Thursday, 30 April 2020

देवा रे देवा (Deva Re Deva - A poem by Piyush T. Gharat)

देवा रे देवा!

देवा रे देवा 
लक्ष द्याल केव्हा?
तुमचा भक्त करतो 
आहे तुमची सेवा 

आम्ही भक्त करतो
तुझ्या मंत्रांचा ध्यान 
आता तरी लाभू द्या 
आम्हा वरदान 

'पियूष' करतो पूजा-पाठ 
वाचतो धर्मग्रंथ 
अवतार घ्या धरतीवरी 
बनूनी या संत 

लाभू द्या भक्तांना 
तुमची छत्रछाया 
जशी पक्ष्यांची माय देते 
पाखरांना माया 

कवी: पियूष टी. घरत  राजेश डी. हजारे (आमगाव जि . गोंदिया)
कवीचा परिचय: 
पियुष ताराचंद घरत हा बालकवी असून अभिनव विद्या मंदिर रोंढा /सालेकसा येथे इयत्ता ७वी मध्ये शिक्षण घेत असताना शाळेतील शिक्षक राजेश डी . हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सदर कविता लिहिली आहे. या कवितेशिवाय मराठी व हिंदी भाषेत अजून निवडक कविता त्याने लिहिलेल्या आहेत. 

दिनांक: १५ नोव्हेंबर २०१९ / २७ एप्रिल २०२० 
प्रथम प्रकाशन: गुरुवार ३० एप्रिल २०२० (पियुष टी . घरत च्या वाढदिवसानिमित्त)

सादरीकरण: अभिनव विद्या मंदिर रोंढा /सालेकसा (टॅलेंट  हंट - द्वितीय विजेता: पियूष टी. घऱत)

© पियूष टी. घरत  राजेश डी. हजारे |  सदर कवितेचे सर्वाधिकार कवींकडे सुरक्षित असून कवी/कवींच्या परवानगीशिवाय, कवी/कवींचे नाव बदलून किंवा निनावी हि कविता सादर, अग्रेषित व/वा प्रकाशित करता येणार नाही; दोन्ही कवींच्या नावासह सदर कविता जशीची तशी अग्रेषित व प्रसारित करण्यास हरकत नाही.  

No comments:

Post a comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com