Pages

Thursday, 15 November 2012

Blog17: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

आज भाऊबीज अर्थात रक्षाबंधनानंतर बहिणीने भावाला ओवाळावयाचा दुसरा सण...

पण मी हिँदू... मला मात्र बहिणच नाही... एक आहे बहिण मानलेली... पण तीही मुस्लीम धर्मीय... त्यामुळे भाऊबीज वा रक्षाबंधन साजरी करण्याचा प्रश्नच नाही... पण दु:ख याचं नाहीच मुळी... दु:ख आहे मानलेली बहिण असूनदेखील कदाचित माझ्याच चुकांमूळे स्वत: बहिणीचा भाऊ होऊ न शकल्याचे...

तसं सांगायचं तर भाऊ-बहिणीच्या नात्यात स्वत: जगलेलं सत्य वास्तवावर मी माझं आत्मकथनपर पुस्तक 'माझी ताई : एक आठवण' (Maazi Tai : Ek Athvan) लिहून ठेवलंय पण ते ही प्रकाशित करणार नाहीच... आणि का तर त्याच बहिणीला दिलेलं वचन पाळण्यासाठी... बहिण-भावाच्या नात्यात स्वत:च्या अंतरात्म्यातील भावाला काय वाटतं ते सांगताना माझ्या मनातील भावाचं दु:ख व्यक्त करणा-या भरपूर मराठी, हिँदी व इंग्रजी कविता देखील रचल्या...

फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कीँग वेबसाईट्स वर कित्येक विषयावरील कविता अपलोड केल्या पण बहिणीवरची कविता अपलोड करण्याची कधी हिँमतच झाली नाही... कारण भिती वाटते एखादा मित्र माझ्या कवितेची अवहेलना, टिँगलटवाळी तर करणार नाही... कारण ती अवहेलना माझ्या कवितेची वा माझी असल्यास मला काही वाटणार नाही पण माझ्या ताईच्या नावा वा नात्यावर केलेली अवहेलना माझ्यातील भाऊमन पचवू शकणार नाही... आणि म्हणूनच मी यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या सणाला माझ्या आत्मकथनातील भाऊ-बहिणीच्या नात्यावरील माझी स्वत:ची निवडक अवतरणे (Quotes) फेसबूकच्या वॉलवर रक्षाबंधनानिमित्त... लिहिली होती. तेव्हा कुणीतरी किरण पाखरे नावाच्या तरूणीने माझी बहिण होण्याचा प्रयत्न केला होता पण माझी बहीण होण्याची पात्रता तिच्यात नसल्याचं अगदी तीनं स्वत:च सिद्ध करून दिलं... आणि खरं सांगायचं तर माझ्यातील भावाची माया मिळवण्यासाठी माझ्या बहिणीव्यतीरिक्त मला ईतर कुणी वाटेकरी नको कारण माझ्या ताईची जागा माझ्या मानलेल्या बहिणीव्यतीरिक्त माझ्या जीवनात कुणीही घेऊ शकणार नाही व मी घेऊही देणार नाही.कारण मी 02 जानेवारी 2011 रोजी 2010 या कवितेच्या 4 थ्या चरणात लिहिलंय...

एकच आहे बहिण मजला
उद्याही एकच राहील
विसरुनी तीला
कसा हा 'राजेश'
दुसरी ताई पाहील?
न होईल शक्य
जरी आलं तरी
मरण या भावाला...

तर असो... आज मी ब्लॉग लिहिणार नव्हतो कारण गत 3 दिवसांपासून माझी प्रकृती बरी नाही... पण आज भाऊबीज... आणि माझ्या ताईसमोर माझीप्रकृती काय चीज आहे... जर बहिणीचा आशीर्वाद असेल तर मला काय होणार आहे... आणि दररोज बहिणीसाठी नि:स्वार्थी मनाने प्रार्थना करतआलेल्या भावाला तो अल्लाही कसं काही होऊ देईल... वरून आज भाऊबीज... आजचा दिवस तर बहिणीसाठी भावाने प्रार्थना करण्याचा... जर आज मी स्वत:ची प्रकृती बरी नाही म्हणून बहीणीसाठी काही लिहिणार नाही तर मी आजवर केलेल्या प्रार्थनांना काय अर्थ राहील... म्हणूनच स्वत:च्या प्रकृतीचा विचार न करता मी लिहितोय... आज भाऊबीज... माझी ताई तर खुप दूर आहे... अंतराने आणि कदाचित मनानेदेखील... त्यामुळे ताईशी माझी भेट तर होत नाही... पण दूरूनच का होईना ताईच्या सहवासात वावरताना मी लिहिलेल्या माझ्या आत्मकथनातून, तर त्या प्रत्येक सुखद-दु:खद कडू-गोड आठवणी संचयित असलेल्या माझ्या गत 3 दैनंदिनीँमधून तर कधी माझ्या कवितांमधून वा भ्रमणध्वनीयंत्रतील ताईची छायाचित्रे पाहत बहिणीशी भेटत असतोच...

आणि आज भाऊबीजेनिमित्त बहिणीला काही देऊ तर शकत नाही... पण माझ्या ताईच्या 19 व्या वाढदिवसानिमित्त मी लिहिलेल्या उधान फुटलं या भावाच्या सुखाला... या कवितेच्या शेवटच्या 2 चरणात थोडा फार बदल करतोय...

सदा गं जीवनी
तू हसती राहो
अल्लाह तुला
सदा सुखातच ठेवो
हिच प्रार्थना
ईश्वरचरणी देवाला...
पुर्‌या हो ताई
सर्व तुझ्या ईच्छा
भाऊबीजेच्या
तुला गं हार्दिक शुभेच्छा
भिडू दे ताई
नाव तूझं या गगनाला...
bhaubeej-marathi-greeting.jpg
-RDH (Rajesh D. Hajare)
-आमगाव
-15th Nov.2012 (भाऊबीज)

No comments:

Post a Comment