Sunday 17 March 2013

कायद्यात 'सुधारणा' कि समस्यांना आमंत्रण !!!

[FIRST/PREVIOUS PAGE|SECOND PAGE]

कुमारावस्थेच्या काळाला 'मानसिक वादळाचा काळ' किँवा 'भावणिक ताणतणावाचा काळ' (Period of Storm and Stress) असे म्हणतात. या वयात सुसंस्कृत सवयी लागल्या तर आयुष्य सुकर बनते अन्यथा विकृत मार्गाला गेल्यास बालक व्यसनाधीन बनतो, मग धुम्रपान, मद्यपान, लैँगिक कामवासनेची (Sex) भुक शमविण्याकरिता क्षणिक सुखासाठी हस्तमैथून व समलिँगी संभोगासारखे अनैसर्गिक प्रकारदेखील ..! आणि मग वेश्यागमन व शेवटी जेव्हा विकृत मानसिकतेचा कळस गाठला जातो तेव्हा बलात्कार! असा हा कुमारावस्थेचा वाईट प्रवासही होतो...

आता ज्यांना असे वाटते कि 16 हे वय लैँगिक संबंधांसाठी अपरिपक्व आहे त्यांना वरील मानसशास्त्रीय मुद्द्यावरून सत्यता लक्षात आली असेल कि ख-या अर्थाने लैँगिक जाणिवा याच वयात सुरू होतात. या अवस्थेतील मुलांचा विचार करता त्यांची अवस्था असते -- "I know what I do not want, but I don't know what I want." त्यांना काय नकोय ते माहित असते मात्र काय हवय यापासून ते अजाण असतात. त्यांना मोठ्यांचा (विशेषत: आई-वडील/पालकांचा) मानसिक आधार हवा असतो. Sex संबंधात बरेच समज-गैरसमज आजच्या समाजात आरूढ आहेत. योग्य वयात संभोग निसर्गनियम असला तरी या गोष्टीकडे समाजाची तुच्छ दृष्टी असते आणि त्याच समाजातील लोकांना एकांतात अश्लील चित्रफिती पाहण्यासारखे प्रकरण चालतात हे का याचे उत्तर मला तरी आजवर कळले नाही वा मी असे प्रकरण कधी केले नाही.

सदर विधेयकाल मंजूर झाल्यापासून जनतेचे बरेच प्रश्न समोर येऊ लागलेत. या फौजदारी कायदा सुधारणा विधेयक 2013 मध्ये बरेच स्वागतार्ह निर्णय आहेत. सहसा दुर्लक्षित केले जाणारे महिलांची छेड, पाठलाग, अश्लील हावभाव यासारखे गुन्हे शिक्षेस पात्र झाले आहेत, बलात्कार, अॅसिड हल्ला, मारहाण, इतर अत्याचाराची शिक्षा वाढवण्यात आलीय व बलात्काराच्या आरोपीस जन्मठेप तसेच बलात्कार पिडीत दगावल्यास वा मरणयातना सोशत असल्यास फाशीचीही तरतूद विधेयकात आहे ही बाब निर्विवाद स्विकारार्ह आहे. पण यामुळे 'असले' गुन्हे थांबतील काय? खरच वरील शिक्षेची अंमलबजावणी होईल का? व अंमलबजावणीस किती विलंब लागेल हा शासन व भारताच्या विश्वासू न्यायव्यवस्थेसाठी खरा प्रश्न आहे. आज हत्येच्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असली तरी किती आरोपींना फाशीची शिक्षा होते व कितीँना फाशी होते? म्हणून हा प्रश्न मनात येतोय . . .

एकीकडे सदर विधेयक स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटत असताना पुरूषांविरोधात महिलांमार्फत या विधेयकाचा दुरूपयोग तर होत नाही ना! हे ही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा असं होऊ नये कि महिलांची सुरक्षितता लक्षात घेता निर्दोष पुरुषांवर अत्याचार होवो!

चला आता शासनाने इतर देशांच्या धरतीवर भारतातही शारिरीक/लैंगिग संबंधासाठी संमतीवय (Age of Consent) 18 वरून 16 केलेले आहे. होय...! हे वय जापानमध्ये 13, चीन, बांग्लादेश, जर्मनी, इटली, अर्जेँटीना 14, फ्रान्समध्ये 15, इंग्लंड, श्रीलंका, अमेरीका, मलेशिया, रशिया आणि आता भारतात 16 असून इंडोनेशियामध्ये पुरूषांसाठी 19 व महिलांसाठी 16 आहे तर पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराण या भारताशेजारील देशांत लग्नाआधि (निकाहपूर्वी) Sex अवैध असल्याने कायद्याने मान्यता नाही. वरील देशांचा विचार करता आपल्या लक्षात येईल कि चीनचा अपवाद वगळता अन्य देशांचा जननदर कमी असून लोकसंख्याही कमीच आहे, त्याउलट वाढती लोकसंख्या हे भारतापुढील आणखी एक आव्हाणच आहे.

consent-europe.gif

एक गोष्ट निर्विवाद आहे कि कायद्याने शारिरीक संबंधांसाठी 16 चे वय ठेवल्याने कुप्रवृत्तीचे पुरूष अधिक धाडसी होतील; पुर्वीचेच 18 वर्षाँखालील मुलीँवरील लैँगिक अत्याचारांची संख्या काही कमी नाही व आता तर 16 वर्षीय मुलीँवरील अत्याचारात कायद्याची भिती अत्यल्प राहणार असल्याने गुन्हे नोंदवले जरी कमी जाणार असले तरी या संख्येत मात्र वाढच होईल...!

शिवाय अजून एक बाब लक्षात घ्यावी लागेल कि भारतात (अवैध) गर्भपात हा कायद्याने गुन्हा आहे. 16 वर्षाँपासूनच्या तरुणीँवर संमतीने शारिरीक संबंध ठेवल्यास निर्विवाद त्या विवाहापुर्वी गर्भवती होतील, नंतर बदनामी, समाजाचा तिरस्कार हे सर्व आलच कि... भविष्यात त्या दोघात लग्न होईलही कि नाही काय माहित? अशा परिस्थितीत भारतात सरकार काय अविवाहितांसाठी गर्भपात कायद्याने वैध ठरवणार आहे का? आणि जर हो तर भ्रुणहत्याविरोधी मोहिमेचे काय? संगनमतीने स्वत:ची आणि शारिरीक भूक शमविण्यासाठी खेळलेल्या खेळातून निर्माण झालेल्या फुलाच्या कळीहूनही कोवळ्या 'त्या' भ्रूणाची काय चूक? जर गर्भपाताच्या कायद्यात बदल झाला नाही तर 'ती' कुमारी माता स्वाभिमानाने जगू शकेल काय? जर तीनेच लोकलज्जेला घाबरून आत्महत्या करून मरण पत्करले तर त्याला दोषी कोण??? या प्रश्नांचीही उत्तरे शासनाने जनतेला द्यायला हवीत...

[NEXT PAGE|LAST PAGE]

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com