Thursday 17 October 2013

फ.मु.शिँदे यांना अभिनंदनपर पत्र

दिवस→ 389

अनुदिनी/ब्लॉग→76

1382876_426999214066909_28692608_n.jpg1378742_525340920886123_1163613089_n.jpg
सन्माननीय श्री फ.मुं.शिँदे सर,

काल वृत्त वाचण्यात आले कि आपली '87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या' अध्यक्षपदी निवड झाली.. तात्काळ मी हे वृत्त फेसबुक व ट्विटर वर शेअर केलं... सोबतीला आपला छायाचित्र हवा होता म्हणून गुगल वर शोधून पाहिला आपला नाव तेव्हा चित्रांसोबतच विकीपिडीया वर आपल्याबद्दल सविस्तर माहिती दिसली.. तेव्हाच आपणास या निमित्ताने पत्र पाठवण्याचा माणस झाला... सोबतच आपल्या फेसबुक पेजविषयी पण कळलं.. आता तो तुमचाच आहे कि तुमच्या नावाने कोण्या दुसऱ्याच व्यक्तीने बनवून ठेवलाय ते माहित नाही पण कळवा जरुर...

तसं बघितलं तर आपली ओळख मी शाळेत शिकायचो तेव्हापासूनची... म्हणजे हो मला कळतय आपण मला ओळखत नाही.. पण मी आपणास ओळखायला लागलो ते शाळेत असतानापासून.. मला इयत्ता आठवत नाही पण इतकं अवश्य आठवतंय कि आठवी अथवा आठवीपुर्वीच्या मराठी बालभारती च्या पाठ्यक्रमात आम्हाला आपण लिहिलेली प्रसिद्ध 'आई' ही कविता होती... वर्ग आठवत नसल्याने आतापर्यँतच्या (1ली पासून ते अगदी डीटीएड पर्यँत) सर्व मराठी शिक्षकांची नावे आठवत असूनदेखील नेमक्या शिक्षकाचे नाव सांगू शकत नाही.. पण ती कविता शिकवण्यापुर्वी शिक्षकाने सांगितलेला लेखक परिचय व त्यातलेच त्या कवितेचे कवी 'फ.मु.शिँदे' अगदी 'फकीर मुंजाजी शिँदे' या आपल्या पूर्ण नावासह लक्षात आहेत ते आजपर्यँत.. मी शिकलेल्या बऱ्याच कविता विसरल्यात मात्र 'आई' ही कविता आणि तीचे कवी आजही स्मरणात आहेत.. कारण 'आई' हा प्रत्येकासाठी अगदी जवळचा (किँबहुना पहिलाच) शब्द.. आणि आपण काय सोपं व तितकच भावस्पर्शी वर्णन केलं आईचं त्या कवितेत तो ही अगदी साध्या व सोप्या भाषेत..

मी ती कविता शिकत असताना कधी स्वप्नातही विचार वा कल्पना केली नव्हती की मी कधी आपणास पत्र पाठवीन.. या साहित्यिक क्षेत्रात येण्याचं तर कधी स्वप्नातही आलं नव्हतं.. पण योगायोगाने मी या क्षेत्राकडे वळलो तो हि फक्त छंद म्हणून नव्हे तर अगदी 'प्रोफेशन' म्हणून तेसुद्धा तरुण वयात.. मी जाणतो कदाचित या क्षेत्रात पैसा नसेल पण आपल्या लेखनीत ताकत असेल तर एक दिवस तो ही एक दिवस निर्माण होईल याच क्षेत्रातून... आज मी 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' च्या 'गोंदिया जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष' पदावर कार्यरत आहे.. ही हि एक समाजसेवाच आहे... आणि पैसा मिळत नसला तरी या सर्वाँतून मिळणारा मानसिक समाधान खुप मोठा आहे.. मी जाणतो "पैसा खुप काही असला तरी सर्वकाही नाही.." आणि या मानसिक समाधानाची तुलना पैशाची होऊच शकत नाही.. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपणास भेटण्याचा (किँवा प्रत्यक्ष पाहण्याचा) कधी योग येईल.. होय कारण मी पुणे पासून भरपूर लांब (अगदी विरुद्ध टोकावरीलच) गोँदिया जिल्ह्यातील आमगाव या तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असून देखील पुणे जिल्ह्यातील 'सासवड' येथे 3, 4 व 5 जानेवारी 2014 रोजी आयोजित '87 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी' येत आहे.. तसे मी या फक्त 20 वर्षाच्या आयुष्यात बरीच छोटी मोठी साहित्यसंमेलने पार पाडली आहेत, पण इतक्या मोठ्या व विशेषत: इतक्या प्रतिष्ठित व मानाच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्याची ही माझ्यासाठी पहिलीच संधी असेल... मला निमंत्रण पण मिळालेय.. आणि माझ्यासारख्या नवोदित साहित्यिकासाठी स्वाभाविकच ही खुप आनंद व अभिमानास्पद बाब आहे...

असो... आपणाशी बोलण्या व सांगण्यासारखं बरंच काही आहे कारण आपण स्वत:च्या कर्तृत्वाने लेखनीद्वारे व वयानेही खुपच मोठे आहात आणि त्यामुळे आपली किमयाही फारच न्यारी व महतीही खुपच मोठी आहे.. पण पत्राला काही मर्यादा आहेत त्या पाळाव्या लागतील.. आणि आपण आता खुप व्यस्त असाल त्यामुळे पत्र वाचाल कि नाही काय माहिती पण हातात पडल्यास वाचालच ही आशा करतो.. जर पत्र वाचून झाला असेल तर प्रतिक्रीया नक्की द्या पत्राद्वारे... माझा पत्ता व संपर्क क्रमांक माझ्या फेसबुकच्या भिँतीवरुन आपणास मिळूनच जाईल आणि तरीही मी शेवटी नोँदवलाय.. शेवटी साहित्यसंमेलनात आपली प्रत्यक्ष भेट (पाहणे होईलच) 5-10 सेकंदांची का होईना पण त्या व्यस्त कार्यक्रमात भेटही होईल जर अल्लाहची (मी हिँदु आहे) ईच्छा असली तर... काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करावे... आपला आशीर्वाद नेहमी पाठीशी असेल हा विश्वास आहे.. आपली लेखनी तडपत राहो हि सदिच्छा व्यक्त करतो...

आणि या पत्राचा समारोप करण्यापुर्वी तुमचीच आई ही कविता (ज्यामुळे मी आपणास ओळखू लागलो) विषय निघालाच आहे तर ती इथे नमूद करतोय..

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं
गाव असतं !
...
आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा...
...
घर उजळतं तेव्हा
तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की
सैरावैरा धावायला
कमी पडतं रान !
...
अरे ! आणि आपणास शुभेच्छा द्यायच्या राहूनच गेल्या कि... 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन ..!
आपलाच चाहता
एक नवोदित साहित्यिक
rdhautographmar.jpg
राजेश डी. हजारे (RDH)
भ्रमणध्वनी क्र.- 07588887401
पत्ता-कामठा रोड आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया- 441902
~(गोँदिया जिल्हाध्यक्ष- अ.भा. मराठी साहित्य परिषद, पुणे)

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com