पण रामटेक येथे डी.टि.एड. प्रथम वर्षात पाण्याच्या तंबूजवळ दिसलेल्या एका मूलीला पाहून मला वाटले कि 'ती' व 'ही' जणू एकच...! पण डोक्यातील विचार म्हणत होते "छे! असं होऊ शकत नाही. ती मुलगी इथं कशाला येते? व नाशिक (स्थान बदलले आहे.) कुठे आणि त्या प्रवेश घेतलेल्या मूलीचा गाव कुठे?" एक विचार नकार देत असताना मन मात्र मानत नव्हते व वाटे "एका चेह-याच्या व एकाच उंचीच्या दोन मुली कशा?" आणि असल्या तरी "दोघांना बघितल्यानंतर मनात भाऊ-बहिणीच्या नात्याची एकच भावना निर्माण होईल काय?" तरी हा मनाचा भ्रम समजून मी हा विचारच मनातून काढून टाकला मात्र एकदा बघितलं तर नाशिक (स्थान बदलले आहे.) जिल्ह्यातीलच तालुका त्या मुलीचा गाव सापडला. तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता पण विश्वास करावं वाटलं कि खरंच 'ती' व 'ताई' जणू एकच तर नसावी? परंतु आजही मी या गोष्टीची पुष्टी करू शकलो नाही...
Thursday, 4 October 2012
MTEA-2. 'ती' व 'ताई' जणू एकच...!
मी अकरावीत असताना सन 2007-08 साली राज्यस्तरीय लोकमत युवा महोत्सवात जातेवेळी 'नाशिक' (स्थान बदलले आहे.) येथे थांबलो असताना जेमतेम 2 मिनिटे माझी नजर एका मुलीवर पडली. मी त्याचवेळी त्या मुलीला आपल्या मनात बहिण मानलं होतं! व हे ही जाणत होतो कि माझी त्या मूलीशी पुन्हाहूत भेट होणार नाही; हे अशक्य आहे तरीपण घरी येतपर्यँत माझ्या डोळ्यांसमोर त्याच मूलीचा चेहरा झळकत होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment