Pages

Monday, 4 November 2013

'मानवता' - सर्वात मोठा धर्म

हाच लेख सुरुवातीपासून वाचा

मी एवढेच सांगू ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे माझा उद्देश कोणत्याही धर्म वा धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा मुळीच नाही.. तरी कुणाच्या धार्मिक भावनांना ठेस पोहचत असेल तर मी नम्रपणे आपली क्षमा मागतो.. हा लेख लिहिण्यामागे हेतु एवढाच आहे कि जे कोणी धर्मप्रेमी स्वधर्माचा प्रचार करत असताना जाणून बूजून इतर धर्माँचा कमीपणा दाखवत त्या धर्मातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य करतात ईश्वर/अल्लाह त्यांना सद्बुद्धी देवो आणि त्यांचे 'तसले' कृत्य बंद होवोत... हा लेख वाचून एक जरी परधर्माचा कमीपणा लेखणारा व्यक्ती त्याधर्माचा सन्मान करु लागला तरी मी माझा हा इवलासा प्रयत्न सार्थक समजेन..

1377546_428661487234015_386813939_n.jpg

मानवता

मी मानतो इमान ला
मी जाणतो इंसान ला
...
सर्वात पहला धर्म एकच
मानवता हे नाव त्याचं
हिँदू-मुस्लिम-शीख-ईसाई
बौद्ध जैन पारशी ही
का वाटता हो ईश्वराला?
...
एक होती ती धरती माता
भेद कधी ना केला होता
भारत-पाक-ईरान येथे
बंधुभावाने राहत होते
का वाटले हो पृथ्वीला?
...
मुस्लिम ताई मंदिरी ये ना
मी ही पाहिन मक्का-मदिना
'ईश्वर' म्हणा वा म्हणा 'अल्लाही'
तुम्ही वाचा 'भगवद्गीताई'
'आरडीएच' वाचतो 'कुरआन'ला
...
'रमजान' मध्ये 'राम' येतो
'दिवाळी'त 'अली' येतो रे
हिँदु-मुस्लिम-शीख-ईसाई
खरं सांगतो सर्व भ्राता रे
वाटू नका बस् मानवाला...


कवी- राजेश डी. हजारे ( RDH Sir)

कामठा रोड आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया- 441902
भ्रमणध्वनी क्र.- 07588887401
('गोँदिया जिल्हाध्यक्ष-अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे')

No comments:

Post a Comment