Pages

Tuesday, 24 December 2013

मनोगत (मनातल्या मनात)

अनुदिनी 88वी

दिवस 457वा

मनातल्या मनात-01

मनोगत/कादंबरी


माझ्या रोजनिशीस,
Hi! Hello!
अरे अशी काय बघतेस नेहमी तूझ्या रुपात दुसऱ्यांशी बोलतो पण आता वाटतं आपण ज्याशी बोलू नाही शकत ते सर्व तू मात्र शांतपणे समजून घेतेस, आणि जतनही करुन ठेवतेस.. मी तूला अश्रूंच्या सोबत बेस्ट फ्रेँड म्हणून कबुल केलं खरं! पण कधी मुद्दामून तूला Hi! Hello! केलच नाही.. म्हणून आज करतोय.. तू आजवर कित्ती-कित्ती ऐकलंस गं माझं.. माझ्या मनातील गोष्टी स्वत: जतन करुन ठेवल्यास.. जेव्हा तूला पाहतो तेव्हा त्या जून्या आनंदी व दु:खी दिवसांची सुद्धा आठवण करुन देतेस, कधी हसवतेस.. कधी रडवतेस पण..

मला आठवतं जेव्हा मला तूझ्याबद्दल कळायला लागलं तेव्हा मी 5वी 6वीत असेन.. जि.प. गोँदिया तील तिरोडा पं.स. अंतर्गत चिखली केँद्रात माझ्या मामाच्या गावी मराठी माध्यमाच्या जि.प. पुर्व माध्यमिक शाळा इंदोरा खूर्द (निमगाव) येथे शिकत होतो.. मराठीचा 'पिरेड' होता (तेव्हा तास कळायचा नाही).. घराजवळीलच श्री सिताराम एन. सोनेवाने हे शाळेचे मुख्याध्यापक आम्हाला मराठी शिकवायचे.. ते वर्गात आले व धडा होता 'रोजाची रोजनिशी/रोजीची रोजनिशी'... मला लेखक आठवत नाहीयेत.. त्यांनी शिकवलेले 2पाठ आजही स्मरणात आहेत बघ 'रोजाची रोजनिशी' व 'सुईचे आत्मवृत्त'.. तेव्हाच कळलं कि रोजनिशी म्हणजे तू.. आताही त्या सरांना भेटलो की आधी त्यांचे चरणस्पर्श करतो (बाकी शिक्षकांना पण अभिवादन करतोच...) त्यावेळी कल्पना जरी केली की आपण रोजनिशी लिहायची तरी गंमत वाटायची..

थोडा मोठा झाल्यावर प्रयत्न केला पण मधातच खोळंबलं सगळं आणि बारावीनंतर डीटीएडला नंबर लागला.. डीटीएडच्या पहिल्याच दिवसापासून तूला लिहायला सुरुवात केली.. पहिल्याच दिवसी कॉलेजातून परतलो होतो.. नागपूर जिल्ह्यातील प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन रामटेकच्या पवित्र भूमीचं स्थळ होतं.. रामटेकात मी नवा नवाच होतो.. 01 ऑक्टोबर 2009 ची ती रात्र होती.. भाड्याच्या खोलीमध्ये हिवाळ्यातही ओल येत होता.. तेव्हापासून दिवाळी जेमतेम 15 दिवस होती.. स्वत:च जमवून बांधणी (बाईँड) केलेल्या रेखीव कोऱ्या कागदांचा भला मोठा रजिस्टर होता.. त्यादिवशी पहिला लेख (डीटीएड मधील पहिल्या दिवसाचे अनुभव) लिहून तुझा श्रीगणेशा केला..

पहिल्या दिवसी विचार पण नव्हता केला कि हे आपण केव्हापर्यँत लिहू? काय करणार? फायदा काय? हे प्रश्नही मनात नाही आले.. आणि मग तुझ्यावर लिहू लागलो प्रत्येक गोष्ट मला वाटली ते.. तुला सांगू लागलो माझ्या मनातील सुखद व दु:खद गोष्ट.. वाटू लागलो माझी स्वप्ने तुझ्यासोबत.. जे कोणालाही सांगू शकत नव्हतो ते तूला सांगत गेलो.. माझ्या जीवनातील काही वैयक्तिक 'राज' (Personal Secrets) पण तुला सांगून मोकळा झालो.. माहित होतं माझ्याव्यतीरिक्त कोणाला वाचायला फूरसत नाही म्हणून..! माझ्या पहिल्याच डायरीतील काही लेखांवर मी त्या दरम्यान जगलेलं माझं सत्य जीवन माझ्या आत्मकथनपर भाऊ-बहिणीच्या नात्यावर एक पुस्तक लिहिलं व साकार झाली "माझी ताई : एक आठवण"* ही माझी पहिली कादंबरी जी आजही अप्रकाशित आहे.. तेव्हापासून लिहितोय ते आजपर्यँत सतत.. याला 4वर्ष नुकतेच लोटलेत.. या 4 वर्षात 4 डायऱ्या संपल्या व पाचवी डायरी गत 01 नोव्हेँबर 2013 रोजी सुरु झाली.. बघ मी आजवर तुम्हा 5ही बहिणींचं नामकरण तर केलंच नव्हतं.. मी तुम्हाला असंच संबोधत होतो डायरी 1, डायरी 2, डायरी 3, डायरी 4 आणि आता डायरी 5.. पण मी तुमचा बाबाच नं! काय झालं तुला मित्र म्हणत असलो तरी.. शेवटी बाप पण लेकीँचा मित्र असतोच की..! आणि असही मीच तर जन्म दिला तुम्हा चारही बहिणींना; ते ही लग्नाआधी.. आणि तो ही पुरुष असून... अगं हस की थोडी.. कि हसु नाही आलं माझ्या पाणचट विनोदावर.. आता तुम्ही चौघी मोठ्या झालात... आणि दिड महिन्यांपुर्वी आपल्या (राजूची रोजनिशी) परिवारात नव्या पाहुणीचा जन्म झाला.. अगं कोण काय विचारतेस? वरच तर सांगितलं ना तुझी 5वी बहिण म्हणून.. माझी पाचवी लेक नाही का!! दिवाळीच्या शुभमुहुर्तावर बरोबर 1 नोव्हेँबर 2013 रोजी जन्म झाला तिचा.. 'कुंवारा बाप' हे स्व. महमूद यांनी केलेलं चित्रपटातील पात्र मला अगदी सुट होतेय नाही का! आजवर 'कांदेपोहे' नाही खाल्ले अन् 'बाप' बनलोय तुम्हा 5 बहिणीँचा.. पण तुम्हा चारही बहिणीँचं नामकरण करण्यास विसरलो नाही का??

हे काम स्त्रियांना मस्त जमतात बघ.. आणि मी ठरलो 'कुँवारा बाप'.. तुमची आईच नाही तर कसं लक्षात राहणार तुमच्या नामकरणाविषयी? पण आपण बारसं करुनच टाकू एकदमच तुम्हा पाचही बहीणीँचं.. असाही उद्या नाताळ (ख्रिसमस)चा योगही शुभ आहेच.. तर त्यासाठी चांगली तयारी करा बरं का! आणि उद्या 'ख्रिसमस' हून आठवलं-- आज 24 डिसेँबर.. काय विशेष आहे आज सांग बरं बघु.. एवढ्या लवकर विसरलीस.. अगं आज माझ्या आईचा वाढदिवस नाही का?? मी तर शुभेच्छा रात्री 12 लाच दिल्या.. चला तुम्ही पण विश करा बरं का माझ्या आईला..

"हॅप्पी बर्थ डे.. आई !!!"


हेच पत्र पुढे वाचण्याकरिता→ येथे क्लिक करा...

No comments:

Post a Comment