Blog Post--> 81st
Day--> 415th
Reader's Blog--> 04th
Sagar's Blog--> 01st

"नॉट रिचेबल"
वासनांनी भरलेल्या
‘डिजिटल’ कॅमेऱ्याच्या भितीने
बदलून घेतलाय तिने
स्वत:चा ‘वॉलपेपर’
अन्
गुणगुणती ‘रिंगटोन’
बदलून बसलीय
‘व्हाईब्रेट मोड’वर...
.तिला जायचंय
नेटवर्क नसलेल्या ठिकाणी..
‘कनेक्टेड पिपल्स’ च्या जगातून
व्हायचंय
‘नॉट रिचेबल’..
.तिनं झाकून घेतलंय स्वत:ला
एका ‘क्रिस्टल कव्हर’ मध्ये,
‘स्क्रिन टच’च्या बचावापासून
अन् मनाला घातलाय
बहुआयामी ‘पासवर्ड’
सावधानतेचा...
.स्वत:वर ओढलंय
एकलेपणाचं ‘स्क्रिन सेव्हर’...
ती फक्त आतल्या आत
स्वत:ला ‘डायल’ करते!
आणि ऐकत असते
‘‘इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है !’’
कवी-- सागर संजय जाधव जोपुळकर
चांदवड, जिल्हा नाशिक
९४०४८०५०६८
स्त्रोत- फेसबुक
No comments:
Post a Comment