Sunday 17 March 2013

कायद्यात 'सुधारणा' कि समस्यांना आमंत्रण !!!

45th BLOG POST ==>>

नुकतीच 13-14 मार्च 2013 रोजी फौजदारी कायदा सुधारणा विधेयक 2013 ला केँद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. या विधेयकांतर्गत ब-याच स्वागतार्ह सुधारणा करण्यात आल्या तर काही सुधारणांसंबंधात मिडीया व जनतेतही मतभिन्नता व रोष व्यक्त होऊ लागला. पुर्ववत विधेयकात सुधारणा करण्यामागील हेतु लक्षात घेता हा विरोध यथायोग्यही वाटतो. कारण विधेयकात सुधारणा करण्यामागे उद्देश बलात्कारविरोधी कायदा निर्माण करणे हा होता. बलात्कार/लैँगिक अत्याचार हे देशासमोरील खुप मोठे आव्हान आहे. बलात्कार थांबवण्यासाठी फक्त कायद्यात सुधारणा पुरेशा ठरणार नसून समाजाची विक्रृत मानसिकता बदलणे अगत्याचे ठरलेले आहे.

केँद्र शासनाने वाढते बलात्काराचे गुन्हे कमी करण्यासाठी परस्पर सहमतीने शारिरीक/लैँगिक संबंध (Sex) साठी पुर्ववत 18 हे संमतीवय (Age of consent) 16 असे कमी केले. पण अशाप्रकारे वय कमी केल्यामुळे 'तसल्या' घटना टळणार का? आणि सहमतीने संबंध ठेवण्यासाठी वयोमर्यादा 16 असो कि 18! जिथे सहमती आहे तिथे बलात्कार होईलच कसा? हा खरा प्रश्न आहे. हं यामुळे एक अवश्य होईल; लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतच राहिल्या तरी 16-18 वयोगटातील भावी पिडीत कायद्याने Sex साठी अल्पवयीन राहणार नसल्याने पोलिस स्थानकांमधील 'तितके' गुन्हे कमी नोंदविले जातील! अर्थात दाखल गुन्ह्यांची संख्या कमी होणार असली तरी वास्तविक Rape च्या घटनांची संख्या मात्र वाढतच राहिल . . .

सध्या कायद्याने 18 वर्ष वय होण्यापुर्वी विवाह (मुलांसाठी 21), धुम्रपान, मद्यपान, वयस्क चित्रपट ('A' grade/Adult movies), वाहनचालक परवाना, मतदान करण्यास आणि ब-याच बाबींसाठी मनाई आहे. बालगुन्हेगारांसाठी सुद्धा 18 ची अट आहे. ताज्याच असलेल्या 16 डिसेँबर 2012 रोजी घडलेल्या 'निर्भया'वर झालेल्या अत्याचारातील एक आरोपी 18 वर्षे पुर्ण नसल्याने अल्पवयीन/बारगुन्हेगार म्हणून वेगळ्या कोठडीत आहे. ज्या 'बालकाला' बलात्कार म्हणजे काय ते कळते व परिणाम माहित असून देखील वयस्क गुन्हेगारांहून अधिक छळ करता येतो शिवाय दिल्लीच्या चालत्या बस मध्ये एका निष्पाप तरूणीवर अमानुष अत्याचार करून तो बलात्कार करतो; तो आरोपी अल्पवयीनच कसा होऊ शकतो हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पिडित तरूणी 'ते' 13 दिवस मृत्यूशी झूंज देत 29 डिसेँबर 2012 रोजी अखेर हरली. पण त्या माऊली जाता-जाता संपूर्ण भारतभर जागृतीची चेतना निर्माण करून गेली. आणि आज तिला यमसदनी धाडणारा तिचा अत्याचारी आरोपी अल्पवयीद म्हणून स्वतंत्र (कोठडीत) आहे. त्याला वयस्क घोषित करून इतर आरोपींसम वागणूक देण्याचे शहाणपण शासनाला सुचत नाही. याऐवजी बालगुन्हेगारांचे वय कमी केले असते अथवा शक्य झाल्यास मतदानासाठीची वयोमर्यादा शिथील केली असती तर कदाचित जनतेरास इतका भ्रमनिरास झाला नसता . . . !

हो! माझा मानस इथे शासनाच्या निर्णयाचा वा विचारांचा विरोध करण्याचा मुळीच नसून शासनाच्या भुमिकेचा मी आदरच करतो. शासनाने सहमतीने संभोगासाठी शिथिल केलेल्या 16 या वयाचा मी तर पुर्वीपासून समर्थनच करतो... आता आपणास वाटेल कि मी दुटप्पी भूमिका घेतोय पण नाही. मी यापूर्वीच 10 (योगायोगाने 'Day of the Girl' लाच) व 11 ऑक्टोबर 2012 रोजी Tweet करून हे व्यक्तही केलं होतं. आता वाचकांचा रोष माझ्यावर व्यक्त होईल मी जाणतो. तरी मला आपलं मत मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे व आज मी माझी भुमिका/मत स्पष्ट करणार आहे . . .

g-stanley-hall.jpg

मी जरी या विषयातील तज्ज्ञ नसलो तरी आजवरच्या माझ्या निरीक्षण व अध्ययनानुसार 12 ते 16 (पुर्व) व 16 ते 21 (उत्तर) कुमारावस्थेचा काळ आहे. यातील पुर्व कुमारावस्थेचा 12 ते 16 हा 4 वर्षाँचा काळ फार महत्त्वाचा आहे.

कुमारावस्था (ADOLESCENCE) = वाढणे, वयात येणे.
प्रसिद्ध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ GRANVILLE STANLEY HALL च्या मते "Adolescence is rebirth." ("कुमारावस्थेत मुला-मुलीँचा नवा जन्म होतो.")किशोरावस्थेच्या 12 ते 14 वर्ष या वयातच मुला-मुला-मुलीँचा मेँदू 85% विकसित झाल्यानंतर कुमारावस्थेत मुला-मुलीँमध्ये शारिरीक, लैँगिक व अंत:स्त्राव ग्रंथीत बदल होऊ लागतात. यौवनारंभ होऊन मुलीँमध्ये वयाच्या 12व्या वर्षापासूनच प्रजननक्षमता विकसित झालेली असते. खरेतर मुले 14-16 तर मुली 12-14 या वयात 'वयात येतात'. कुमारावस्थेमध्ये मुला-मुलीँना परलिँगी आकर्षण होतं. शारिरीक, लैँगिक बदलांमुळे कामवासनेची (Sex) जाणीव होऊन मन अस्थिर (चंचल) होतं, नैराश्य येते आणि मग लैँगिक भूकेच्या शोधात मुले-मुली (विशेषत: मुले) क्षणिक सुखासाठी वाईट मार्गाला लागून विकृत कृत्य करू लागतात.

[FIRST PAGE |NEXT PAGE|THIRD PAGE|LAST PAGE]

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com