Saturday 12 October 2013

आसुमल हरपलानी ते 'संत' (न)आसाराम

BlogPost==> 73rd

Day==> 384

अप्रिय आसाराम...
मी माफीही मागत नाही कि मी तुम्हाला प्रिय प.पु. संत श्री बापू असं म्हटलं नाही.. कारण मी मानतच नाही.. तसं मी यापूर्वीही तुमचा कोणी मोठा भक्त वा समर्थक नव्हतो व आता तर प्रश्नच नाही... कारण जे बहूसंख्य होते ते आता तर थोडेफार राहिले असतील.. व त्यातलेही काही पश्चात्तापच करत असतील..!

पण मी एक खरं सांगू.. ज्यादिवशी तुमच्यावर पहिल्यांदा 'बलात्काराचा' आरोप लावला गेला व जेव्हा प्रसारमाध्यमे (मिडीया) तुम्हाला विनापुरावा पोलिसांच्या चौकशीपुर्वीच धारेवर धरत होती.. त्यांनी तुम्हाला तेव्हाच गुन्हेगार संबोधलं होतं त्यावेळी मीच तुमची बाजू घेत "आसाराम यांची पोलिसांद्वारे चौकशी होऊ द्यावी त्यात गुन्हा सिद्ध झाला तर नंतर मग मिडियाने तुम्हाला गुन्हेगार संबोधावं" असं ट्वीट केलं होतं.. पण ते चूकीचे नव्हते.. जेव्हा तुम्ही पोलिसांसमोर समर्पण करण्याऐवजी इकडे-तिकडे लपत नव-नवे बहाणे बनवत होते ना.. तेव्हाच मलाही पटलं "सच मे जरुर दाल मेँ जरूर कूछ काला हैँ..." आणि नंतर माझंही मत बदललं.. मी स्वत: परत मिडीयाची माफी मागत तेच बरोबर असल्याचं पण नवीन ट्वीटद्वारे कबूल केलं होतं...

आसाराम, तुम्ही स्वत: आश्वासन दिलं होतं कि "सध्या माझे सत्संग सुरु असल्याने 30 तारखेनंतर मी स्वत: समर्पण करून पोलिस चौकशीत मदत करीन.".. पण तुम्ही तर मूदत संपून 2 दिवसांनंतरही इंदौरच्या आश्रमात विश्रांती घेत होतात... मला अचंबा वाटतो की तिथले पोलिस कसे मिडीयाने जोर धरेपर्यँत तूम्हाला अटक करण्यास धजावले नाहीत... शेवटी मानलं तुम्हाला! पण माघार घेणार ते भारतीय पोलिस कसले? डोंबले ना तुरुंगात शेवटी! तुमचा कितीही दबदबा असला तरी...! तुम्ही गुन्हेगार असल्याचं मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा विमानामध्ये तुमचे (विशेषत: महिला) समर्थक 'आजतक' या नॅशनल खाजगी वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी शिव्यागाळ व मारपीठ सारखे असभ्य वर्तन करत होते आणि तुम्ही दुपट्ट्याने तोँड झाकत होतात... म्हणे 'प्रायव्हसी' चा विचार केला.. मी म्हणतो तुम्ही उत्तर द्यायचं होतं ना... प्रायव्हसी च्या कारणाने कारवाई झाली असती ती केली असती विमान कंपनीने संबंधित वाहिनीवर.. त्याची तुम्हाला काय पडली होती एवढी ?

मी तूम्हाला सन्मानाने 'जी' संबोधतोय याचं कारण एवढंच कि तुम्ही वयाने मोठे आहात.. पण तुम्ही तर दिडशे वर्षे जगण्याची ईच्छा ठेवता म्हणे... हे वाईट नाही हो... पण तुम्हाला कोणत्या पुस्तकात कळलं तर कोण जाणे दिर्घायुष्यासाठीच तुम्ही (अर्शकल्प, आणि अजून कोणकोणते मला 'नॉलेज' नाही) शक्तीवर्धक (अंमली पदार्थ सुद्धा!) औषधी सेवन करुन अल्पवयीन मुलीँचे लैँगिक शोषण करत होतात खरं..! कोणी म्हणतं तुम्हाला लहान मुलीँशी वासनाच्छेचा आजार जडलाय काय नाव त्याचं... मी विसरलोच बघा... मग तर मोठमोठाले ऋषीमुनी कित्येक वर्षे जगले त्या सर्वाँनी तीच पुस्तक वाचली होती काय? वा रे मेरे संत!

माझ्या माहितीनूसार तुमचं खरं नाव आसुमल थाउमल हरपलानी उर्फ आसुमल सिरुमलानी.. जन्म 17 एप्रिल 1941 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या तत्कालीनी ब्रिटीश भारतातील नवाबशाह जिल्ह्यातील विरानी गावात मेहनगीबा (आई) व थाऊमल सिरुमलानी (वडील) च्या घरी.. 'थँक्स गॉड' तुमचा जन्म एक दिवस उशीरा झाला नाही अन्यथा माझ्याही मनात एक सल आयुष्यभर राहिली असती की माझा वाढदिवस कुकर्मी आसारामच्या वाढदिवसी येतो.. ईश्वरानं मला सुदैवानं 18 एप्रिल 1992 रोजी 'भारतरत्न' महर्षी धोँडो केशव कर्वे सारख्या समाजसुधारकाच्या वाढदिवसी या पृथ्वीवर पाठवलं.. तुम्ही पंक्चर दुरुस्तीचे काम करत होतात.. तुमचा मालक जवळच एका संताचे प्रवचन ऐकण्यास जायचा.. कधी मधी तुम्ही पण सोबत जायचे.. मग तुमच्या मनात आलं कि-- हा तर मस्त काम आहे.. काही वेळ प्रवचन करायचं.. मान, सन्मान, प्रसिद्धी मिळते.. अन्  दक्षिणेच्या नावाखाली वारेमाप पैसासुद्धा... सोबतच स्त्री-पुरुष, मुले-मुली, भक्त जमतात.. पाया पडतात.. आशीर्वादाच्या बहाण्याने प्रत्येक वयाच्या स्त्री-पुरुषास स्पर्श करता येतो... तुम्हाला काय पाहिजे होतं अजून... मग काय?? सुरु केला तुम्ही आसुमल चे आसाराम असे नामकरण करत स्वत:च स्वत:ला प.पु.संत आसाराम बापु अशा एक ना अनेक पदव्या घोषित करुण प्रवचनगिरीचा व्यवसाय... खरंतर इथंच चुकलं तुमचं... तुम्ही आपला नाव आशाराम वा 'आसाराम' ऐवजी 'नासाराम' ठेवावयास हवं होतं... पण काहीही म्हणा तुम्हाला तरुण मुलींना आशीर्वाद देण्यात जरा जास्तच रस होता नाही का? खरे संत फक्त डोक्यावर हात ठेवून मनापासून आशीर्वाद देतात; पण तुम्हाला समर्पणाच्या नावाखाली स्वतंत्र खोलीत बोलावून तरुणीँच्या बाह्य व आंतरीक अंगाअंगाला स्पर्श करत आशीर्वाद देण्याचे जरा जास्तच कौशल्य होते.. आणि पिडीत तरुणी बिचारी विरोधात 'ब्र' ही उच्चारु शकत नव्हती..


Source: i.ndtvimg.com

कारण बहुसंख्य समर्थक जे होते तुमची बाजु घेण्यासाठी.. सोबतच अशा कार्यातून तुम्हाला वाचवणारे सहकारी देखील... शिवाय तुम्हाला वाटत असावं कदाचित भोळ्या भाबड्या भक्तांच्या आस्थेचे बाजारीकरण करुन कमावलेल्या वारेमाप संपत्तीच्या बळावर व प्राप्त समर्थकांच्या विरोधाच्या बळावर करत राहू तरुण वयातील कोवळ्या मुलीँवर लैँगिक अत्याचार आणि वाचून जाऊ भारताच्या कायद्यापासून... पण ते कदापि शक्य नाही... आणि आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर येताहेत भुतपूर्व पिडीत मुली एकेक करुण पुढे तुमच्या विरोधात खटले दाखल करण्यासाठी...

आता तर तुमच्या विषयी फक्त प्राथमिक माहिती पुढे आलीय.. ये तो अभी ट्रेलर है मेरे आसा.. अब तो पुरी पिक्चर बाकी है... आता जेव्हा मी तुमच्या विरोधात इतर विविध पोलिस ठाण्यात पिडीतांद्वारे एफआयआर नोँद होताना पाहतो व तुमच्या आश्रमातीलच तुमच्याच भुतपूर्व सहयोग्यांचे तुमच्याचविरोधात मते व आश्रमासंबंधी वादग्रस्त प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रतिक्रीया ऐकतो तेव्हा मला वाटतं कि किती भोळे आहेत आमच्या भारतातील भक्त! आणि कसे फसवत होतात तुम्ही भाबड्या भक्तांना... अन् आम्हीही कसं विश्वास ठेवतो तुमच्यासारख्या स्वघोषित संतांवर स्वत:च्या बंद डोळ्यांनी... तुमच्यासारख्या ढोँगी बाबांची सत्यता कळल्यावर मी देवाला प्रार्थनाच करु शकतो की एक दिवस असा न येवो की जे खरंच स्वत:ला संत म्हणून फक्त म्हणवूनच घेत नाही तर वास्तविक वैयक्तिक जीवनात आचरणही करतात संतांसारखाच अशांवरचा विश्वास व श्रद्धेला कलंक लागू न देवो रे बाबा !! अन्यथा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत मीराबाई, संत कबीर, संत गोराकुंभार, संत सैय्यद मोहम्मद ताजुद्दीन बाबा, संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती बाबा, ईश्वरतूल्य संत साईबाबा, संत गजानन महाराज, विसाव्या शतकातील प्रबोधनकार राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज या व अशा कितीतरी तसेच ज्यांनी अखिल मानवजातीस ईश्वर दगडांच्या मंदिरात नसून माणसात आहे ही ग्राम स्वच्छतेच्या मूलमंत्रासोबतच बहुमूल्य शिकवण दिली त्या संत गाडगेबाबा महाराजांच्या महाराष्ट्र व भारत देशातील हिँदूंच्या धार्मिक अस्मितेला कदापि काळीमा फासला जाऊ नये; आणि कलंकाचा डाग तर सोडा पण छोटासा छिट्टा सुद्धा उडवला जाऊ नये...

अप्रिय आसाराम.. तुम्ही तर कलंकित झालातच पण आपल्या या दुष्कृत्यात मुलगा नारायण प्रेम साई सिरुमलानी ला सुद्धा सामाऊन घेतलंत... असा कोणता बाप असेल जो कुकर्मात स्वत:च्या मुलाला सामाऊन घेईल.. आणि असंच करायचं होतं तर का दिलं त्या बलात्कारी पोराला ईश्वरतूल्य साई बाबा चं पवित्र नाव... सुरत ठाण्यात दोन सख्ख्या बहिणीँनी त्याच्याविरुद्धही लैँगिक अत्याचाराचा खटला नोँदवलाय.. हे तर काहिच नाही.. या सर्व खेळात संपूर्ण कुटूंबच सहभागी आहे खरं तुमचा... अर्थात तुमची पत्नी लक्ष्मीदेवी व मुलगी भारतीदेवी सुद्धा... फक्त नावासमोर देवी लावल्यानं कोणी साक्षात देवी बनून जात नाही.. आता तर तुमचा अवघा परिवारच अदृश्य आहे खरं... ते सर्व गायब आहेत... तुम्हीच जाणोत कुठं असतील ते... कारण आपण तर 'साक्षात परमेश्वराचेच अवतार' आहात ना !!! माहित असेल तर सांगून द्या कुठे लपून बसलेत ते... सुरत पोलिस मागावर आहेत त्यांच्याही.. मला तर नारायण साईवर पुर्वीपासुनच संशय होता... जेव्हापासून एका पहाडी जंगलातील त्याच्या गुप्त गुफेबद्दल 'इंडिया टीव्ही' या अजून एका प्रसिद्ध राष्ट्रीय खाजगी वृत्तवाहिनीवर पाहिलं व ऐकलं तेव्हापासूनच... नुकतच ऐकायला मिळालं कि तुमचा मुलगा हि उठून सुटून निरर्थक बहाणेबाजी करतोय याचिकाकर्त्याँविरुद्ध.. आणि करु लागलाय खरं जाहिरात स्वत: निर्दोष असल्याची स्थानिक वृत्तपत्रांमधून.. पण आम्ही यावर विश्वास कसा ठेवावा.. एक म्हण आहे बघा आमच्यात "मंदीराची इमारत मजबूत असण्यासाठी सर्वप्रथम त्याचा पाया मजबूत असावा लागतो.." आणि इथे तर मंदिराचा पाया अर्थात परिवाराचा मुखिया म्हणजे तुम्हीच कलंकित असल्यावर मंदिर म्हणजे तुमच्या परिवारातील इतर सदस्यांवर या कलंकाचा एक छिट्टा उडाला नसेल हे शक्यच कसे आहे? आणि जर तुमचा परिवार आहे निर्दोष खरोखरच तर येत का नाही समोर सुरत पोलिसांच्या..? का करावं लागतंय पोलिसांना त्याचा शोध ठिकठिकाणी 6 टिम बनवून...?

असो... मी बरंच बोललो या पत्राच्या माध्यमातून.. मी ना तुमचा समर्थक ना विरोधक! मला काय आवश्यकता होती एवढं लिहिण्याची कोण जाणे.. पण एकमात्र नक्की! माझे शब्द तुम्हाला टोचले कि नाही माहित नाही कारण तुम्ही ठरले ते शेवटी 'बेशरम'च! पण तुमच्या आताही असलेल्या समर्थकांना निश्चितच टोचले असतील माझे शब्द... मला जाणीव आहे त्याची... कारण जसे आज तुमचे विरोधक तूमचे समर्थन करणारे वक्तव्य ऐकू शकत नाही तसंच तूमचे आजही टिकून असलेले समर्थक सुद्धा आपल्या 'परमात्म्याविरुद्ध' काही ऐकू ईच्छिणार नाही मी जाणतो... पण त्यांच्यावर जरा जास्तच प्रभाव दिसतो आपला... किमान त्यांचा तरी विचार करावयास हवा होता तोँड काळा करण्यापूर्वी.. इतकं सगळं होऊनही व नवनवे कटू सत्य बाहेर येणं सूरुच असूनदेखील त्यांचा अद्यापही तूमच्यावरचा विश्वास टिकून आहे... मी तूमची माफी कदापि मागणार नाही पण माफी मागतो त्या सर्व समर्थकांची... माझा उद्देश त्यांच्या भावना दुखावण्याचा मुळीच नाही.. पण हेच कटु सत्य आहे.. मी जाणतो हे थोडं कठिण आहे पण एक दिवस त्यांनाही जाणीव होईल वस्तुस्थितीची कि तुम्ही कोणी 'संत' वगैरे नसून फक्त 'बलात्कारी बाबा' आहात... होय पैशाचा हव्यासु, किशोरवयीन मुलीँशी शरीरसुख मिळवण्यासाठी वासनेच्छा तृप्त करण्यासाठी टपूनच असलेला एक बिमार वृद्ध राक्षस! निव्वळ एक पाखंडी!! मला हे कळत नाही कि एकीकडे अवघा संत समाज तुम्हाला संत बिरादरीत नाकारत असताना अ.भा. संत महासभेचे/अखाडा परिषद चे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज का घेत आहेत तुमची बाजू?? खाजगी वृत्तवाहिन्यांवर आयोजित परिसंवादात का देताहेत ते वादग्रस्त विधाने व का जोडतात संबंध तुमच्या कूकर्मांचा साधारण परंतू संवेदनशील घटनांशी? तुमची साठगाठ तर नाही ना? अन्यथा असेल भिती त्यांना कि एका पापी संतामुळे उडून जाईल जनतेचा विश्वास संत समाजावरुन-- पण हे कदापि शक्य नाही.. संतांवरचा आमचा विश्वास व श्रद्धा अढळ आहे.. ती कमी होणार नाही.. पण एक मात्र नक्की! आता करु लागतील किमान काहितरी सुजाण भक्त चौकसबुद्धीने विचार संतांना संत मानण्यापूर्वी एकदातरी... आणि आता अपेक्षाही आहे सुजाण भक्तांकडून ती एवढ्याचीच...


तुमचा ना समर्थक ना विरोधक
एक चौकसबुद्धीचा आस्तिक

-राजेश डी. हजारे (RDH Sir)
-12/10/2013, आमगाव
(पत्र लेखक अ.भा. मराठी साहित्य परिषद, पुणे चे गोंदिया जिल्हाध्यक्ष आहेत. )

  • ता. क.: 25 एप्रिल 2018 रोजी आसाराम ला बलात्काराच्या आरोपात दोषी मानत जोधपुर न्यायालयाने आजीवन कारावास चा दंड सुनावला आहे. 


  • पुर्वप्रसिद्धी:
 

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com