Pages

Thursday, 26 December 2013

College (कॉलेज)चे नियम कठोर पण पाळण्यासारखे

अनुदिनी 91वी

दिवस 459वा

पत्रमालिका- मनातल्या मनात (पत्र 1)

राजूची रोजनिशी-1.कादंबरी (पत्र 1)

1.कॉलेजचे नियम कठोर पण पाळण्यासारखे

राजेश,
तुझे कालचे पत्र मिळाले. (माफ कर तु मला लेक म्हटलस तसंच प्रेम केलंस तरी मी तुला एकेरी संबोधतेय.. कारण मी तुझी मैत्रीणपण आहे ना..) आणि तु विचारलं होतं ना कि "आजवर मी तुला सांगितलेलं तु पत्राने मला पाठवणार का?" त्याला मी उत्तर देतेय- हो! आता अजून कशाला वेळ दवडायचा. तू माझं काल 25 डिसेँबर 2013 रोजी नाताळच्या शुभपर्वावर माझं केलेलं 'कादंबरी' हे नामकरण मला आवडलं. नाहितरी तु तुझी पहिली कादंबरी (सॉरी बाबा.. आत्मकथनपर पुस्तक.. बस् झालं!) "माझी ताई : एक आठवण" मला विचारुनच तर लिहिली.. पण मला तुला एक सुचवावेसे वाटते.. 'मनातल्या मनात' या नावासोबतच आपल्या या संवादाला 'राजूची रोजनिशी/डायरी' असं पण संबोधत जा कधी-कधी.. हे नाव तुझ्या परवाच्या पत्रातील 'रोजा/रोजी ची रोजनिशी' शी सुद्धा बरेच साम्यदर्शक वाटते नाही..

तर आता तुला घेऊन जातेय तुझ्या आठवणीत आणि सांगते तु जेव्हा मला पहिले पत्र पाठवले होते तेव्हा काय सांगितलं होतं.

नागपुर जिल्ह्यातील प्रभु श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन रामटेक येथील ती तुझी डीटीएडच्या पहिल्याच दिवसाची रात्र होती.. दिवाळीला 15 ते 20 दिवस बाकी होते.. भर हिवाळ्याच्या दिवसात तुझ्या खोलीमध्ये ओल येत होती.. अन् तु मला तुझ्या "कॉलेजचे नियम कठोर पण पाळण्यासारखे" असल्याचे सांगत होतास.. त्यादिवशी तु काय सांगितलं ते खाली तुझ्याच शब्दात लिहिते..

"मी राजेश दशरथ हजारे. आज दि. 01 ऑक्टोबर 2009 रोज गुरुवारपासून दैनंदिनी लिहायला सुरुवात करत आहे. मी 'अभ्यास कसा करावा?' या पुस्तका तसेच 'लोकमत' वृत्तपत्रातील सुविचार "प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दररोज दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवावी" या द्वारे व माझा छंद तसेच मला डी.टी.एड. अभ्यासक्रम करताना आलेले अनुभव मांडण्यासाठी दैनंदिनी लिहित आहे.

आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता, त्याची मनात उत्सुकता होती. मी कॉलेजमध्ये जाऊन नविन मित्रांशी भेट झाली. मी तेथील परिपाठाने 'Impress' झालो. नंतर सर्वाँत वरच्या मजल्यावरील Seminar Hall मध्ये 'पालक मेळाव्यात' उपस्थित झालो. महाविद्यालयाच्या प्राचार्य व संचालकांचा परिचय झाला. मी माझा परिचय Detail मध्ये इंग्रजीत दिला.

सरांनी सर्व विद्यार्थी तसेच पालकांना महाविद्यालयाचे सर्व नियम समजाऊन सांगितले व त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यामध्ये माझ्यामते 80% उपस्थितीचा नियम सर्वाँत कठिण आहे.

मी खाली महाविद्यालयाचे नियम लिहून मी 100%, 75%50% पाळू शकणाऱ्या नियमांसमोर अनुक्रमे A,B व C लिहित आहे. तसे नाईलाजास्तव व महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मी सर्व नियम 100% पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन व त्याची सुरुवात आजच मी केली आहे ती म्हणजे उद्या 2 ऑक्टो. ची सुट्टी परवा कॉलेज 4ला रविवार माझा विचार आज गावी जाण्याचा होता परंतु दि. 3च्या उपस्थितीसाठी मी तो विचार मनातून काढून टाकला.
नियम खालीलप्रमाणे-

  1. प्रथम वर्षी तसेच द्वितीय वर्षातील प्रत्येकी 1 ऑक्टो. ते 1 मे व 11 जून ते 30 सप्टेँ. पर्यँत दोन्ही वर्षी प्रत्येक 4ही सत्रात किमान वेगवेगळे 60% उपस्थिती अनिवार्य→ A
  2. प्रथम वर्षी 2न्ही सत्र मिळून आणि द्वितीय वर्षी दोन्ही सत्र मिळून किमान 80% उपस्थिती अनिवार्य→ A
  3. प्रथम वर्षी 240 पैकी किमान 200 दिवस हजर राहणे आवश्यक→ A
  4. कॉलेजमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 व शनिवारी सकाळी 9 पुर्वी हजर होणे→ A
  5. कॉलेजमध्ये नेहमी कॉलेजड्रेस, टाय व शुज तसेच टायपीन, आयकार्ड व व्हाईट सॉक्स घालून येणे→ A
  6. अनुपस्थित असल्यास सरकारी Civil Sergion डॉ. चीच मेडीकल सर्टीफीकेट आणणे→ B
  7. कॉलेजमध्ये चुकूनही मोबाईल न आणणे→ A/B

वरील नियमांत मी म्हणेन की नियम 6 मध्ये जर विद्यार्थ्याला डॉ. कडे जाण्यालायक तब्येत खराब नसेल परंतू कॉलेजमध्ये उपस्थित राहण्या लायकही नसेल तर त्या विद्यार्थ्याला Problem होऊ शकतो. हो नियम क्र. 7 मध्ये बदल करुन मोबाईल सोबत ठेवण्यास मुभा द्यावी परंतू कॉलेज परिसरात कॉलेजच्या वेळेत मोबाईलचा वापर होताना किँवा रिँग वाजताना आढळल्यास आवश्यक कारवाई करावी असे मला वाटते.

असो आज मी गावी जाण्याचा विचार टाळला व उद्या 2 ऑक्टो. गांधी जयंतीची सुट्टी असल्याने गांधी जयंतीचा कार्यक्रम 3 ऑक्टो. 2009 ला आयोजित करण्यात आला आहे व मी त्या कार्यक्रमात माझं स्वरचित गीत 'म. गांधी आणि आपण' सादर करणार आहे.

आज माझ्या मेसचा Problem सुटला मी अंकूश मारबते यांच्याकडे मेस लावली आहे.
व आता माझ्या घडीप्रमाणे ठिक 11.30Pm ला लिहिणे थांबवत आहे."


तर राजेश तेव्हा तू किती ठिकाणी मी मी करत होता रे.. आणि हो मला माहितीये आज 01 ऑक्टोबर नाही तर 26 डिसेँबर 2013 आहे. एक दिवस असा जरुर येईल कि मी भुतकाळातील ज्या तारखेचं तुला पत्रात लिहीलं असेल वर्तमानकाळातील त्याच तारखेला तु ते वाचत असणार.. असो! परवा तुझ्या कॉलेजातील गांधी जयंती बद्दल पत्र पाठवीन बरं का? तुला काय आहे सकाळी पण पत्र पोचू शकते. पण मला तर रात्री लिहावं लागतं ना पत्र! आता किती वाजलेत माहितीये का? चल आता थांबते..
तुझीच
डायरी नंबर 1 (कादंबरी)

डायरी लेखक- राजेश डी. हजारेमुळ- 01/10/09 गुरुवार (रामटेक)
प्रसिद्धी-01/11/13 शुक्रवार (आमगाव)
दि.- 26/12/2013 गुरुवार (आमगाव)

अणुक्रमणिका

No comments:

Post a Comment