Thursday 16 May 2013

मांजर आडवी गेल्याने खरंच अपशकून होतो का???

दिवस → 235

अनुदिनी क्रमांक → 53

06 मे 2013 पासून 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक' च्या वार्षिक परिक्षा सुरू झाल्या. 07 मे पासून माझ्या कला शाखेतून पदवीच्या द्वितीय वर्षाच्या (SYBA) परिक्षा सुरू झाल्या... त्याचाच 08 मे रोजी 'आधुनिक जगाचा इतिहास' (HIS221) या विषयाची परिक्षा देण्यास घरच्या 'हिरो होँडा- स्प्लेँडर प्लस' या दुचाकीने निघालो...

किँडगीपार रेल्वेचौकी चवळ असताना अचानक मी जात असलेल्या रस्त्याहूनच एक काळी मांजर आडवी गेली... काळी मांजर आडवी जाते न जाते तोच माझी दुचाकी देखील मांजरीने कापलेल्या रस्त्याच्या पुढे निघून गेली... माझ्या मनात आलं--- माझ्या मागेही भरपूर वाहने होती... काय मी गाडी थांबवून अगोदर त्यांना पूढे जाऊ द्यायला पाहिजे होतं...! खरंतर तितका वेळ कुणाजवळ होता...!! मी आमगावहून जेमतेम 4 ते 5 किमी पुढे होतो व मला अजून 22 ते 23 किमी पुढे गोँदिया येथील एन. एम. डी. महाविद्यालय या अभ्यास व परिक्षाकेँद्रावर परिक्षा देण्यास जाणे होतं... दुपारी अडीच वाजतापासून पेपर होता... परिक्षेची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती... परिक्षेच्या वेळेचा माझ्या मनगटी घड्याळातच काऊंटडाऊन (उलटी गणती) सुरू झालेली होती... आणि माझ्या डोक्यात एक भलताच विचार भ्रमण करू लागला... आणि तो स्वाभाविकही होता... काय हा अपशकून समजायचा? काय आता माझा इतिहासचा पेपर बिघडणार...!!!

अगदी बालवयापासून आपल्या घरातूनच आपल्यावर काही बरे-वाईट संस्कार केलेले असतात... आणि त्यातलंच एक म्हणजे--> जर आपल्या रस्त्याने मांजर आडवी गेली तर तिथेच थांबून आधी दुस-या कुणालातरी तिथून पुढे जाऊ द्यायचं आणि मगच स्वत: त्या रस्त्याने जायचं... पण का? तर अपशकून होतं... आणि मग आपल्याआधी कुणी गेलं तर त्याला?? त्याला काही नाही होत कारण त्याने मांजरीला पाहिलेलं नसतं... आणि या मांजरीला रस्ता ओलांडताना तर मीच चक्क पाहिलेल्या होतं... किँबहुना सर्वात पुढे मी असल्याने तीने माझाच रस्ता ओलांडला होता... मग हा अपशकून समजायचा का???

तर पहिली गोष्ट मी तर असल्या समजूतीँना मानतच नाही व अंधश्रद्धांवर विश्वासही ठेवत नाही... पण मला इथे एक गोष्ट नमूद करणे अगत्याचे वाटते कि मी नास्तिक नाही तर मी आस्तिक आहे... पण मी जरी हिँदू धर्मात जन्मल्याने व हिँदू धर्मीय अस्ल्याने माझ्या हिँदू धर्माबद्दल आदर असला तरी या धर्मातील असल्या अंधश्रद्धांना थारा देणा-या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही... आणि माझ्या मते तरी असल्या गैरसमजूती फक्त हिँदू धर्मातच असाव्यात... दुसरी गोष्ट म्हणजे मी सर्वधर्मसमभाव तत्त्वाचा असल्याने व ईस्लामने अधिक प्रभावित असल्याने स्वधर्माइतकाच आदर अन्य सर्व धर्म व विशेषत: ईस्लामचा आहे... असो मला ईथे कोणत्या नवीन वादाला जन्म घालायचा नसून माझे मत मांडायचे आहे... असाही ट्विट्टर या सामाजिक संकेतस्थळावरील एका देशभक्त व धर्मभक्त तरूणीला माझे अंधश्रद्धेवरील व विशेषत: हिँदू धर्मातील अंधश्रद्धेवरील विचार व सत्यता पटवून देण्यासाठी भविष्यात एक स्वतंत्र अनुदिनी (Blog) लिहिण्याचे नियोजन आहेच... आणि त्यादिवशी मांजर आडवी गेल्यामुळे या अनुदिनीच्या लेखनप्रपंचाद्वारे समजा ही त्याचीच सुरूवात...!

तरी काही ना काही प्रमाणात बालवयातच ठसलेल्या असल्या काही गैरसमजूतीँचा थोडाफार का होईना पण प्रभाव माझ्या मस्तिष्कावरही होताच... पण मग या मांजरीचा विचार सोडून जे होईल ते पाहू असा विचार करून हा किस्साच विसरलो... आणि एकदाचा माझा इतिहास चा पेपर सुरू झाला...

मांजर आडवी गेल्याचा पहिला दुष्परिणाम तर पेपर सुरू होताच जाणवला तो म्हणजे वर्गातील पर्यवेक्षक कडक होते... पण हा अपशकून तर अभ्यास करून 'न' आलेल्यांसाठी होता... मी अभ्यास करून गेलेला असल्याने ती तर माझ्यासाठी आनंदाचीच बाब होती... आता अजून कुण्या अभ्यास करून न आलेल्या परिक्षार्थ्याचा पण रस्ता एखाद्या काळ्या मांजरीने ओलांडला म्हणायचा का? पेपर सुरू होण्यापूर्वीही माझ्या दृष्टीने एक चांगलीच बाब घडली.. माझे मागील बाकावर आसन क्रमांक असलेली पहिल्या पेपरला अनुपस्थित विद्यार्थिनी या पेपरला उपस्थित होती... आता आपल्या माहितीसाठी सांगु ईच्छितो कि त्या दिवशीचा इतिहास चा दुसरा पेपर बिघडण्याऐवजी उलटा उत्तमच गेला... शिवाय पेपर संपल्यानंतर गोंदियाहून आमगावला परत येताना देखील कोणतीच अनपेक्षित घटना घडली नाही... आणि घडली असती तरी तिचा संबंध त्या मांजरीच्या रस्ता ओलांडण्याशी लावता आला नसता...

आता मला एकच गोष्ट विचाराविसी वाटते कि-- शुभकार्यास जात असताना कुणाची प्रेतयात्रा मिळाल्यास अथवा मांजर आडवी गेल्यास अशुभ मानलं जातं... मांजर रस्ता ओलांडणार नाही तर कशाने जाणार..? आणि शहरांमध्ये पाळलेली व खेड्यांमध्ये राहणारी मांजर घरातील सदस्यांपुढून कित्येक वेळा जाते तर अपशकून होत नाही. किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीकडून जाणा-या रस्त्याने प्रवास केल्यास प्रेतयात्रा वा अंत्यसंस्कार दिसणार नाही तर ते कुठे जाणार?? मग सत्कर्मी जाताना मांजर आडवी गेल्यास वा प्रेतयात्रा दिसल्यास अपशकून होणं कसं काय शक्य आहे? आणि जर एखादी अनुचित घडना घडलीच तर त्याचा एकच अर्थ म्हणजे तो केवळ एक योगायोग आहे... कारण यावरून एकच गोष्ट निष्पन्न होते ती म्हणजे मांजर व प्रेतयात्रेमुळे अपशकून होत नसून हा केवळ मानवाच्या मन व मस्तिष्कात बालपणापासून भरण्यात आलेला भ्रम व यावर विश्वास म्हणजे केवळ अंधश्रद्धा आहे ...!!!

rdh.jpg

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com