Monday 24 December 2018

आई म्हणजे... आई... मां (कवी: राजेश डी. हजारे) - RDH Sir's 3 poems on Mother

आज दि. २४ डिसेंबर २०१८ रोजी माझी आई सौ. रुक्मिणी डी. हजारे च्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त मी राजेश डी. हजारे (आरडीएच) द्वारा लिखित कविता:

आई म्हणजे
कवी: राजेश डी. हजारे (आरडीएच)


RDH Sir with mother (Copyright: RDH Sir)



© आई म्हणजे... (राजेश डी. हजारे )
आई म्हणजे ज्ञानज्योती
आयुष्याची पहिली प्रीती

आई म्हणजे पहिला उच्चार
आई म्हणजेच आयुष्याचा सार

आई म्हणजे प्रथम गुरु
आई साक्षात कल्पतरु

आई म्हणजे अंगाई गीत
सप्तस्वरांकीत मधुर संगीत

आई म्हणजे वात्सल्याचा झरा
तप्त उन्हात मंद गार वारा

आई म्हणजे माया
आई शीतल छाया

आई म्हणजे वात्सल्य
आई विश्वाचे मांगल्य

आई म्हणजे 'रुक्मिणी'
'आरडीएच'ची आई म्हणजे 'रुक्मिणी'
प्रकाशमान सौदामिनी

आई म्हणजे कळा आणि वेदना
आई म्हणजे सकल संवेदना

आई म्हणजे दुसरा जन्म
आई म्हणजे आयुष्याचे मर्म

आई म्हणजे अलंकारिक कविता
निरंतर वाहणारी सरिता

आई म्हणजे आत्मा अन् ईश्वर
आईपुढे सर्व काही नश्वर

आई म्हणजे फक्त आई
आईला जगात उपमा नाही

कवी- ©राजेश डी. हजारे (आरडीएच)
('गोँदिया जिल्हाध्यक्ष-अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे')
सादरीकरण: राजेश डी हजारे (आर.डी.एच.) प्रेरणा मित्र परिवार आयोजित
सालेकसा महोत्सव २०१७ च्या कवि संमेलन मध्ये
"आई म्हणजे..." ही स्वरचित कविता सादर करताना...
  • रचना: ०२ एप्रिल २०१७ रविवार, दुपारी १.३० (आमगाव)
  • © सर्वाधिकार सुरक्षित 
  • पूर्वप्रकाशित: ओबीसी साहित्य संमेलन, १ डिसेंबर २०१८, जळगाव (प्रातिनिधिक काव्यसंग्रह ई-पुस्तक )



    आई
    कवी: राजेश डी. हजारे (आरडीएच)

    पहिली ज्ञानज्योती आई
    पहिले प्रेम अन् प्रीती आई

    प्रथम उच्चार आई
    आयुष्याचा सार आई

    पहिली माझी गुरु आई
    साक्षात कल्पतरु आई

    ओव्या अन् अंगाई गीत आई
    सप्तस्वरांकीत संगीत आई

    वात्सल्याचा झरा आई
    मंद गार वारा आई

    प्रांजळ माया आई
    शीतल छाया आई

    आयुष्याचे वात्सल्य आई
    विश्वाचे मांगल्य आई

    'आरडीएच' ची 'रुक्मिणी' आई
    प्रकाशमान सौदामिनी आई

    कळा आणि वेदना आई
    सकल संवेदना आई

    दुसरा जन्म आई
    जीवनाचे मर्म आई

    श्रूंगारिक कविता आई
    वाहणारी सरिता आई

    आत्मा अन् ईश्वर आई
    तुझ्यापुढे सर्व नश्वर आई

    आई म्हणजे फक्त आई
    आईला जगात उपमा नाही
    कवी- ©राजेश डी. हजारे (आरडीएच)

    • सहभाग: शब्दविद्या महाकाव्यस्पर्धा फेरी क्र.: ०३ ('आई' या विषयावर कविता) १३ ऑगष्ट २०१७रचना: ०२ एप्रिल २०१७ रविवार, दुपारी २.२७ (आमगाव)
    • © सर्वाधिकार सुरक्षित 



    मां 
    (कवी- राजेश डी. हजारे ‘आरडीएच’)

    मां तो जग मे मां होती है
    जिसकी कोई ना सीमा होती है
    मां तो जग मे मां होती है

    इन्सान जीवन मे खुशियाँ मनाता
    पर क्यूं एक बात वो भूल जाता
    जीवन मे हर ख़ुशी मां देती है

    मां तो ममता का सागर है
    मां प्यार का समुंदर है
    मां बिन जिंदगी सुनी होती है

    प्यार की तो मुरत है मां
    संसार के सभी तीरथ है मां
    मां तो सच मे देवता होती है
    कवी- ©राजेश डी. हजारे (आरडीएच)

    • सादरीकरण: मां - दमयंतीताई देशमुख अध्यापक विद्यालय, रामटेक (२०१०)
    • रचना: १६ फेब्रूवारी२०१० मंगलवार (रामटेक.)
    • © सर्वाधिकार सुरक्षित 

    संपूर्ण पत्ता: घर क्र. १३८९, श्री कॉलोनी, सरस्वती विद्यालयाच्या मागे, 
    बनगाव (आमगाव) ता. आमगाव जि. गोंदिया- ४४१९०२
    भ्रमणध्वनी क्र.- ७५८८८८७४०१
    विरोप पत्ता (ईमेल): contact@rdhsir.com
    संकेतस्थळ: www.rdhsir.com


    No comments:

    Post a Comment

    Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
    Thank you so much!

    Keep commenting..!

    Don't forget to CHECK in NOTIFY ME.

    Regards,

    Rajesh D. Hajare (RDHSir)
    Founder, BookLysis by RDHSir.com
    www.rdhsir.com