Thursday 31 October 2013

मृतात्म्यास पत्र

दिवस ==> 403 वा

अनुदिनी ==> 77 वी

सदर पत्र 'झाडीबोली'त पाठवत आहे...

मृतात्म्यास पत्र

Image Source: India Today
प्रतिमा स्त्रोत: India Today

स्वर्गीय मेल्या माणसाच्या आत्म्यास,
तो 29 सप्टेँबर चा दिवस होता.. मी बाजंवर झोपला होतू.. सकारी सकारी माज्या आईना उटवलन.. जवरपास आठक वाजले असतील.. हव तुमी बराबर वाचून रायल्या.. मी एवढ्यावरच उटता कदी कदी.. झोपता बी जरा लेटच.. मोटी दाळ आदत आहे माले पर का करता? तं जाऊ द्या.. मले सांगतलन का आमगावमंदी कोणाचा तरी खून झाला.. माझे बाबूजी त्या जागेवर जाऊन वापस आल्ते.. भल्तीच गर्दी होती तं त्यायले पावाले नायी भेटला खरा..! मंग मी निँग्लू चड्ड्यावरच.. तुले पावाले.. कोण असल? कसा असल? कायले मारला असतील? कोणा मारला असतील? मनात लगीस्से परस्न येत होते.. आखीरकार पोचलूच त्या जागेवर... आमच्या घरापासना ज्यादा दूर नवता.. तू त्या नवीन बनत्या घरातच अंदर निपचित पडला अससील.. असे तं तू जिता अससील तई कोनी नसल विचारलंन तूले पर तूह्या मेल्यावर खासकरून तूजा मडर झाल्ता मून स्यानी सप्पायसाठी तूजी डेटबॉडी मनजे मोट्या हिरोसारकीच झाली होती.. गर्दीच गर्दी लोकायची.. पोरायपासून तं बूळग्यायवरी ना रिकामडेँ**यपासून(शिवी) तं आफीसरायवरी सप्पायसाटी तुजा मेला थोबडा मंजे जसा का हिरोच होता.. अंदर पोलिस पंचनामा करत होते तं तूले पावासाठी लोकायले घरात एंट्री नवती.. पर सप्पा बिजी मानसा त्यादिवसी कामधंदा सोडून (तसाई इतवारच होता) निस्ता तूले पावासाटी नव दा वाजेवरी भर तपनीत तेतीच उभे होते ना गा.. मले तं असे ढुंढून जे भेटत नवते ते भेटले त्या दिवसी.. भरमार दूरदूरुन आले होते निस्ता तूले पावासाटी...

मंग आखिरकार तूले बाहेर आणला.. आमी तं तसा तूले पायलून नवतून पर जे लोकं सकारी सकारी पायटलेच जातत ना (अगा डब्बे धरुन नायी गा...!) फिरावले का मनतत त्याले मार्निँग वाक का फार्निँग वाक तं त्यायच्यातल्या एकाले तूजे पाय दिसले होते खरा..! मंग पोलिसायले बोलवला असतील.. मनजे माले तं लागते सनवारच्या रातीच झाला असल तूजा काम तमाम है ना गा? तं पोलिसायना पोते हातरला जमिनीवर अना लोकायले मेन पोलिसाना सांगतलंन (माफ करा भाषेमुळे मान देऊ शकत नाही) "तर बघा तूम्हाला आतापर्यँत इथे थांबवून ठेवण्याचा इंटेन्शन एवढाच आहे कि जर तुमच्यातील कोणी याला ओळखत असेल कि हा कोण आहे, कूठला आहे तर सांगावं व याची ओळख पटावी... तर तुम्ही एक-एक करुन पुढे या, पहा व समोर निघत चला..." त्याच्यापयलेच आमाले फोटोग्राफर ना क्यामेऱ्यात तूही फोटू दाखवलन होतन.. तेबी अलग-अलग पोज मंदली.. तूना बी खिचला नससील तस्या पोज जिता अससील तई..! तरी आमी तूले ससारचा (खरोखर) पावासाटी थांबलेच होतून.. मंग आमी पायलून तूले.. नड्ड्यावर (गळा), पाटीवर ना पोटावर चाकूचे घाव होते, तोँड उघडा होता.. मोठा भयानक दिसत होतास पर आमाले भेव नायी लागला.. मंग कोणातरी ओरखलन ना तूजा असली सरनेम सांगतलन तो मी नाई लिवा या पतरात अना गाव सांगतलन.. अखीन एका मानसाना पुस्टी केलन (पेपर वाचता मून मी बी नक्कल मारुन रायलू पेपरावानी.. ) तं पुस्टी बी नायी समजे; पुस्टी मनजे तो तुच व्हस मून कनफरम गा.. मंग आमी घरी आलून.. त्याच्या बादमंदी पोलिसायना तूजा पोस्टमार्टम केला असतील नायी का..? अना मंग तूले तूया घरी नेऊन सोडला असतील..

तू तं मेलास.. आगीत भस्सम बी झाला अससील.. आमीना तूले पायलून तरी चूपच.. पर आजूबाजूच्या बाया.. ज्या आल्या नायी, गेल्या नायी, पायला नायी तरी त्यायचा चालू-- "कोणा कूत्र्यायना मारला असतील बाई... मानसं नसतील ते... जनावर असतील (हा तं खरी मनला).." पर तू जेती भेटलास तो घर बनतच होता.. वास्तूपूजन बी होवालेच होता ना रावाले बी जावाचेच होते तं या का मनत सांगू-- "कसे रायतील बाई ते.. भेव नायी लागल का? घर बनावच्या पयलेच मुर्द्यायना अपसकून केला.. आता तो (म्हणजे तू) भूत बनून तेती फिरसील.." मी खरी सांगता तूज्या मेल्यापासून कोणी तेती बिनकामानं नायी जाय रातच्याले.. अना असा सिरीफ तूज्याच नायी.. तं कोणी बी मेला मनजे होते.. आता तू बी येतीच रायत होतास तं तूले बी मालूमच असल मना.. नायी असा नायी.. पर मी मनता- "का झाला?" तू का जाणून बूजून थोडी गेलतास तेती मरावले.. खूदहून तूले मारला त्या घरी दूसऱ्यायना.. तसा तं भूत बीत राये नायी.. काऊनका माजा विस्वासच नसे भूतादैतावर.. पर आता तू वरतं गेलास तं तूले मालूम तूले देवाघरी रावाचे आये का भूत बनावचा आये?
पर हो.. जर भूत झालास गिलास तं एकदम माझ्याजवरच नोको येजो नायतं माले पतरं कायले लिवलास मून.. अना तू झोँबजो तं त्यायले ज्यायनं तूले मारला.. आता मालूम चालला का तू मोटा सिदा सादा होतास खरा.. 

तं मी हा पतरं तूले सांगावसाठी लिवून रायलू का माणूस मेल्यावर त्याचा का होते हा अलग मॅटर आहे पर त्याच्याबाऱ्यात त्याच्या संगचेच आमच्यासारके लोकं का सोचतत.. अना हा मालूम असून का एक दिवस सप्पायले जावाचाच आहे तरी!! तं जाऊ दे तो सब सोड आता.. मी सांगता त्या घराले आता दरवाजा लावला.. तूले एकच इनती हाय का जो झाला तो झाला.. बळा गलत झाला तूज्यासंगा पर जाऊ दे आता त्यायची सजा देव त्याले देयल पर तू आता देवाघरी गेलास तं देव बनून राय.. भूत बीत तं रायेच नायी.. हाच सांगावासाठी डॉ. नरेँद्र दाभोळकर सारखा देवमाणूस थकून केला पर हिँमत नायी हारला तं जनावरायना त्यायच्यासारक्या देवमाणसाले बी तूज्याचसारखा मारला.. तूले मालूमच असल पेपरात वाचला अससील तं.. ते आता तेतीच असतील.. तू त्यायले विचार डॉक्टर तूले माज्यावून चांगला समजवून सांगतील भूत-चुडैल च्या बाऱ्यात का हे निर्री अंदश्रद्दा व्हय मून.. अना हो चूकभूल माफ कर.. जेतीबी अससील सुखी राय..

देव तूज्या आत्म्याले शांती लाभू देवो...!


तुआ मेला चेहरा पायनेवाला एक अनोळखी पोरगा

-राजेश डी. हजारे

(लेखक 'अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे' चे 'गोँदिया जिल्हाध्यक्ष' आहेत.)

आमगाव जि. गोँदिया

लेखन: 20 ऑक्टो. 2013 (रविवार)
शेवटचे अद्ययावत: 19 मे 2019 (रविवार)

  • स्त्रोत:

  1. न लिहिलेली पत्रे-14
  2. न लिहिलेली पत्रे-15
  3. #RDH Sir FB
  4. WhatsApp

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com