दिवस---> 375वा
अनुदिनी/ब्लॉग---> 70वा
प.पु. महानत्यागी श्री जुमदेवजी बाबा,तर नियोजनाप्रमाणे मी सकाळी गोँदियाच्या एन.एम.डी. महाविद्यालयात गेलो..तसं माझं तिथे वैयक्तिक काम होतं.. पण तुम्हाला सांगू का हा तुमच्या तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम प्रारंभी याच परिसरात डी.बी. सायन्स कॉलेजमध्ये होता.. या कार्यक्रमामुळे तेथुन कोणत्या तरी परिक्षेचं केँद्र रद्द करण्यात आलं खरं.. कार्यक्रमाचा मंच उभारणार तोच जागा मर्यादित असल्याच्या कारणाने कार्यक्रमाचे स्थान MIET त स्थलांतरीत करण्यात आल्याचं कळलं.. मला तर नवलच वाटलं बुवा! बाबा जुमदेवजीच्या साध्या डाक तिकीट प्रकाशनासाठी एवढी काय गर्दी असणार? असंच मला वाटलं होतं पण---
मी गोँदियात पोचल्यापासूनच कितीतरी 'परमात्मा एक' सेवकांचे जत्थेचे जत्थे पायदळी कार्यक्रमस्थळी जाताना दिसत होते.. मी हि निघालो एनएमडी तून आणि थोड्याच अंतरावर एका प्रौढ व्यक्नीने हात दाखवला.. त्यांना मी दुचाकीवर लिफ्ट दिली.. त्यांनाही तुमच्याच कार्यक्रमास जायचं होतं व योगायोगाने मला पण.. त्या दिवशी सुरक्षेच्या कारणाने शहरातील ऑटो रिक्षा बंद असावेत बहुतेक..! MIET त पोहोचताच डोळ्यांवर विश्वास होत नव्हता.. अहो खरंच..माझा अंदाज फोल ठरला होता.. जिकडे तिकडे वाहने व माणसांव्यतीरिक्त काहीच दिसत नव्हते..
कार्यक्रम नुकताच सुरु झालेला.. मंचावर उपस्थित केँद्रात मंत्री असलेल्या बऱ्याच मंत्र्यांची भाषणे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ना. प्रफूल पटेल यांचे भाषण झालेले.. अध्यक्षस्थानावरुन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री के. शंकरनारायणन यांनी भाषण दिले ज्यात आपल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला.. व भारत सरकारद्वारा प्रसिद्ध तुमच्या डाक तिकीटाचे प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटक भारताचे उपराष्ट्रपती मा. ना. डॉ. श्री मो. हामिद अन्सारी यांच्या हस्ते झाले.. भारताच्या उपराष्ट्रपतीँनी आपल्या भाषणात वारंवार प्रफूल पटेलांचे कार्य, गोँदिया जिल्ह्याचा विकास इ. बाबीँचा आवर्जून उल्लेख केला.. आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली...
माझ्या नजरेत आपली ओळख 'परमात्मा एक' चे संस्थापक (जुमदेवजी ठुब्रिकर) इतकीच होती पण ती या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने कळली.. कार्यक्रमासाठी लावलेल्या हजारो खुर्च्या सेवकांनी गच्च भरल्या होत्या आणि त्याच्याही दुप्पट सेवक दोन्ही बाजुला शांतपणे उभे होते.. जितपर्यँत नजर जाईल तिथपर्यँत डोळ्यांना आपल्या सेवकांचेच दर्शन होत होते.. आणि कार्यक्रम संपल्यानंतरही हजार-दोन हजार सेवकांचे येणे सुरुच होते.. मी ज्यांना लिफ्ट दिली होती ते संजय वानखेडे सुद्धा 'परमात्मा एक' सेवक असून ते स्वत: चंद्रपूर हून आलेले होते.. हिँगना, नागपूर सारखे सबंध महाराष्ट्र व कदाचित आंतरराज्यातुनही आलेल्या आपल्या मार्गाच्या सेवकांनी MIET चे प्रांगण अगदी तुडुंब भरले होते.. काटोल हून तर अवघी बसची बसच बुक करुन आलेली होती.. मला नंतर तुमच्या सेवकांकडून कळलं कि 'परमात्मा एक' चा कार्यक्रम कुठेही असो सेवकांना कळल्यास जातातच.. ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने.. अल्पोहाराची आयोजकांकडून व्यवस्था असुनदेखील सेवक स्वत: आणलेले डबे, अल्पोहार अथवा स्वखर्चाने नाश्ता खरेदी करुन शांतपणे ग्रहण करत होते...
माझ्या मनात 'परमात्मा एक' म्हणजे घराच्या दाराला लावलेली "दारु पिऊन आत येण्यास मनाई आहे." ही पाटी हि एकच ओळख होती.. पण नेरवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण जीवनभर महानत्याग करुन अंधश्रद्धा विरोधी व व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कार्याबद्दल जाणुन घेता आले.. जसे 3 शब्द, 4 तत्त्व, 5 नियम.. कच्चे सेवक, पक्के सेवक.. हातावर पर्वत घेऊन उडत्या हनुमानाचेच प्रतिक म्हणून स्विकार, जात-धर्म कसलाही भेद न करता मानवतावादाचा पुरस्कार.. वगैरे वगैरे.. आणि बरंच काही...
पुढे वाचा→
No comments:
Post a Comment