Monday 4 November 2013

'मानवता'-सर्वात मोठा धर्म

अनुदिनी 79 वी

दिवस 407 वा

मी खुप दिवसापासून बघतोय. फेसबूक सारख्या सोशल नेटवर्किँग वेबसाईट्स वर काही लोकांनी कोणत्याही एका धर्माच्या नावाने फेसबूक पेज किँवा प्रोफाईल बनवले आहेत आणि इतर धर्मांविषयी खोटेनाटे निराधार आरोप करणारे वक्तव्य आणि चित्रे अपलोड करून मित्रांना टॅग करतात. अशा कित्येक फेसबूक फोटो मलाही टॅग करण्यात आल्यात ज्यावर विचार केल्यानंतर मी काही लिहू व अशा नाटकी लोकांना विचारुही ईच्छितो.

आतापर्यँत असे जितकेही चित्रे मला फेसबूक वर पाठवण्यात आली त्यात फक्त 'ईस्लाम' ला लक्ष्य केले गेले आणि असे लज्जास्पद कृत्य करणारे माझे हिँदु भाऊ-बहिणीच आहेत हे कळल्यावर मलाच कसेतरी वाटते. हिँदू धर्माच्या पवित्र नावाने पेज तयार करुन ईस्लाम किँवा अन्य कोणत्याही एका धर्माला लक्ष्य करत त्यांच्या विषयी हे ना ते अनेक बिनबुडाचे आरोप व खोटेपणा समोर आणू पाहणारे आणि स्वत:ला 'स्वाभिमानी हिँदू' असे स्वघोषित बिरुद लावून घेणाऱ्या किँवा एका धर्माच्या नावाने अन्य धर्माँच्या तत्त्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या हिँदू धर्मीयांपैकी निवडक ढोँगी लोकांना मी काही विचारु ईच्छितो...

  • विश्वात काय फक्त दोनच धर्म आहेत?
  • काय फक्त 'ईस्लाम' च वाईट/खोटा/असत्यावर आधारित है?
  • काय फक्त 'ईस्लाम' च्याच तत्त्वात त्रूटी आहेत?
  • काय 'हिँदू' धर्मात कोणताच वाईटपणा/त्रूटी नाही?
  • काय फक्त अशा फोटो अपलोड करणाऱ्या व इतरांना टॅग करणाऱ्या फेसबूक पेजेसच्या संचालकांनाच हिँदू धर्माप्रती आदर व प्रेम आहे?
  • काय फक्त हिँदुंनाच स्वाभिमान आहे?
  • कोणी हिँदु धर्माविषयी 'तशी' पोस्ट अपलोड केल्यास काय माझे हिँदू भाऊ सहन करतील?
  • काय 'मुस्लिम' बंधू-भगिणीँना कसलाच स्वाभिमान नाही?
  • जर आपण आपल्या धर्मावर 'ईतका' प्रेम करतो तर बाकी धर्मीयांना आपल्या धर्माविषयी प्रेम/स्वाभिमान नसेल?

मी ही एक हिँदूच आहे. आम्ही पण आपल्या धर्मावर प्रेम करतो, आम्हालाही हिँदू असल्याचा स्वाभिमान आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की तो दाखवण्या व व्यक्त करण्यासाठी इतर धर्मातील कमीपणा शोधून तो पसरवत त्या धर्माला बदनाम करत फिरावं. कारण मी जाणतो की आमच्यासारखाच अन्य सर्व धर्मांनाही स्वाभीमान आहे. आणि जेव्हा आम्ही स्वधर्माविषयी इतर धर्मियांकडून आदर-सन्मान अपेक्षित करतो तर त्यांच्या धर्माँचा सन्मान करणेही आपले कर्तव्य ठरते. आणि स्वत:ला अस्सल हिँदू म्हणवून घेणाऱ्यांना तर हे ही ज्ञात असायला हवं की इतर धर्मांचा सन्मान करण्यातच खरी शालीनता आहे.

मी असं मुळीच म्हणत नाही की या प्रकारचे पेजेस बनवू नका! कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी हे अवश्य करायला पाहीजे! यासाठी भारतीय राज्यघटनेच्या Section 25-28 : Fundamental Right of Religion's Freedom मध्ये सर्व भारतीयांना धर्मस्वातंत्र्याचा (आवडीचा धर्म स्विकार,पालन व प्रचार करण्याचा) मुलभूत अधिकार दिला गेला आहे. म्हणून फेसबूक, ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किँग/मायक्रोब्लॉगिँग संकेतस्थळांच्यामाध्यमाने अवश्य आपल्या धर्माचा प्रचार करायला हवा; पण आपणास हे ही लक्षात ठेवायला हवं कि ज्या संविधानाने आपणास हा धर्मस्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिला त्यातच Section 15 नुसार धर्माविषयी भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे आणि 'भारतीय दंड संहिता कलम 295-298' (Indian Penal Code Act 295-298) नुसार कोणत्याही माध्यमाने कोणत्याही धर्माचा अपमान वा धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे कार्य केल्यास त्याला दखलपात्र गंभीर गुन्हा स्विकारत 1 वर्ष कैद किँवा/आणि दंड होऊ शकतो.

वाचक मित्रांनो! होऊ शकतं... कित्येक लोक माझ्या या लेख शी सहमत होणार नाही किँवा मी हिँदू असून ईस्लाम चे समर्थन केल्याने माझ्या मताचा विरोध करतील. त्यांना मी एवढच सांगू ईच्छितो की मी ईस्लाम चेच नव्हे तर विश्वातील सर्वात पहिला धर्म 'मानवता' ची बाजू घेतोय... कारण मी माणतो की...

"सर्व धर्म समान आहेत. निसर्गात तर एकच धर्म आहे तो म्हणजे 'मानवता/ईँसानियत (Humanity)'! पण या धर्माचा याच मानवानं 'हिँदू, मुस्लिम, शिख, ईसाई, बौद्ध, जैन, पारसी' असा बटवारा केला व एकाच ईश्वराला 'भगवान, अल्लाह, ईसा (येशु ख्रिस्त)' असा वाटून निसर्गनिर्मित एका धरतीचा 'भारत, पाक, ईरान' एका धर्मग्रंथाचे 'रामायण, महाभारत, कुरआन' तर एका धर्मस्थळाचे 'मंदिर, मस्जिद, गुरूद्वारा' असा वर्गीकरण केला आहे." पण सर्वांचं रक्त एक आहे, शरीराची रचना एक आहे. मी विचारतो "जर त्या निसर्गानं भेद केला नाही तर मानवाला कूणी अधिकार दिला असा भेदभाव करण्याचा?"

मी तर मानतो की खरंतर 'हिँदू''मुस्लिम' धर्म एकच आहेत म्हणायलाही हरकत नसावी कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की "मुस्लिम धर्मीयांच्या RAMzan-Eid या महत्त्वाच्या सणाची सुरुवात हिँदू धर्मीय प्रभू श्री RAM (राम) नावाने तर हिँदू धर्मीयांचा diwALI या सर्वात मोठ्या सणाचा शेवट मुस्लिम प्रेषित ALI (अली) च्या नावाने होतो. अर्थात रामाशिवाय 'रमजान ईद' व अली शिवाय 'दिवाली' हे सण सुद्धा अपूर्ण आहेत तर हिँदू शिवाय मुस्लिम व मुस्लिमांशिवाय हिँदू यांची कल्पना तरी कशी शक्य आहे..."

हाच लेख पुढे वाचा . . .

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com