Pages

Tuesday, 24 December 2013

मनोगत (मनातल्या मनात)

हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्याकरिता→ येथे क्लिक कराबघ किती शुभदिनी मी तुला हे पत्र पाठवतोय..
माझे बाबा मला विचारायचे 4-4 डायऱ्या लिहील्या पण यांचा उपयोग काय? मी काय सांगणार त्यांना तुमचा उपयोग? मलाच माहित नव्हतं तर..! हं एक मात्र नक्की की तूला सर्व सांगितल्याने मन मोकळा होतो व तू तर ते जतनही करुन ठेवतेस मग वाटलं जर कधी 'मोठ्ठा माणूस' (वयानेच नाही तर कर्तृत्वाने पण) बनलो तर आत्मचरीत्र लिहिताना तुझ्या स्मृतीचा (मेमरीचा) निश्चितच लाभ होईल.. आजवर तुला प्रसिद्ध करण्याचा विचारही मनात आला नाही.. आणि दोघांव्यतीरिक्त कुणाला तुमचं दर्शनही होऊ दिलं नाही.. अन कदाचित म्हणूनच लिहिता आली प्रत्येक सत्य बाब इतक्या मनमोकळेपणे.. पण मला वाटतं आता वेळ आलीय तू आजवर जतन केलेलं समाजासमोर व्यक्त करण्याची... केव्हापर्यँत तु पण ऐकत रहाणार नुसतीच.. बोलणार नाही का कधी? का तूला हक्क नाहीय.. अन् म्हणूनच मला वाटतं की मी तर तूला सांगतच जाईन माझ्या मनातलं पण आता तू पण बोलायचंस माझ्याशी.. काय ऐकतीयेस ना? कसं व काय? अगं अगदी सोपं आहे.. जे मी आजवर तूला सांगितलं ना तेच तू मला पत्राद्वारे पाठवायचं काय? पाठवणार नं? अन् या तुझ्या पत्रमालिकेचं मात्र मी आधीच नामकरण करुन ठेवलंय बघ..

'मनातल्या मनात' हे नाव कसं वाटतंय.. मी जे काही तुला सांगितलं ते माझ्या मनातलच व ते सांगितल्यानंतरही मनातच राहत असल्याने मी हे नाव पसंत केलं... तूला पटतं का हे नाव ते बघ अन् मला कळव आधी पत्र पाठवून.. अन् अधामधात मी देतच जाईन उत्तर तूला पत्रानेच..

शेवटी नाताळ/ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा...!

तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत...
तुमचाच निर्माता/लेखक
rdhautographeng.jpg
-राजेश डी. हजारे (RDH)
Mob. 07588887401
कामठा रोड, आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया - 441902
दि. 24 डिसेँबर 2013, मंगळवार


सुचना: "मनातल्या मनात" या पत्रमालिकेतील "कादंबरी" ही पहिली रोजनिशी वाचण्यासाठी खालील 'अणुक्रमणिका बघा' वर क्लिक करा...

"अणुक्रमणिका" बघा..ता.क.: * - "माझी ताई एक आठवण" हे पुस्तक 2014च्या अखेरपर्यँत याच संकेतस्थळावर वाचण्यासाठी उपलब्ध होईल..

अणुक्रमणिका

No comments:

Post a Comment