर त्यांचं चुकतं तरी कुठे !! अर्थात याला आपण मोठेच सर्वस्वी जबाबदार आहोत मग ते सुशिक्षित तरुण असतील पालक, कर्मचारी, शिक्षक, प्राचार्य वा आणखी कुणी! आज भारतीयच तिरंग्यास पायदळी तुडवतात अन्यथा ईश्वर/अल्लाह न करो पण एक दिवस असा येईल कि कुणीही परकीय देशातून येईल व तिरंगा तुडवत जाईल म्हणून आतातरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ... याकरिता सर्वप्रथम आपण स्वत:च अंतर्मनातून वेळ जाण्याअगोदर बदलले पाहिजे ...

मी जाणतो आज देशापुढे ब-याच समस्या आहेत ... नक्षलवाद, दहशतवाद, शेजारी देशांची घुसखोरी, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अमानवी अत्याचार, महागाई आणि बरंच, बरंच, बरंच काही ...

वर्षाची सुरुवातच 'निर्भया'वरील अमानूष अत्याचार व तीच्या निधनानंतर देशभर पसरलेल्या दु:खाच्या सावटाने, झाली आणि आजही स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनेत मात्र घट झालेली नाही... नक्षलवाद्यांनी सत्ताधारी पक्षाच्या वरीष्ठ व सत्कर्मी नेत्यांना छत्तीसगढ राज्यात केलेल्या हल्ल्यात ठार केल्याची घटना ताजीच असताना परवाच्याच दिवशी त्याच राज्यात आणखी तीन जवान नक्षलवाद्यांशी लढता-लढता शहिद झालेत...

याच महिन्यात शेजारी राष्ट्राच्या सैन्याने भारत-पाक सीमेवरील नियंत्रण रेषेवर (LOC) शस्त्रसंधीचे उल्लंघन करून वारंवार भारतात घुसघोरी करत गोळीबार केला (व आताही सुरुच आहे) ज्यात भारताचे ५ जवान शहिद झाले ...

"का जवानांनी मिटले डोळे
सीमेवरती लढताना
शेवटी मी श्रद्धांजली देतो
अमुच्या शहिदांना
५ ऑगस्टला दिली सैन्यांनी
प्राणाची कुर्बानी
घुसखोर ते होते सगळे
सगळे पाकिस्तानी
या भारत देशामधली
LOC ची कहाणी
घुसखोर ते होते सगळे
सगळे पाकिस्तानी"

देशात गत ६६ वर्षाँपासून संपुष्टात येऊ न शकलेला भ्रष्टाचार आताही वाढतच आहे...जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या तूलनेत भारताचे चलन 'रुपया' (₹) चे दिवसेँदिवस अवमूल्यन होऊन रुपया घसरतच आहे ... परिहार्याने रोजच्या रोज महागाई वाढत (वाढलेली) आहे ...

स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या लेखात या आणि अशा अनेक देशासमोरील समस्या व आव्हानांचा समावेश होणेही आवश्यकच आहे ... पण अशा समस्यांवर फक्त संसदेत (गदारोळ घालत) कायदे निर्माण करून वा अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकार वारंवार का अपयशी ठरतंय याचा जाब विचारण्यासाठी सत्तारूढ व विरोधी तसेच इतर पक्षा-पक्षांनी, नेत्या व मंत्र्यांनी परस्परांवर टिका-टिप्पणी व आरोप-प्रत्यारोप करून काहिही साध्य होणार नसल्याचे ते खुद्ददेखील जाणतात... देशासमोरील संकटे/समस्या कशा संपुष्टात आणता येतील यावर सर्व पक्षांनी एकजूट होऊन चिँतन करण्याची गरज आहे ...

national-thumb.jpg
mb-rdh-maharajbagh-16-02.jpg
photo1321.jpg

अखेरीस मी एक सांगू ईच्छितो कि सदर लेख लिहिण्यामागे माझा हेतू कूण्याही वैयक्तिक वा संघटित व्यक्ती, नोकरदार, नेता, मंत्री, व्यवसाय, वा पक्षाच्या भावना दुखावणे वा त्यांच्यावर टिका-टिप्पणी करणे हा मुळीच नाही ... तरी कुणाच्या भावनांना ठेच पोहचत असेल तर 'क्षमस्व!' हा आपणापर्यंत राष्ट्रीय प्रतिकांचं (विशेषत: प्लॅस्टीकच्या ध्वजाचं) १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सण 'स्वातंत्र्य दिन' साजरा केल्यानंतर प्रत्येकच वर्षी दिसणारं वास्तवदर्शी आणि तितकंच चिँताजनक अपमानास्पद वाटणारं चित्रण व्यक्त करण्यासाठी माझा 'लहान तोँडी बराज मोठा घास' घेतल्याप्रमाणे हा छोटासा लेखनप्रपंच ... सदर लेख वाचल्यामूळे एक जरी रस्त्यावर वा कडेला धूळ खात खितपत पडून असलेला तिरंगा सन्मानपुर्वक उचलला गेला तरी मी माझा हा इवलासा प्रयत्न सार्थक झाल्याचे समजेन ...!

जय~हिँदस्वातंत्र्यदिन ~ चिरायु होवो ..!

HAPPY INDENPENDENCE DAY

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!rdhautographeng.jpg

-राजेश डी. हजारे (RDH)

-आमगाव (१५ ऑगस्ट, २०१३)


  1. अद्ययावत (Update): सदर लेख २०१३ मध्ये मराठीत प्रसिद्ध होऊन देखील २०१६ च्या ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण ऑगस्ट महिनाभर भारतासहच अमेरिका, जर्मनी, फिलीपीन्स, फ्रांस आणि इतर देशात दररोज सरासरी १००० वेळा वाचला जात होता.
  2. २०१३ मध्ये सदर लेख प्रकाशित करताना मागील अनुदिनी लेखाचा उर्वरित या पृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आला होता मात्र वाचकांना वाचताना त्रास होऊ नये व एकाच पृष्ठावर संपूर्ण लेख वाचता यावा याकरिता सदर पृष्ठावरील मुळ मजकूर मागील पृष्ठात समाविष्ठ करण्यात आला. आता सदर संपूर्ण लेख मागील मुख्य पृष्ठावर उपलब्ध आहेच शिवाय या लेखास वाचकांचा भरघोस प्रतिसाद लक्षात घेता ज्यांनी ही लिंक बुकमार्क म्हणून कॉपी केली असेल त्यांना सुद्धा उपलब्ध करून देण्याकरिता पुन्हा प्रकाशित करण्यात येत आहे. 
  3. शेवटचे अद्ययावन: १४ ऑगस्ट २०१६ 

1 comment: