Pages

Thursday, 11 October 2012

MTEA-3. सुक्ष्मपाठाचे आनंदी दिवस

आमचे सुक्ष्म पाठ सुरू असताना माझी ईच्छा होती कि नवीन प्रवेश घेतलेली मुलगी माझ्याच गटात यावी पण ती दुस-या तुकडीची असल्याने माझ्या गटात येणार नाही असे वाटले होते पण देवाच्या कृपेने अनपेक्षितपणे ती मुलगी माझ्या गटात आली व विशेष म्हणजे मीच त्या गटाचा गटप्रमुख होतो.

पहिल्याच नजरेत मी त्या मूलीला बहिण मानलं होतं व त्या बहिणीने 'माझी ताई' बनून माझ्याशी फक्त बोलावं या ईच्छेपोटी मी एकट्या ताईचे अब्बल-तब्बल 6 पाठांचे निरिक्षण केले. त्या दिवसात ताई थोडीबहूत माझ्याशी बोलत होती व मी ताईला स्वत: नाशिक प्रकरणाबद्दल सांगून 'ती' व 'ताई' एकच तर नाही ना! हे खात्रीपूर्वक जाणणार होतो तसेच त्यांना बहिण मानतो हे ही सांगणार होतो पण---

काहिही असो, माझी मानलेली ताई माझ्याशी फक्त सुक्ष्मपाठातच चांगली हसत-हसत मनमोकळेपणे बोलली म्हणून माझ्यासाठी सुक्ष्मपाठाचेच दिवस आनंदी होते. त्या आनंदी दिवसांची आठवण आजही मी सुक्ष्मपाठ रजिस्टर व 'ती' ताईचे हस्ताक्षर असलेली कागदे जपून ठेवत आहे.

Pages: [First|Prev.|Next|Last]

1 comment:

  1. I'll try to put this to good use immdieaetly.

    ReplyDelete