Pages

Sunday, 26 August 2018

बंधु प्रेमाची बाग फुलली (Rakhi poem by RDH Sir)

 बंधु प्रेमाची बाग फुलली 
 कवी: राजेश डी. हजारे 'आरडीएच' 

बंधू प्रेमाची बाग फुलली
बागेत झुलताना तहान भूक भुलली ।।धृ.।।

ताई बांधी, रेशमी बंध
भावा बांधी रक्षाबंध
राखीचा घेऊ, या रे गंध
आज प्रेमाची, कळा फुलली ।।१।।

भाऊ बहिणीस, नेसी नऊवारी
बहिण भावाचे, गोड तोंड करी
आज दोघांचा, दिवस भारी
रक्षा बंधात, दोघे झुलली ।।२।।

रेशमी बंध, बांधूनी घ्या रे
मोठ्या मनाने, रक्षा करा रे
आनंदाचा, दिवस हा रे
हास्य फुले ही, उमलली ।।३।।

बंधू प्रेमाची बाग फुलली
बागेत झुलताना तहान भूक भुलली

कवी: © राजेश डी. हजारे 'आरडीएच'
आमगांव जि. गोंदियाभ्र. क्र.: ०७५८८८८७४०१
संकेतस्थळ: www.rdhsir.com
मूळ कविता: २३ ऑगष्ट २०१०, सोमवार
 आपण सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...! 

No comments:

Post a Comment