Thursday 26 December 2013

वांझ करुणेने प्रश्न नाही संपणार - कमलाकर देसले

दिवस 459 वा

अनुदिनी 90 वी

वाचकाची अनुदिनी 05वी

कमलाकरजीँची लेख- पहिला

सागरची पोस्ट- दुसरी


RDH Sir या फेसबुक पेजचे नियमित युवा साहित्यिक सागर जाधव यांनी 31 ऑक्टोबर 2013 रोजी औपचारीकरित्या पाठवलेला हा कमलाकरजी देसले यांचा लेख त्यांच्याच शब्दात..
आदरनिय कवि-गझलकार कमलाकर आबा देसले यांचा संवेदनशिल लेख.. 550331_371677312920067_1557516207_n.jpg
कमलाकर देसले

वांझ करुणेने प्रश्न नाही संपणार

1239731_432020206898143_1384513290_n.jpgही गरिबांची मुले उष्ट्या पत्रावळीवरचे अन्न खाऊन भूक भागवत आहेत. संवेदनशील माणसाला हेलावून टाकणारे हे दृश्य आहे; पण हे असे होण्यात श्रीमंतांचा दोष नाही. अज्ञानाने का होईना गरीबी हा पर्याय निवडणाऱ्यांचा आणि त्यांच्या अज्ञानाचा हा दोष आहे.
कधीकाळी असेच जे भुकेले होते ते आज गुणवत्तेने, कर्तृत्वाने श्रीमंत झाले आहेत. कारण अमीरी हा त्यांचाही हक्क आहे. श्रीमंती हा ज्यांचा चॉइस असतो आणि त्यासाठी जे अथक प्रयत्न करत असतात ते श्रीमंतच होतात. त्यांना पुन्हा फकीर ठेवणारा त्यांच्याकडे पर्यायच नसतो. श्रीमंत होणे हा एकमेव मार्ग आणि पर्याय निवडणारे श्रीमंतच होतात.

आता या निष्पाप मुलांविषयी करुणा वाटणं स्वाभाविक आणि आवश्यक आहे. ती वाटायलाच हवी. माणुसपणाचं ते महत्वाचं लक्षण आहे; पण ते पुरेसे नाही . कुठलीही करुणा ही कृतीशिवाय वांझ असते. असं पुलं म्हणायचे. तेव्हा या मुलांना अन्न दिल्याने अथवा कपडे दिल्याने भुकेचे अथवा त्यांचे अन्य प्रश्न कायमचे सुटणार आहेत असे मुळीच नाही. मानवी करुणेतून त्यांना अन्न, कपडे दिल्याने तात्पुरती त्यांची भूक भागेल; पण कायम हे कोण करू शकेल? नाही. मग हे प्रश्न कसे मिटतील ?

जेव्हा मानवी करुणा आणि (करुणावंत) या मुलांना अन्न आणि कपड्या सोबत ज्ञानाला पात्र बनवण्याचे शिक्षणाच्या संधीचे उत्तम पर्याय उपलब्ध करून देईल/देतील. म्हणजेच करुणेतून प्रत्यक्ष कृती घडेल. आणि मुख्य म्हणजे ज्यांची ही मुले आहेत त्यांच्या पालकांनाही ही आपली मुले श्रीमंत, ज्ञानी, गुणी, निपुण व्हायला आवडतील. तेव्हाच भुकेचा प्रश्न मिटेल कदाचित॰! वांझ करुणेने प्रश्न नाही संपणार ... कृतीशिवाय करुणा वांझ असते.

लेखक- कमलाकर देसले

द्वारा- सागर जाधव

स्त्रोत- RDH Sir | Facebook

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com