Wednesday 3 October 2012

MTEA-प्रस्तावना

"पवित्र पुस्तकाला प्रस्तावनेची काय आवश्यकता आहे?" कारण माझ्या मते तरी मी लिहिलेलं "माझी ताई : एक आठवण" हे आत्मकथनपर पुस्तक भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याविषयी लिहिलं असल्यामुळे पवित्र आहे.

प्रस्तुत पुस्तक लिहिताना पहिल्या दिवसापासून आजपर्यँत घडलेलं सर्वकाही "माझी ताई : एक आठवण" या पुस्तकात नमूद करण्याचा मी प्रामाणिक व पुरेपूर प्रयत्न केला असून या प्रयत्नात जवळपास यशस्वी झाल्यासारखे मला वाटते.

या पुस्तकात मी सर्वप्रथम 'अपूर्ण समारोप' या लेखापर्यँतच लिहिलं होतं परंतु जसजसं माझ्या जीवनात त्यानंतरही काही घडलं ते मी पुढे न राहवून लिहीलंच

तरीदेखील या पुस्तकाचा शेवटचा लेख '... जाता-जाता गोड शेवट' इथपर्यंतच मी या पुस्तकाचा शेवट ठेवला आहे; परंतु या आत्मकथनाचा शेवट अद्याप झालेला नाही व तो कधी होऊही शकत नाही कारण भाऊ-बहिणीच्या नात्याचा शेवटच कधी शक्य नाही व तो मी करूपण ईच्छित नाही... परंतु या पुस्तकाचा अंतिम लेख वाचून वाचकांनी असे समजण्याचे मुळीच कारण नाही की नंतर तो गोडवा तसाच सुरू राहिला... हं मात्र इतकं नक्की की त्या दिवसाचा गोडवा मात्र मला आयुष्यभर आनंद देत राहणार...

मी जरी "माझी ताई : एक आठवण" लिहिण्याच्या आनंदात असलो तरी मी दु:खीच आहे; कारण मी या पुस्तकाद्वारे माझ्या दु:खद भावना व्यक्त केल्या असून तुम्हा वाचकांना सुद्धा दु:खच देत आहे...

माझ्या मते जो-जो वाचक "माझी ताई : एक आठवण" माझ्या भावना ओळखून, एकाग्र चित्ताने, मनापासून, भावनांच्या ओघात, भावनाविवश होऊन, निर्मळ व पवित्र मनाने वाचन करेल त्याच्या डोळ्यांतून भावनांच्या ओघात निश्चितच या दुर्दैवी भावासाठी अश्रू पडतील; व तेव्हाच हे आत्मकथन लिहील्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटेल अन्यथा जर ही वाचून एखाद्या माझ्या बहिण नसलेल्या वाचक भावाचे वा भाऊ नसलेल्या वाचक बहिणीचे मन हळवे झाले नाही तर माझी ही पुस्तक लिहिण्यासाठी केलेले अपार प्रयत्न, मेहनत व त्याग व्यर्थ गेल्याचे मी समजतो... (परंतु हस्तलिखित प्रत वाचून या पुस्तकाच्या प्रतिक्रीया वहीत वाचकांनी दिलेल्या प्रतीक्रियांमधून हे सिद्ध ही झाले असून मी त्यांचा आभारीच आहे.)

आशा आहे की आपणास हे पुस्तक वाचण्यास मनापासून आवडेल...

-RDH (राजेश डी. हजारे)

 • ज्येष्ठ शुक्ल 3 शके 1932
  मंगळवार दि. 15 जून 2010
  रामटेक, जि. नागपूर
  • निजभाद्रपद कृष्ण 03 शके 1934
   बुधवार दि. 03 ऑक्टोबर 2012
   आमगाव, जि. गोँदिया

Pages: [First|Prev.|Next|Last]

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com